कोगनोळीतील समस्यांचे प्राधान्याने निराकरण करु : उत्तम पाटील

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 9, 2021 04:29 IST2021-09-09T04:29:31+5:302021-09-09T04:29:31+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क कोगनोळी : कोगनोळीवर आमचे विशेष प्रेम आहे त्यामुळे कोगनोळीतील समस्यांचे प्राधान्याने निराकरण करू, अशी ग्वाही अरिहंत ...

Let's solve the problems in Kognoli with priority: Uttam Patil | कोगनोळीतील समस्यांचे प्राधान्याने निराकरण करु : उत्तम पाटील

कोगनोळीतील समस्यांचे प्राधान्याने निराकरण करु : उत्तम पाटील

लोकमत न्यूज नेटवर्क

कोगनोळी : कोगनोळीवर आमचे विशेष प्रेम आहे त्यामुळे कोगनोळीतील समस्यांचे प्राधान्याने निराकरण करू, अशी ग्वाही अरिहंत उद्योग समूहाचे कार्याध्यक्ष उत्तम पाटील यांनी दिली. ते वार्ड क्रमांक एक मधील कूपनलिकेचे पाणी पूजन व लोकार्पण सोहळ्यानिमित्त बोलत होते.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी बिरदेव यात्रा कमिटी अध्यक्ष बाबूराव कगुडे हे होते. प्रास्ताविक जय किसान पीकेपीएसचे चेअरमन उमेश पाटील यांनी केले. प्रारंभी कूपनलिकेचे पाणी श्री गणेशास अर्पण करून पाण्याचे पूजन उत्तम पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. उत्तम पाटील यांनी कूपनलिका खोदून दिल्याबद्दल बाबूराव कगुडे यांच्या हस्ते शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.यावेळी सागर जाधव, मनीषा परीट, रामचंद्र कागले यांनी आपल्या मनोगतातून उत्तम पाटील यांच्या कार्याचा गौरव केला.यावेळी निपाणीचे माजी नगराध्यक्ष शिरीष कमते, प्रकाश गायकवाड, किरण चौगुले, अजित पाटील, ग्रामपंचायत सदस्य सुजित माने, सदस्या शोभा मानगावे, पीकेपीएसचे व्हाईस चेअरमन प्रवीण पाटील, विठ्ठल कोळेकर यांच्यासह अन्य मान्यवर व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. शेवटी सचिन परीट यांनी आभार मानले.

फोटो ओळ : कूपनलिका पाणी पूजन व लोकार्पण प्रसंगी युवा नेते उत्तम पाटील यांचा सत्कार करण्यात आला.

080921\img20210907191002.jpg

कूपनलिका पाणी पूजन व लोकार्पण प्रसंगी युवा नेते उत्तम पाटील यांचा सत्कार करण्यात आला.

(छाया : बाबासो हळिज्वाळे)

Web Title: Let's solve the problems in Kognoli with priority: Uttam Patil