नाट्य परिषदेतर्फे गुुरुवारी सांगतो ऐका कथाकथकन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 23, 2021 04:24 IST2021-03-23T04:24:56+5:302021-03-23T04:24:56+5:30

कोल्हापूर : लेखक व. पू. काळे यांच्या जयंतीनिमित्त अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेतर्फे गुरुवारी (दि. २५) व. पू. ...

Listen to the storytelling on Thursday by Natya Parishad | नाट्य परिषदेतर्फे गुुरुवारी सांगतो ऐका कथाकथकन

नाट्य परिषदेतर्फे गुुरुवारी सांगतो ऐका कथाकथकन

कोल्हापूर : लेखक व. पू. काळे यांच्या जयंतीनिमित्त अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेतर्फे गुरुवारी (दि. २५) व. पू. व जयवंत दळवी यांच्या कथांवर आधारित ‘सांगतो ऐका’ या कथाकथनाच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. केशवराव भोसले नाट्यगृहात सायंकाळी सहा वाजता रसिकांना हा कार्यक्रम अनुभवता येणार आहे.

कधी काळी कथा सांगती जनक कथांचे या नावाने शंकर पाटील, द. मा. मिरसदार, ग. दि. माडगुळकर असे दिग्गज लेखक कथाकथनाचे कार्यक्रम करीत; पण मध्यंतरीच्या काळात यात खंड पडला. पण दीपक रेगे या नाट्य कलावंताने हे शिवधनुष्य उचलले आहे. ते व. पू. तसेच जयवंत दळवी यांच्या कथा नाट्यमयरीत्या सादर करतात. त्यांनी एकपात्री कलाकार परिषदेचे अध्यक्षपदही भूषविले आहे. तरी रसिकांनी या कार्यक्रमाचा लाभ घ्यावा, असे आवाहन अध्यक्ष आनंद कुलकर्णी यांनी केले आहे.

--

Web Title: Listen to the storytelling on Thursday by Natya Parishad