Kolhapur: स्मशानभूमीत अघोरी पूजा; फरार मांत्रिक, साथीदार अटकेत
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 13, 2025 15:56 IST2025-11-13T15:54:21+5:302025-11-13T15:56:23+5:30
शिरोली : शिरोली गावच्या स्मशानभूमीत मध्यरात्री अघोरी अशी पूजा करणारा मांत्रिक किशोर लोहार आणि त्याचा एक साथीदार अशा दोघांना ...

Kolhapur: स्मशानभूमीत अघोरी पूजा; फरार मांत्रिक, साथीदार अटकेत
शिरोली : शिरोली गावच्या स्मशानभूमीत मध्यरात्री अघोरी अशी पूजा करणारा मांत्रिक किशोर लोहार आणि त्याचा एक साथीदार अशा दोघांना पोलिसांनी बुधवारी (दि. १३) सायंकाळी अटक केली.
शिरोली गावच्या पश्चिम बाजूस ब्रह्मनाथ पाणंद येथील स्मशानभूमीत ३० ऑक्टोबर रोजी रात्री अघोरी अशी पूजा केली. बाटलीत आत्मा बंद केला असून, “दोन दिवसांत त्याचे रिझल्ट मिळतील,” असे मांत्रिक किशोर लोहार बोलत होता. अघोरी कृत्याचे व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर संपूर्ण गावात एकच खळबळ उडाली. व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला तेंव्हापासून लोहार फरार झाला होता.
वाचा- बाटलीत आत्मा बंद केलाय, दोन दिवसात काम मार्गी लागेल, कोल्हापुरातील शिरोलीत स्मशानभूमीत अघोरी पूजा-video
दरम्यान, पाच-सहा दिवसांपूर्वी लोहार गावात आला आणि तोंडावर रुमाल बांधून लपून फिरत होता. याबाबत शिरोली पोलिसांना माहिती मिळाली. पोलिसांनी बुधवारी सायंकाळी लोहारला शिरोली येथील घरातून उचलून पोलिस ठाण्यात आणले. अधिक तपास करताना लोहारसोबत त्याचा एक साथीदार होता, अशी माहिती मिळाली. त्यालाही पोलिसांनी अटक केली आहे.