शहरं
Join us  
Trending Stories
1
‘थलपती’ बनला मुख्यमंत्री! विजय यांनी घेतली तामिळनाडूच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ
2
भारतानं 'असं' कोणतं सीक्रेट ऑपरेशन राबवलं?; बांगलादेशवर धुराचा लोट दिसला, सरकारनं मौन बाळगलं
3
मातृदिन विशेष: हंबरून वासराले, चाटते जवा गाय; तिच्यामंदी दिसते मले, तवा माही माय
4
मोठी कारवाई! ग्वाल्हेरमध्ये पाकिस्तानी सायबर नेटवर्कचा पर्दाफाश; हॉटेलमधून ४ एजंटना अटक
5
ममतेचे जिवंत उदाहरण, लेकाच्या जीवासाठी माऊलीची तळमळ; किडनीच्या रूपाने पुन्हा देणार जन्म
6
१७ वर्षांपूर्वीची सिक्रेट भेट, एक फोन कॉल अन्..., राहुल-विजयच्या मैत्रीने असं जुळलं तामिळनाडूचं सत्तासमीकरण
7
नवं समीकरण! डिजिटल वॉरियर्स, डॉक्टर्स अन् युवा चेहरे; टीम विजय यांच्या कॅबिनेटमध्ये कुणाला संधी?
8
...तर १६ ऑगस्टपासून 'त्या' रिक्षाचालकांवर कारवाई करणं अटळ; परिवहन मंत्र्‍यांनी पुन्हा बजावलं
9
लग्नाच्या वाढदिवशीच गरोदर महिलेची हत्या; हुंड्यात 'बुलेट' न मिळाल्याने सासरच्यांनी घेतला जीव
10
‘पालखी निघाली राजाची…’, लालबागच्या राजावरील लोकप्रिय गीताचे संगीतकार नितीन मोरजकर यांचं निधन
11
"रशिया-युक्रेन युद्ध अखेरच्या टप्प्यात.."; पुतिन यांचे संकेत, ३ दिवसांच्या युद्धविरामाची घोषणा
12
टीसीएस' प्रकरण: निदा खानसोबत 'स्पॉट पंचनामा', नाशिक पोलिस आयुक्तालयात कुटुंबीयांचीही चौकशी
13
अवघ्या २९ वर्षाची किर्तना तामिळनाडूत बनणार मंत्री; थलापती विजय यांच्यासोबत आज घेणार शपथ
14
आजचे राशीभविष्य, १० मे २०२६: 'या' २ राशीच्या लोकांनी रागावर नियंत्रण ठेवा, अचानक खर्च होईल पैसा
15
ज्येष्ठ अभिनेत्री उषा चव्हाण संतापल्या, प्रशासनाला दिला अल्टिमेटम; पुण्यात नेमकं काय घडलं प्रकरण?
16
'आधार'मधील बायोमेट्रिक 'त्रुटीभार' नागरिकांवर नको; मुंबई उच्च न्यायालयाने दिले 'यूआयडीएआय'ला निर्देश
17
हरयाणा ते बंगाल : मोदींच्या नेतृत्वात ९ राज्यांत भाजपाचे मुख्यमंत्री; अस्तित्व नसलेल्या राज्यांत रोवले भक्कम पाय
18
बोगस दिव्यांग कर्मचाऱ्यांवर उच्च न्यायालयाचा बडगा! राज्यात १२० दिवसांत पडताळणी अनिवार्य
19
विशेष लेख: विरोधी पक्ष दिसला तर लाखाचे बक्षीस द्यायचे का?
20
९४ हजार विद्यार्थ्यी मराठी विषयात नापास, अभिजात दर्जा मिळालेल्या मराठीत अपयश ही धोक्याची घंटा
Daily Top 2Weekly Top 5

पावसाची नुसतीच भुरभुर, मात्र पाणलोट क्षेत्रात जोर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 13, 2020 17:32 IST

अतिवृष्टीचा इशारा दिलेल्या हवामान खात्याला गुरुवारीही पावसाने हुलकावणी दिली. धुवाधार पावसाच्या अंदाजाच्या जागी दिवसभर नुसतीच भुरभुर सुरू राहिली. आश्लेषा नक्षत्राचे शेवटचे दोन दिवस उरले आहेत.

