शहरं
Join us  
Trending Stories
1
"इराण तुम्हाला दोन मिनिटात उद्ध्वस्त करेल", अमेरिकेचे अध्यक्ष ट्रम्प इटलीच्या पंतप्रधान मेलोनींवर भडकले 
2
IPL 2026 : चुकांवर चुका! तरीही CSK नं मारली बाजी; KKR च्या विजयाची पाटी अजूनही कोरीच
3
१८ अश्लील व्हिडीओ, ३९ फोटो आणि ८ तरुणींची पटली ओळख; अमरावतीत अयान अहमदसह साथीदाराने कळस गाठला
4
होर्मुझवरुन इराणसोबत तणाव वाढला! पंतप्रधान मोदी आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्यात ४० मिनिटे चर्चा
5
नूरचं अनोख सेलिब्रेशन! अजिंक्य रहाणे पाठोपाठ IPL मधील महागड्या खेळाडूला स्वस्तात तंबूत धाडले; अन्....
6
'राज्य सरकारचा निर्णय एकतर्फी, लोकशाहीविरोधी', बाजार समिती संचालक मंडळ बरखास्तीवर जयंत पाटील संतापले
7
सरसंघचालक भागवत यांनी घेतली माजी सरन्यायाधीश शरद बोबडे यांची सदिच्छा भेट
8
युद्धाचा मोठा फटका! इराणचं २७० अब्ज डॉलर्सचं नुकसान; या ५ आखाती देशांकडे मागितली भरपाई
9
लोकसभेतील खासदारांची संख्या ८५० पर्यंत वाढणार, महाराष्ट्रातून किती निवडून जाणार? केंद्राने तयार केला मसुदा
10
षटकार खाल्ला, मग Kartik Tyagi नं १४८.१ kmph वेगासह त्रिफळा उडवत घेतला Sanju Samson चा बदला
11
डीआरआयचे 'सिमोल्लंघन'; कोकेन प्रकरणात दिल्ली, बेंगळुरू आणि हैदराबादवर नजर, तस्करांविरुद्ध जोरदार आघाडी
12
मध्य पूर्वेतील तणाव : इटलीचा इस्रायलला मोठा दणका! पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांनी सर्व संरक्षण करार रोखले
13
शेतकऱ्याने मृत्युला कवटाळले, पोस्टमार्टमसाठी नातेवाईक दोन तास ताटकळले; बीड जिल्ह्यातील घटना
14
CSK साठी डोकेदुखी ठरतोय Ruturaj Gaikwad चा खराब फॉर्म; कमबॅक करण्यासाठी आता एकच मार्ग उरला
15
7 वर्षांपासून बेपत्ता! 10 हजार डॉलर्सचे बक्षीस, 'या' भारतीय विद्यार्थिनीला FBI का शोधतेय? जाणून घ्या...
16
पेट्रोल १८ तर डिझेल ३५ रुपयांनी महागणार?; ५ राज्यांच्या निवडणुकीनंतर दर वाढण्याची शक्यता
17
"मी आंबेडकरांची फॅन आहे", चिन्मयी सुमीतनं स्पष्टच सांगितलेलं 'जय भीम' म्हणण्यामागचं कारण
18
छत्तीसगडमधील वेदांता पॉवर प्लांटमध्ये बॉयलर स्फोटात १० जण ठार, अनेक जण जखमी
19
IPL 2026 : आधी एका रात्रीत दोन 'क्षेपणास्त्र' लॉन्च केली; आता काव्या मारनच्या SRH नं खेळला नवा डाव
20
आरजेडी-जेडीयूमध्ये पंख विस्तारले, भाजपामध्ये येऊन बनले मुख्यमंत्री; कोण आहेत सम्राट चौधरी?
Daily Top 2Weekly Top 5

जुन्या प्रियकाराच्या खूनप्रकरणी दोघांना जन्मठेप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 25, 2021 19:26 IST

Court Crimenews Kolhapur- प्रेमसंबधास अडथळा ठरणार्या पहिल्या प्रियकाराचा खून करुन त्याचा काटा काढल्याप्रकरणी न्यायालयाने संतोष पुंडलिक कापसे (वय २४ रा. वाठार तर्फ वडगाव ता. हातकणंगले) व दमयंती राजू यादव (वय ३० रा. इंदिरानगर, इचलकरंजी) यांना दोषी ठरवून जन्मठेपेची तसेच सात वर्षे कारावास व प्रत्येकी तीन हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली.

