शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझवरुन इराणसोबत तणाव वाढला! पंतप्रधान मोदी आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्यात ४० मिनिटे चर्चा
2
युद्धाचा मोठा फटका! इराणचं २७० अब्ज डॉलर्सचं नुकसान; या ५ आखाती देशांकडे मागितली भरपाई
3
लोकसभेतील खासदारांची संख्या ८५० पर्यंत वाढणार, महाराष्ट्रातून किती निवडून जाणार? केंद्राने तयार केला मसुदा
4
षटकार खाल्ला, मग Kartik Tyagi नं १४८.१ kmph वेगासह त्रिफळा उडवत घेतला Sanju Samson चा बदला
5
मध्य पूर्वेतील तणाव : इटलीचा इस्रायलला मोठा दणका! पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांनी सर्व संरक्षण करार रोखले
6
शेतकऱ्याने मृत्युला कवटाळले, पोस्टमार्टमसाठी नातेवाईक दोन तास ताटकळले; बीड जिल्ह्यातील घटना
7
CSK साठी डोकेदुखी ठरतोय Ruturaj Gaikwad चा खराब फॉर्म; कमबॅक करण्यासाठी आता एकच मार्ग उरला
8
7 वर्षांपासून बेपत्ता! 10 हजार डॉलर्सचे बक्षीस, 'या' भारतीय विद्यार्थिनीला FBI का शोधतेय? जाणून घ्या...
9
पेट्रोल १८ तर डिझेल ३५ रुपयांनी महागणार?; ५ राज्यांच्या निवडणुकीनंतर दर वाढण्याची शक्यता
10
"मी आंबेडकरांची फॅन आहे", चिन्मयी सुमीतनं स्पष्टच सांगितलेलं 'जय भीम' म्हणण्यामागचं कारण
11
छत्तीसगडमधील वेदांता पॉवर प्लांटमध्ये बॉयलर स्फोटात १० जण ठार, अनेक जण जखमी
12
IPL 2026 : आधी एका रात्रीत दोन 'क्षेपणास्त्र' लॉन्च केली; आता काव्या मारनच्या SRH नं खेळला नवा डाव
13
आरजेडी-जेडीयूमध्ये पंख विस्तारले, भाजपामध्ये येऊन बनले मुख्यमंत्री; कोण आहेत सम्राट चौधरी?
14
तिजोरी रिकामी, कर्ज भारी! पाकिस्तानवर अमेरिकेचे नेमके किती कर्ज आहे?
15
आवडली नाही तर पैसे परत! 75% 'बायबॅक गॅरंटी'सह जबरदस्त SUV लॉन्च, जाणून घ्या किंमत...
16
Travel : चमत्कार! 'या' कुंडात फळे तरंगतात, पण बेलपत्र मात्र बुडतात; पाण्याखाली आहे महादेवाचे मंदिर! तुम्ही पाहिलेय का?
17
"नरेंद्र मोदी माझ्याशी नजर मिळवून बोलू शकत नाहीत, ट्रम्प यांच्या समोर फक्त...!"; राहुल गांधींचा निशाणा
18
छत्तीसगड हादरलं! वेदांता पॉवर प्लांटमध्ये भीषण स्फोट; ४० मजूर जखमी
19
पाकिस्तानची आंतरराष्ट्रीय नामुष्की ! अमेरिका-इराण चर्चेचे यजमानपद भूषवले, पण हॉटेलचे बिल थकवण्याची शहबाज सरकारवर आली वेळ
20
डोनाल्ड ट्रम्प यांचे 'ब्रह्मास्त्र' फेल! अमेरिकेची नाकेबंदी तोडून चीन-इराणची जहाजे होर्मुजमधून सुसाट
Daily Top 2Weekly Top 5

लॉकडाऊनचा निर्णय आठ तासांत मागे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 5, 2021 04:41 IST

कोल्हापूर : गोकुळ निवडणुकीनंतर लगेचच बुधवारपासून लॉकडाऊनच्या निर्णयावरून समाजमाध्यमांवर टीकेचा भडिमार झाल्यानंतर मंगळवारी आठ तासांतच हा निर्णय मागे घेण्यात ...

