शहरं
Join us  
Trending Stories
1
Vaibhav Suryavanshi : फक्त १६ चेंडू खेळला अन् हवा करून गेला! वर्ल्ड रेकॉर्ड थोडक्यात हुकला, पण...
2
मोठी बातमी : भाजपचं धक्कातंत्र! विधान परिषद निवडणुकीसाठी ५ जणांची यादी जाहीर, कुणाला मिळाली संधी?
3
विदर्भकराचा इम्पॅक्ट! PBKS ला शह देण्यासाठी RR नं खेळलेली 'ती' चाल ठरली मॅचचा टर्निंग पॉइंट
4
नांदेड विमानतळ परिसरात ‘गूढ गोलाकार वस्तू’! उडती तबकडी की साधा बलून?
5
पोलीस आयुक्तांचा धडाकेबाज निर्णय, एकाच दिवसात ४० शस्त्र परवाने रद्द 
6
मंत्री उदय सामंत अंतरवाली सराटीत मनोज जरांगे यांच्या भेटीला, एक तास चर्चा; कारण काय?
7
बाबासाहेबांनी ध्वनी प्रदूषणाचे कधीच समर्थन केले नसते, हायकोर्टाने समाजाला विचार व तत्वज्ञानाची जाणिव करून दिली
8
निवडणूक संपताच पेट्रोल-डिझेल महागणार? केंद्र सरकारनं दिलं मोठं स्पष्टीकरण! काय होणार?
9
नागपूर भाजप शहराध्यक्ष तिवारींचा मोबाईल हॅक, आरोपींकडून लोकांना पैशांची मागणी
10
PBKS vs RR : वैभव-यशस्वीचा धमाका; फरेरा-दुबेचा फिनिशिंग टच! राजस्थानने रोखला पंजाबचा विजयरथ
11
भाजपचे धक्कातंत्र, विदर्भातून प्रस्थापितांऐवजी सहकारतज्ज्ञ संजय भेंडेंना संधी; ‘मायक्रो प्लॅनर’ म्हणून आहे ओळख
12
१ मे पासून खिशाला कात्री! बँकिंगसह 'हे' मोठे नियम बदलणार; गॅस सिलिंडर स्वस्त होणार की महागणार?
13
PBKS vs RR : 'वंडर बॉय' वैभव सूर्यवंशीनं धु धु धुतलं! मग अर्शदीपनं लो फुलटॉसवर हिशोब केला चुकता
14
‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ मिसिंग लिंकवर किती स्पीडने जाता येणार?; वेगमर्यादेची नियमावली आली!
15
विदर्भात १ मे पर्यंत पावसाळी ढग; पारा खाली येणार, पण उष्णतेची तीव्रता कायम राहणार
16
गुजरातमध्ये BJPचा डंका! १५ महानगरपालिकांवर कमळ फुलले; आप-काँग्रेस आपटले, कुणाला किती जागा?
17
PBKS vs RR: परफेक्ट सेटअप! १५० kmph वेगवान चेंडूसह पुन्हा प्रियांश आर्यवर भारी पडला जोफ्रा (VIDEO)
18
"हे 'सेल्फ रेडिकलायझेशन'चं प्रकरण, जिहाद करायचा म्हणजे..."; मिरा रोड हल्ल्यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्पष्टच बोलले
19
इराण-अमेरिका युद्धात UAE चा मोठा निर्णय; OPEC आणि OPEC+ गटातून बाहेर पडणार
20
म्हाडाच्या २६४० घरांच्या लॉटरीला मुदतवाढ; १४ मे पर्यंत अर्ज सादर करण्याची मुदत
Daily Top 2Weekly Top 5

