Kolhapur: सांगरुळमध्ये सराफावर जीवघेणा हल्ला; ५ लाखांची लूट, हात-पाय बांधून टाकले उसात
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 23, 2026 12:29 IST2026-03-23T12:29:09+5:302026-03-23T12:29:26+5:30
मोपेडवरून पाठलाग करत आलेले तिघे एका सीसीटीव्हीत कैद

Kolhapur: सांगरुळमध्ये सराफावर जीवघेणा हल्ला; ५ लाखांची लूट, हात-पाय बांधून टाकले उसात
सांगरुळ : येथे शनिवारी रात्री लक्ष्मी ज्वेलर्सचे तेजाराम पेराजी माळी-सुंदेशा (वय ४५, रा. शुक्रवारपेठ कोल्हापूर ) यांना अडवून, पिस्तूलचा धाक दाखवत मारहाण करत लुटल्याची घटना घडली. ज्वेलरीमधून कोल्हापूरकडे घरी परतत असताना, सांगरुळ स्मशानभूमीजवळ हा प्रकार घडला. या घटनेमुळे व्यापारी वर्गात भीतीचे वातावरण पसरले असून, ग्रामीण भागातील रात्रीच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.
माळी रात्री आपले दुकान बंद करून कोल्हापूरकडे जाताना विलास कॉर्नर परिसरात दबा धरून दोन हल्लेखोर तर पाठलाग करत आलेल्या तीन हल्लेखोरांनी त्यांना अडवले. माळी यांना शेतात ओढत नेऊन हात-पाय बांधून, तोंडात बोळा घालून तोंडाला चिकटपट्टी लावून त्यांच्याकडील ६ तोळे सोन्याचे दागिने घेतले. माळी यांची गाडी दुसरीकडे तर मोबाईल तिसरीकडेच फेकून दिला. रात्री बाराच्या सुमारास सांगरुळ येथील तरुण घरी येताना त्यांना हा प्रकार लक्षात आल्यानंतर माळी यांना तातडीने रुग्णालयात दाखल करून पोलिसांना कळवले.
पोलिस उपाधीक्षक सुजित क्षीरसागर, पोलिस निरीक्षक बाबासाहेब सरवदे, पोलिस उपनिरीक्षक शंकर कळकुटे, विजय गुरव, विजय कळसकर, सुजित दावणे, यांनी घटनास्थळी येऊन पाहणी केली. यावेळी स्टेला या श्वानाला आणून तपास करण्यात आला, पण डॉग गाडीपर्यंत येऊन घुटमळत राहिला.
सीसीटीव्हीत कैद...
सोनाराची रेकी करून त्याचा एका मोपेडवरून पाठलाग करत आलेले तिघे एका सीसीटीव्हीत कैद झाले आहेत तर विलास कॉर्नर जवळ बसले होते. आडवी गाडीवरून त्याच्या गळपट्टीला धरून ओढत शेतवडीत घेऊन गेले. तोंडात बोळा घातल्याने त्याला बोलता आले नाही.