कोल्हापूर : गोकुळ निवडणुकीनंतर लगेचच बुधवारपासून लॉकडाऊनच्या निर्णयावरून समाजमाध्यमांवर टीकेचा भडिमार झाल्यानंतर मंगळवारी आठ तासांतच हा निर्णय मागे घेण्यात आला. लॉकडाऊन नाही तर नागरिकांनी १३ तारखेपर्यंत उत्स्फूर्तपणे जनता कर्फ्यू पाळावा, असे आवाहन पालकमंत्री सतेज पाटील, ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ व आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर यांनी केले.

कोल्हापूर जिल्ह्याचे लक्ष लागून राहिलेली गोकुळची निवडणूक नुकतीच पार पडली. मंगळवारी मतमोजणी सुरू झाल्यानंतर सकाळी दहा वाजता जिल्ह्यातील तीनही मंत्री व जिल्हा प्रशासनाच्या संयुक्त बैठकीत बुधवारी सकाळी अकरा वाजेपासून कडक लॉकडाऊनचा निर्णय घेण्यात आला. दुपारी साडेतीन वाजता याबाबतची बातमीदेखील माहिती कार्यालयाच्या माध्यमातून प्रसिद्ध करण्यात आली. त्यानंतर कोल्हापूरकरांनी संताप व्यक्त करीत फेसबुक, ट्विटर, व्हॉटस्‌ॲपवर टीका करायला सुरुवात केली, गोकुळ निवडणुकीवरून सर्वच राजकीय नेत्यांना शेलक्या भाषेत ट्रोल करण्यात आले. सायंकाळी सहा वाजता पालकमंत्री सतेज पाटील हे जिल्हाधिकारी कार्यालयात आले होते, त्यावेळी झालेल्या चर्चेनंतर जनता कर्फ्यूचा निर्णय घेण्यात आला. तीनही मंत्र्यांच्या वतीने याबाबतचे पत्रक प्रसिद्ध करून नागरिकांना १३ तारखेला सकाळी सात वाजेपर्यंत उत्स्फूर्तपणे जनता कर्फ्यू पाळण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

---

हे आहेत नियम

-अत्यावश्यक सेवा, वैध कारण, तातडीच्या वैद्यकीय गरजेशिवाय घराबाहेर पडू नये

-वैद्यकीय सुविधा व सेवा पूर्णवेळ सुरू ठेवाव्यात.

-अत्यावश्यक सेवा, किराणा दुकाने, बेकरी सकाळी सात ते अकरा या वेळेत उघडी राहतील. मात्र, नागरिकांनी दुकानात न जाता घरपोच सेवा मागवावी. अत्यावश्यक बाब नसेल तर वस्तू खरेदीसाठी घराबाहेर पडू नये.

-हॉटेल्स, रेस्टॉरंट यांनी फक्त घरपोच सेवा द्यावी.

-शेती व शेतीशी निगडित व मान्सूनपूर्व कामे सुरू ठेवावीत.

-अत्यावश्यक, निर्यात, निरंतर प्रक्रिया उद्योग आस्थापना यापूर्वीच्या नियमास बांधील असतील.

---

नेमके काय बदलले?

लॉकडाऊनचा निर्णय मागे घेताना दिलेली नियमावली व सध्या संचारबंदीअंतर्गत सुरू असलेल्या नियमावलीत कोणताही बदल करण्यात आलेला नाही. सर्व व्यवहार ‘जैसे थे’ ठेवून नागरिकांना घराबाहेर न पडता घरपोच सेवा मागवावी असे सांगण्यात आले आहे. मग जनता कर्फ्यू हे नाव देऊन नेमके काय बदलणार आहे आणि काय साधले जाणार आहे, असा प्रश्न आता उपस्थित होत आहे.