शहरं
Join us  
Trending Stories
1
विधान परिषदेच्या १७ जागांची लवकरच निवडणूक होणार!, जिल्हा परिषद निवडणुकीचा येणार नाही अडसर
2
'महिला आरक्षण' तरणार, तर मतदारसंघ पुनर्रचनेला विराेध हाेणार, लोकसभेत भाजपपुढे आव्हान
3
‘टाइम’च्या यादीत सुंदर पिचाई, विकास खन्नांसह रणबीर कपूर, डोनाल्ड ट्रम्प, पोप लिओ, जिनपिंग यांचा समावेश
4
मुंबई महापालिकेची तिजोरीच असुरक्षित! स्थायी समिती सभागृहात नगरसेविकेच्या पर्समधून २० हजार लंपास
5
उद्योगांना झटका; वीज झाली महाग, १ डिसेंबरपासून प्रतियुनिट ९.९० पैशांची झाली वाढ
6
आजचे राशीभविष्य, १६ एप्रिल २०२६: लाभ होतील, सुख-समृद्धी लाभेल; पण आजचा दिवस सावध राहण्याचा!
7
अमरावतीतील परतवाडा येथील व्हिडीओ कांड: मित्राच्या रूमवर केले दाेन मुलींचे लैंगिक शोषण
8
कायदा माहीत नव्हता, या सबबीवर आयटीआर न भरण्याच्या विलंबला माफी मिळणार नाही !
9
लेबनाॅन, इस्रायलदरम्यान ४० वर्षांनंतर शांतता चर्चा, दोन्ही देशांमध्ये अद्याप करार झाला नसल्याचे अमेरिकेने केले स्पष्ट
10
‘एनसीए’मध्ये जायला खेळाडू घाबरतात, मुनाफ पटेलचे खळबळजनक विधान
11
आरोग्य, निसर्ग संवर्धनासह ९ सामूहिक प्रतिज्ञा करा, नरेंद्र माेदींचं आवाहन
12
खासदार राघव चड्ढा यांची 'झेड प्लस' सुरक्षा हटवली
13
तुर्कस्थानातील शाळेत विद्यार्थ्याचा गोळीबार; ९ जण ठार
14
अनिल अंबानी प्रकरणात मोठी घडामोड! विश्वासू सहकाऱ्याला ईडीने ठोकल्या बेड्या
15
जागतिक व्यापारावर टांगती तलवार! इराणची तिन्ही समुद्र मार्ग बंद करण्याची धमकी; अमेरिकेच्या नाकेबंदीला नाकेबंदीनेच उत्तर
16
IPL 2026: भुवीसह रसीखला 'सलाम'! विराटची 'इम्पॅक्टफुल' खेळी; LSG ला पराभूत करत RCB टॉपला
17
देशाला अंधारात बुडवून मुनीर इराणला, शाहबाज सौदीला...! पाकिस्तान सरकारने मागितली जनतेची माफी...
18
१०० टक्के फिट नसतानाही जबरदस्त इम्पॅक्ट; पण किंग कोहलीचं अर्धशतक हुकल्यावर अनुष्काचा चेहरा पडला
19
धक्कादायक! 'बॉडी मसाज'च्या नावाखाली अंगावर नाचला; लातूरमध्ये तरुणाचा मणका सरकला, एकावर गुन्हा दाखल
20
वाराणसीत स्मार्ट मीटरचा कहर! २ युनिट वापराचे आले २००० बिल; दाद मागणाऱ्याची वीजच कापली, ग्रामीण भागातील जनता संतप्त
Daily Top 2Weekly Top 5

वीज पडून १४ बकरी मृत्युमुखी

By admin | Updated: May 21, 2014 17:32 IST

एक जखमी : कडगाव येथील घटना

 गडहिंग्लज : कडगाव (ता. गडहिंग्लज) येथील तळीमाळ नावाच्या शेतात आणि गावातील जुन्या पोस्ट गल्लीतील कडूनिंबाच्या झाडावर वीज कोसळून तळीमाळ शेतातील घटनेत १४ बकरी मृत्युमुखी पडली; तर विष्णू दामोदर कदम (वय ४५, रा. जालना) हे जखमी झाले; तर पोस्ट गल्लीतील घटनेत मंगल बाबूराव चौगुले (३५, रा. कडगाव) यांनाही धक्का बसला. मात्र, दोघांची प्रकृती ठीक आहे. ही घटना आज, मंगळवारी दुपारी घडली. दुपारी चारच्या सुमारास वादळी वार्‍यासह वळवाच्या पावसाने कडगाव परिसराला झोडपले. त्याचवेळी दोन ठिकाणी विजा कोसळून वरील घटना घडल्या. वादळी वार्‍यामुळे अशोक राजाराम शेवाळे व सुनील ज्ञानदेव केसरकर यांचे शेडनेट जमीनदोस्त झाले, तर काही घरांचे पत्रे व कौले उडून गेली. श्री क्षेत्र आदमापूर येथील बाळूमामा देवस्थानची २००० बकरी कडगाव येथे चरण्यासाठी आली आहेत.त्यांपैकी रावसाहेब पन्हाळकर यांच्या शेतात बसविण्यात आलेली बकरी अशोक रंगराव कुंभार यांच्या गट नंबर १३८४ (ब) या शेतात चरत होती. अचानक पाऊस आल्यामुळे आसर्‍यासाठी ती शिसवाच्या झाडाखाली आली होती. झाडाखाली साचलेल्या पाण्यात काही बकरी थांबली होती. त्याचवेळी झाडावर वीज कोसळली. ती वीज पाण्यात उतरल्यामुळे पाण्यातील १४ बकरी मृत्युमुखी पडली, तर पळून गेल्यामुळे एक पिल्लू बचावले. वीज पडल्यामुळे बकर्‍यांचे राखणदार विष्णू कदम यांच्या पाठीला दुखापत झाली. पळून जाताना ठेच लागून पडल्याने त्यांच्या चेहर्‍यालाही दुखापत झाली आहे. दरम्यान, जुन्या पोस्ट गल्लीतील मंगल चौगुले या परड्यात गवत आणण्यासाठी गेल्या असता कडूनिंबाच्या झाडावर वीज पडली. त्यामुळे त्यांना जबरदस्त धक्का बसला. कदम व चौगुले यांच्यावर येथील उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू असून दोघांचीही प्रकृती ठीक आहे. तहसीलदार हनुमंत पाटील, निवासी नायब तहसीलदार रामदास खोत, पोलीस निरीक्षक रामदास इंगवले, सभापती अमर चव्हाण, जिल्हा परिषद सदस्य शिवप्रसाद तेली, उपसरपंच नेताजी पाटील यांनी घटनास्थळी भेट दिली. मंडल अधिकारी प्रकाश जोशिलकर व तलाठी संजय राजगोळे, पोलीस पाटील पुंडलिक चिकोडे, पशुसंवर्धन अधिकारी घालवाडकर व मुल्ला यांनी घटनेचा पंचनामा केला. (प्रतिनिधी)