ठळक मुद्देजुन्या प्रियकाराच्या खूनप्रकरणी दोघांना जन्मठेप सहा वर्षांनी निकाल : वाठार येथे प्रेमसंबधात ठरला अडथळा

कोल्हापूर : प्रेमसंबधास अडथळा ठरणार्या पहिल्या प्रियकाराचा खून करुन त्याचा काटा काढल्याप्रकरणी न्यायालयाने संतोष पुंडलिक कापसे (वय २४ रा. वाठार तर्फ वडगाव ता. हातकणंगले) व दमयंती राजू यादव (वय ३० रा. इंदिरानगर, इचलकरंजी) यांना दोषी ठरवून जन्मठेपेची तसेच सात वर्षे कारावास व प्रत्येकी तीन हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली.

दुसरे जिल्हा व सत्र न्यायाधिश बी. डी. शेळके यांनी शिक्षा सुनावली. सरकारी वकील अमित महाडेश्वर यांनी काम पाहीले. जून २०१४ मध्ये वाठार येथे सुशांत मोरे याचा खून करून पुरावा नष्ठ करण्याचा प्रयत्न केला होता. वडगाव पोलिसात हा गुन्हा नोद आहे.खटल्याची पार्श्वभूमी अशी की, दमयंती यादव ह्या मृत सुशांत मोरे यांचे वडिल दत्ता मोरे यांच्याकडे कामास होती. तेंव्हा तिचे सुशांतसोबत प्रेम जुळले. दरम्यान, तेथील संतोष कापसे याने सातारा येथे हॉटेल व्यवसाय सुरु केला. तेथे दमयंती कामास गेल्या. यावेळी संतोष आणि दमयंती यांच्या प्रेमसंबंध जुळले.

हे सुशांतला समजले. त्यातून वाद होत होते. दि. २५ जून २०४ ला सुशांत हा कापसे राहात असलेल्या ठिकाणी आला. तेथे संतोष व दमयंती यानी प्रेमात अडथळा ठरणार्या सुशांतला बॅटने मारुन खून केला. मृतदेह किचन कट्ट्याखाली लपवला. गुन्ह्यात सापडण्याच्या भितीने दोघांनी सुशांतचा मृतदेह पोत्यात बांधून त्याच्याच दुचाकीवरुन निलेवाडी ते ऐतवडे रस्त्यावरील ऊसाच्या शेतात टाकला व पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न केला.याबाबत वडगाव पोलिसात गुन्हा दाखल झाला. न्यायालयात दोषारोप पत्र दाखल झाल्यानंतर ॲड. महाडेश्‍वर, ॲड. एस.एम.पाटील यांनी काम पाहिले. सतरा साक्षीदार तपासले. युक्तीवादानंतर न्यायाधिशांनी आरोपींना दोषी ठरविले. गुरुवारी दोघांना जन्मठेपेची शिक्षा सुनावली. खटल्यात ॲड. झेबा पठाण, ॲड. गजानन कोरे, सहाय्यक फौजदार एम.एम.नाईक, पैरवी अधिकारी मिलींद टेळी यांचे सहकार्य लाभले. तपास वडगाव पोलीस ठाण्याचे सहायक पो. नि. संजीव पाटील, उपनिरीक्षक गणेश वारोळे यांनी केला. 

टॅग्स :Courtन्यायालयkolhapurकोल्हापूरCrime Newsगुन्हेगारी