ठळक मुद्देपावसाची नुसतीच भुरभुर, मात्र पाणलोट क्षेत्रात जोरचित्री धरण ओसंडून: धरणातील पाणीसाठा वाढला

कोल्हापूर : अतिवृष्टीचा इशारा दिलेल्या हवामान खात्याला गुरुवारीही पावसाने हुलकावणी दिली. धुवाधार पावसाच्या अंदाजाच्या जागी दिवसभर नुसतीच भुरभुर सुरू राहिली. आश्लेषा नक्षत्राचे शेवटचे दोन दिवस उरले आहेत.

रविवारी मघा (सासूचा पाऊस) नक्षत्र निघत आहे. पाऊस जोर धरेल असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. दरम्यान, गुरुवारी दिवसभर पावसाची भुरभुर राहिली तरी धरणांच्या पाणलोट क्षेत्रात मात्र जोर वाढल्याने पाणीसाठा वाढत चालला आहे.

जिल्ह्यात गुरुवारी सकाळी आठ वाजता संपलेल्या २४ तासांत १५.९५ च्या सरासरीने १९१ मिलिमीटर पाऊस पर्जन्यमापकावर नोंदवला गेला आहे. गगनबावड्यापेक्षा एक मि.मी.ने राधानगरीत जास्त पाऊस झाला आहे. यंदाच्या पावसाळ्यात असे प्रथमच घडले आहे.

राधानगरीत ३१, गगनबावड्यात ३०, शाहूवाडी २५, चंदगड २३, भुदरगड २०, पन्हाळा १९, आजरा १८, गडहिग्लज ८, करवीर ७, कागल ४, हातकणंगले २, शिरोळ १ मि.मी. असा पाऊस झाला आहे.

पाऊस कमी झाल्याने पूरही ओसरला असून नद्यांचे पाणी पात्रात आले आहे. मात्र नदीकाठ अजून गाळाने भरलेला आहे. अजूनही २५ बंधारे पाण्याखाली आहेत. तथापि धरणांच्या पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर कायम आहे. गुरुवारी २७ ते ९४ मि.मी. असा पाऊस झाला आहे.

पाऊस असल्याने धरणे एकापाठोपाठ एक ओसंडून वाहत आहेत. गुरुवारी दुपारी आजऱ्यातील चित्री धरण १०० टक्के भरून सांडव्यावरून पाणी वाहू लागले. याआधीच राधानगरी, जांबरे, जंगमहट्टी, घटप्रभा, कोदे, ही धरणे १०० टक्के भरली असल्याने ही संख्या आता सहावर पोहोचली आहे. काळम्मावाडी धरण ९० टक्के भरले आहे. वारणा ८४ टक्के, तर तुळशी ८६ टक्के भरले आहे.

तुळशी, चिकोत्रा वगळता सर्व धरणांतून विसर्ग

तुळशी, चिकोत्रा वगळता जिल्ह्यातील सर्व १२ प्रकल्पांतून पाण्याचा विसर्ग सुरू आहे. राधानगरीचा तीन क्रमांकाचा एक दरवाजा खुला असून २८०० क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे. वारणेतून ७२११, काळम्मावाडीतून ४४००, कासारीतून १७५०, जांबरेतून १२५६, घटप्रभातून १०६९ असा सर्वाधिक विसर्ग सुरू आहे. अन्य प्रकल्पांतून १०० ते ४०० क्युसेक असा किरकोळ विसर्ग होत आहे.
 

टॅग्स :Rainपाऊसkolhapurकोल्हापूर