शहरं
Join us  
Trending Stories
1
ऐतिहासिक क्षण! ३४ वर्षांनी भेटलेल्या इजरायल-लेबनॉनमध्ये १० दिवसांसाठी युद्धबंदी; राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांची यशस्वी मध्यस्थी
2
"उडता पंजाब..." सरपंच साब श्रेयससह प्रभसिमरनचा जलवा; मुंबई इंडियन्सला पराभूत करत पंजाब किंग्स अव्वल
3
नाशिक TCS प्रकरण: आरोपीचा काका म्हणतोय, 'पीडित तरुणी आणि आरोपीत प्रेमप्रकरण...'; न्यायालय आवारात गोंधळ
4
रात्रभर तडफडत राहिले; राष्ट्रीय विधि विद्यापीठाच्या दोन विद्यार्थ्यांचा दुर्दैवी अंत
5
"आमचे सैन्य पुन्हा युद्धासाठी सज्ज, डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशाची वाट बघतोय", अमेरिकेच्या संरक्षण मंत्र्यांचे विधान
6
MI vs PBKS : श्रेयस अय्यर झाला सुपरमॅन! Unbelievable Relay Catch सह पांड्याचा खेळ खल्लास (VIDEO)
7
"आज चाणक्य असते तर तेही थक्क झाले असते..."; महिला आरक्षण विधेयकावरून प्रियंका गांधी यांचा थेट निशाणा
8
Quinton de Kock चा मोठा धमाका! चार सामन्यांत बाकावर बसवलं; संधी मिळताच ठोकली कडक सेंच्युरी
9
"संसदेत अनेकदा राहुल गांधींची खिल्ली उडवली जाते, पण...!"; प्रियंका गांधींचा भाजपवर घणाघात
10
MI vs PBKS : पॉवर प्लेमध्ये 'सिंग इज किंग' शो! सूर्यावर ओढावली 'गोल्डन डक'ची नामुष्की
11
खळबळजनक खुलासा! पाकिस्तानने भडकवली नोएडामधील हिंसा; तंत्र बघून सुरक्षा यंत्रणा हादरल्या
12
कोणी विचारेना...! किंमत होती ५.५० लाख, मारुतीवर आठ वर्षांतच कार बंद करण्याची वेळ आली...
13
नेपाळने लादला भारतावर कर! १०० रुपयांहून अधिकच्या खरेदीवर आता द्यावा लागणार 'भंसार' कर; बालेन सरकारचा मोठा निर्णय
14
BJP मंत्र्यांच्या मुलाने पाच जणांना उडवले, उलट त्यांच्यावरच ओरडला- मी सायरन वाजवले, बाजूला का सरकला नाहीत?
15
युट्यूबवर ५ लाख व्ह्यूज आले तर बँक खात्यात किती पैसे जमा होणार? जाणून घ्या कमाईचं नेमकं गणित
16
ममता बॅनर्जींचा मोठा विजय! 'ट्रिब्यूनल'कडून क्लीन चिट मिळालेल्यांना बंगालमध्ये मतदानाचा अधिकार; सुप्रीम कोर्टाचा कलम १४२ अंतर्गत विशेष आदेश
17
कोण आहे Mayank Rawat? मुंबई इडियन्सनं एका षटकात ५ षटकार मारणाऱ्या भिडूला दिली पदार्पणाची संधी
18
भयंकरच घडलं! वाद सोडवायला गेला आणि जीव गेला; मध्यस्थी करणाऱ्याची चाकूने वार करत हत्या
19
हरियाणा काँग्रेसमध्ये मोठा भूकंप! राज्यसभा निवडणुकीत 'क्रॉस वोटिंग' करणाऱ्या ५ आमदारांचे निलंबन; हायकमांडचा कडक इशारा
20
आधी मेलेनिया-ट्रम्प यांचं लग्न जमवलं, आता फिक्स करतोय ट्रम्प यांच्यासोबत नेत्यांच्या मीटिंग; कोण आहे हा व्यक्ती?
Daily Top 2Weekly Top 5

‘भोगावती’मधील नोकर भरतीस खो!

By admin | Updated: April 10, 2015 00:26 IST

साखर सहसंचालकांचे आदेश : सत्ताधारी गटाच्या समर्थकांचा हिरमोड

भोगावती : येथील भोगावती सहकारी साखर कारखान्यात कोणत्याही प्रकारची नोकर भरती करू नये, शिवाय असा भरतीचा विषय असल्यास त्वरित थांबवावा, असा आदेश कोल्हापूर विभागाच्या प्रादेशिक साखर सहसंचालकांनी भोगावती कारखान्याचे अध्यक्ष आणि कार्यकारी संचालकांना दिला आहे. त्यामुळे सत्ताधारी गटाच्या समर्थकांत आणि नोकरीच्या आशेवर बसलेल्या तरुणांचा हिरमोड झाला आहे.साखर संचालक कार्यालयास ४ एप्रिलला प्राप्त झालेल्या निवेदनात निवेदनकर्त्यांनी त्यांचा हक्क डावलून कारखान्यात नोकर भरतीचा घाट घातल्याचे म्हटले आहे. ही संभाव्य नोकर भरती थांबविण्याची मागणी केली आहे. भोगावती कारखान्याच्या पंचवार्षिक निवडणुकीची कार्यवाही सध्या सुरू आहे. या पार्श्वभूमीवर कोणत्याही स्वरूपाची, कोणत्याही संवर्गात कायमस्वरूपी, अंशकालीन अथवा रोजंदारी स्वरूपाची भरती प्रक्रिया राबविण्यात येऊ नये, असे स्पष्ट आदेश प्रादेशिक सहसंचालकांनी दिले आहेत.कारखान्याच्या संभाव्य नोकर भरतीविरुद्ध बळवंत शामराव बरगे (बरगेवाडी, ता. राधानगरी) यांनी सातत्याने विरोध केला आहे. आपला हक्क डावलून नोकर भरती केली जात असल्याच्या कारणावरून बरगे यांनी आंदोलन सुरू केले आहे. प्रादेशिक साखर सहसंचालकांनी दिलेल्या आदेशाने बरगे यांना काहीअंशी दिलासा मिळाला आहे. (वार्ताहर)संचालकांच्या बैठकीत चर्चा : पाटीलभोगावती साखर कारखान्यात कोणत्याही स्वरूपाची नोकर भरती करण्याबाबत या अगोदर संचालक मंडळाच्या बैठकीत विषय आलेला नाही. संभाव्य भरतीबाबत निवेदनावरून साखर सहसंचालकांनी कारखान्याला नोकर भरती करू नये म्हणून पत्र दिले आहे. हे पत्र संचालक मंडळाच्या बैठकीत चर्चेला घेऊन त्याबाबत निर्णय घेतला जाईल, अशी माहिती कारखान्याचे कार्यकारी संचालक एस. एस. पाटील यांनी दिली.