कोल्हापुरातील स्थानिक व्यावसायिकांना कोट्यवधींचा गंडा, उचल घेऊन उत्तर प्रदेशचा बबलू खान झाला पसार 

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 18, 2025 17:03 IST2025-02-18T17:02:47+5:302025-02-18T17:03:11+5:30

जागा घेऊन तीनमजली इमारत उभी केली. यावर त्याने एका पतसंस्थेचे मोठे कर्ज उचलले

Local businessmen in Kolhapur were cheated of crores Bablu Khan of Uttar Pradesh was picked up and spread | कोल्हापुरातील स्थानिक व्यावसायिकांना कोट्यवधींचा गंडा, उचल घेऊन उत्तर प्रदेशचा बबलू खान झाला पसार 

कोल्हापुरातील स्थानिक व्यावसायिकांना कोट्यवधींचा गंडा, उचल घेऊन उत्तर प्रदेशचा बबलू खान झाला पसार 

शिरोली : स्क्रॅप व्यवसायात परतावा जादा देण्याच्या अटीवर तीन कोटींहून अधिक उचल घेऊन उत्तर प्रदेशचा बबलू खान पसार झाल्याने स्थानिक व्यावसायिकांचे धाबे दणाणले आहेत. याबाबत फसवणूक झालेल्या २० हून अधिक जणांनी पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.
दोन दिवसांपूर्वी रात्रीच्या वेळी खान आपल्या कुटुंबीयांसमवेत घराला कुलूप लावून गायब झाला. त्याचा मोबाइलही बंद असल्याने फसवणूक झालेल्या व्यावसायिकांनी थेट शिरोली एमआयडीसी पोलिसांत धाव घेतली.

बबलू खान हा मूळचा उत्तर प्रदेशातील आहे. काही वर्षांपूर्वी कामानिमित्त तो शिरोलीत आला. काही स्थानिकांच्या मदतीने तो स्क्रॅप व्यवसायात आला. त्याची कामाची पद्धत, स्क्रॅपची देवाणघेवाण स्थानिक व्यावसायिकांना भुरळ घालणारी होती. त्यामुळे अनेक जणांनी त्याच्याशी सलगी करत आर्थिक गुंतवणूक सुरू केली. सुरुवातीच्या टप्प्यात खानने आर्थिक व्यवहार चांगला सांभाळला. यातून त्याने शिरोली येथे जागा घेऊन तीनमजली इमारत उभी केली. 

या इमारतीवर त्याने एका पतसंस्थेचे मोठे कर्ज उचलले आहे. हे कर्जही आता थकबाकीत आहे. काही व्यावसायिकांनी खानशी मैत्री करून मोठी उलाढाल करत स्वतःचा फायदा करून घेतला आहे; पण खानच्या अचानक गायब होण्याने अनेकांचे धाबे दणाणले आहेत. त्याचा शोध घेऊन वसुली होईलच, याची शाश्वती नाही. त्यामुळे पुढे काय, हा प्रश्न अनुत्तरीतच आहे.

पोलिस या सर्व प्रकरणाची दोन्ही बाजूने चौकशी करणार असल्याने लवकरच सत्य समोर येईल, अशी अपेक्षा आहे. याबाबत तपासणी पोलिस अधिकारी यांना विचारले असता तपास सुरू आहे, अर्जदारांनी नमूद केलेल्या रकमेबाबत खातरजमा केली जात आहे. त्यानंतर रितसर गुन्हा दाखल करणार असल्याचे सांगण्यात आले.

Web Title: Local businessmen in Kolhapur were cheated of crores Bablu Khan of Uttar Pradesh was picked up and spread

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.