शाहूवाडी तालुक्यात २५ सप्टेंबर रोजी लोक अदालत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 4, 2021 04:29 IST2021-09-04T04:29:26+5:302021-09-04T04:29:26+5:30

मलकापूर : कोल्हापूर जिल्हा विधी सेवा प्राधिकरण कोल्हापूर यांच्या आदेशाने, शाहुवाडी तालुका विधी सेवा समिती शाहूवाडी यांच्या वतीने दिनांक, ...

Lok Adalat on 25th September in Shahuwadi taluka | शाहूवाडी तालुक्यात २५ सप्टेंबर रोजी लोक अदालत

शाहूवाडी तालुक्यात २५ सप्टेंबर रोजी लोक अदालत

मलकापूर : कोल्हापूर जिल्हा विधी सेवा प्राधिकरण कोल्हापूर यांच्या आदेशाने, शाहुवाडी तालुका विधी सेवा समिती शाहूवाडी यांच्या वतीने दिनांक, २५ सप्टेंबर २०२१ रोजी लोक अदालत आयोजित करण्यात आली आहे, अशी महिती शाहूवाडी तालुका विधी सेवा समितीचे अध्यक्ष तथा प्रथम वर्गे न्याय दंडाधिकारी एच. आर. पाटील यांनी दिली. या लोक अदालतीमध्ये जिल्हा व सत्र न्यायालय, कोल्हापूर तसेच सर्व तालुका न्यायालयातील तडजोडीस पात्र व प्रलंबित वाद तसेच दाखल पूर्व प्रकरणांमध्ये दोन्ही पक्षकारांच्या सहमतीने आपसी तडजोडीने निकाली काढण्यात येणार आहेत. राष्ट्रीय लोक अदालतीमध्ये पक्षकारांना आपली बाजू मांडण्याची संधी मिळणार असून, दोन्ही पक्षकारांच्या सहमतीने होणार आहे. तरी याचा लाभ सर्वांनी घेण्याबाबत शाहुवाडी तालुका विधी सेवा समितीच्या वतीने आवाहन करण्यात येत असल्याचे न्यायदंडाधिकारी एच. आर. पाटील यांनी सांगितले.

Web Title: Lok Adalat on 25th September in Shahuwadi taluka