कागदावरील सहकारी संस्थांचा शोध सुरू

By admin | Updated: July 2, 2015 00:44 IST

सप्टेंबरअखेर मोहीम : बंद संस्थांची नोंदणी होणार रद्द

कोल्हापूर : कोल्हापूरसह राज्यभरातील कागदावरील सहकारी संस्थांचे सर्वेक्षण करण्याबाबत राज्य सरकारने विशेष मोहीम हाती घेतली असून, कोल्हापूर जिल्ह्यातील ८७९५ संस्थांचे सर्वेक्षण बुधवारपासून सुरू झाले आहे. राज्यातील दोन लाख ३० हजार २९५ संस्थांची तपासणी करण्यात येणार आहे. त्यासंबंधीचे आदेश सहकार आयुक्त चंद्रकांत दळवी यांनी दिले आहेत.या संस्थांचे कामकाज जिल्हा उपनिबंधक कार्यालयाच्या अधिपत्याखालील उपनिबंधक व सहायक निबंधक कार्यालयामार्फत पाहिले जाते. या संस्थांपैकी काही संस्था या केवळ कागदोपत्री अस्तित्वात आहेत. त्यामुळे या मोहिमेंतर्गत अशा सहकारी संस्था अवसायनात घेऊन त्यांची नोंदणी रद्द करून कार्यरत असणाऱ्या संस्थांच्या गुणात्मक वाढीकडे लक्ष देण्याचे नियोजित केले आहे. तसेच यामुळे धोरणात्मक बाबींवर शासनास निर्णय घेताना संस्थांची अद्ययावत व अचूक माहिती उपलब्ध होण्यासही मदत होणार आहे. उपनिबंधक व सहायक निबंधक कार्यालयातील कर्मचारी, तसेच लेखापरीक्षण विभागातील सर्व अधिकारी व कर्मचारी त्यांच्या कार्यक्षेत्रातील सर्व संस्थांचे सर्वेक्षण करणार आहेत. ही मोहीम ३० सप्टेंबर २०१५ पर्यंत राबविली जाणार आहे. याबाबत संबंधित विभागातील अधिकारी व कर्मचाऱ्यांची बैठक घेऊन सविस्तर माहिती दिली आहे. सर्वेक्षण पूर्ण केल्यापासून प्रत्येक पंधरवड्यास विहित नमुन्यात सर्वेक्षणाचा अहवाल सादर करावयाचा आहे. जिल्हा उपनिबंधक कार्यालय एकत्रित अहवाल विभागीय सहनिबंधक यांना सादर करणार आहेत. विभागीय सहनिबंधक जिल्हा उपनिबंधकांचे सर्व अहवाल एकत्रित करून विभागाचा अहवाल सहकार आयुक्तांना सादर करणार आहेत. असा होणार सर्वेक्षणाचा कार्यक्रम४१ जुलै ते ३० सप्टेंबर २०१५ पर्यंत सर्वेक्षण १५ आॅक्टोबर : बंद संस्थांचे अवसायनाचे आदेश ३० नोव्हेंबर : अवसायनाचा अंतिम आदेश मंजूर करणे३१ डिसेंबर : अवसायनातील संस्थांची नोंदणी रद्द करणे१० जानेवारी २०१६ : सर्वेक्षणाचा अंतिम अहवाल आयुक्तांना सादर करणेसर्वेक्षणात काय बघणार.. संस्थेचे नांव - अध्यक्ष व सचिव यांची माहिती संस्थेची नोंदणी कधी झाली -संस्थेचे वर्गीकरण  नोंदणीकृत पत्ता - संस्थेचे कार्यक्षेत्र - संस्था नोंदणीकृत पत्त्यावर आढळून आली की नाही - नोंदणीकृत पत्त्यावर नसल्यास स्थलांतरित पत्त्यावर कार्यरत आहे का -शेवटच्या लेखापरीक्षणाचे वर्ष व वर्गवारी - वसूल भाग भांडवल (रक्कम रुपये)  नफा-तोटा (रक्कम रुपये) - शेवटची वार्षिक सभा झाल्याची दिनांक