शहरं
Join us  
Trending Stories
1
Vaibhav Suryavanshi : फक्त १६ चेंडू खेळला अन् हवा करून गेला! वर्ल्ड रेकॉर्ड थोडक्यात हुकला, पण...
2
मोठी बातमी : भाजपचं धक्कातंत्र! विधान परिषद निवडणुकीसाठी ५ जणांची यादी जाहीर, कुणाला मिळाली संधी?
3
पोलीस आयुक्तांचा धडाकेबाज निर्णय, एकाच दिवसात ४० शस्त्र परवाने रद्द 
4
मंत्री उदय सामंत अंतरवाली सराटीत मनोज जरांगे यांच्या भेटीला, एक तास चर्चा; कारण काय?
5
निवडणूक संपताच पेट्रोल-डिझेल महागणार? केंद्र सरकारनं दिलं मोठं स्पष्टीकरण! काय होणार?
6
नागपूर भाजप शहराध्यक्ष तिवारींचा मोबाईल हॅक, आरोपींकडून लोकांना पैशांची मागणी
7
PBKS vs RR : वैभव-यशस्वीचा धमाका; फरेरा-दुबेचा फिनिशिंग टच! राजस्थानने रोखला पंजाबचा विजयरथ
8
भाजपचे धक्कातंत्र, विदर्भातून प्रस्थापितांऐवजी सहकारतज्ज्ञ संजय भेंडेंना संधी; ‘मायक्रो प्लॅनर’ म्हणून आहे ओळख
9
१ मे पासून खिशाला कात्री! बँकिंगसह 'हे' मोठे नियम बदलणार; गॅस सिलिंडर स्वस्त होणार की महागणार?
10
PBKS vs RR : 'वंडर बॉय' वैभव सूर्यवंशीनं धु धु धुतलं! मग अर्शदीपनं लो फुलटॉसवर हिशोब केला चुकता
11
‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ मिसिंग लिंकवर किती स्पीडने जाता येणार?; वेगमर्यादेची नियमावली आली!
12
विदर्भात १ मे पर्यंत पावसाळी ढग; पारा खाली येणार, पण उष्णतेची तीव्रता कायम राहणार
13
गुजरातमध्ये BJPचा डंका! १५ महानगरपालिकांवर कमळ फुलले; आप-काँग्रेस आपटले, कुणाला किती जागा?
14
PBKS vs RR: परफेक्ट सेटअप! १५० kmph वेगवान चेंडूसह पुन्हा प्रियांश आर्यवर भारी पडला जोफ्रा (VIDEO)
15
"हे 'सेल्फ रेडिकलायझेशन'चं प्रकरण, जिहाद करायचा म्हणजे..."; मिरा रोड हल्ल्यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्पष्टच बोलले
16
इराण-अमेरिका युद्धात UAE चा मोठा निर्णय; OPEC आणि OPEC+ गटातून बाहेर पडणार
17
म्हाडाच्या २६४० घरांच्या लॉटरीला मुदतवाढ; १४ मे पर्यंत अर्ज सादर करण्याची मुदत
18
१३६३५७ घन मीटर क्षमता, गायब होते LNG टँकर जहाज; अचानक भारताजवळ दिसले, महिनाभर कुठे होते?
19
इंडियन एअरलाईन बंद पडण्याची शक्यता! इंधनाच्या दरवाढीमुळे सरकारकडे मदतीची याचना; संघटनेकडे साकडे
20
Fastest Chase In IPL History : जे मुंबई इंडियन्सनं करून दाखवलं ते १८ वर्षांत कुणालाच नाही जमलं
Daily Top 2Weekly Top 5

चला, आकाशकंदील शुभेच्छापत्रे बनवूया

By admin | Updated: October 19, 2014 00:45 IST

लोकमत बालविकास मंच : मुलांच्या कला गुणांना वाव देणारी कार्यशाळा

कोल्हापूर : बालचमूंसाठी दिवाळीनिमित्त प्रतिवर्षाप्रमाणे 'लोकमत बालविकास मंच' आणि ‘सेव्हन वंडर्स द किड्स वेअर’ यांच्या संयुक्त विद्यमाने आकाशकंदील आणि शुभेच्छापत्रे बनविण्याची कार्यशाळा आयोजित केली आहे. कार्यशाळा सोमवारी (ता. २०) न्यू महाद्वार रोडवरील प्रिन्सेस पद्माराजे गर्ल्स हायस्कूलमध्ये सायंकाळी चार ते सहा या वेळेत होईल. दिवाळी अवघ्या काही दिवसांवर आली आहे. ती मोठ्या उत्साहाने साजरी करण्यासाठी बालचमू सज्ज झाले आहेत. त्यासाठी गेल्या दोन आठवड्यांपासून ते गड, किल्ले यांची तयार करीत आहेत. मुलांमधील सुप्त गुणांना वाव देण्यासाठी लोकमत बालविकास मंच, सेव्हन वंडर्स द किड्स वेअर यांच्यातर्फे आकाशकंदील आणि शुभेच्छापत्रे बनविण्याच्या कार्यशाळेचे आयोजन केले आहे. कार्यशाळेत लोकमत बालविकास मंच सदस्यांसाठी मोफत प्रवेश दिला जाणार आहे. अन्य इच्छुकांकडून ३० रुपये प्रवेश शुल्क भरून घेतले जाणार आहे. आकाशकंदील आणि शुभेच्छापत्रे बनविण्यासाठी आवश्यक साहित्य मुलांनी स्वत: आणावयाचे आहे. कार्यशाळेत सहभागी होण्यासाठी २० आॅक्टोबरअखेर सकाळी शहर लोकमत कार्यालयात नावनोंदणी करणे आवश्यक आहे.कार्यशाळेत उत्कृष्ट आकाशकंदील आणि शुभेच्छापत्रे बनविणाऱ्यांना सेव्हन वंडर्स द किड्स वेअर यांच्याकडून गिफ्ट म्हणून शॉपिंग व्हाऊचर दिले जाणार आहे. मंगळवार पेठेतील बिनखांबी रोडवरील विठ्ठल प्लाझा येथील सेव्हन वंडर्स द किड्स वेअर दुकानामध्ये, सहभागी होणाऱ्या प्रत्येकास खरेदीवर दहा टक्के सवलत मिळणार आहे. आकाशकंदिलाचे धडे देण्यासाठी सांगलीतील रंगकिरण ग्रुपचे अमोल शिंदे, तर शुभेच्छापत्र शिकविण्यासाठी इंद्रजा कुलकर्णी येणार आहेत. अधिक माहितीसाठी लक्ष्मीपुरीतील लोकमत कार्यालयात प्रत्यक्ष भेटावे किंवा नितीन यांच्या ७७९८३४४७४४ या भ्रमणध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे. (प्रतिनिधी)सोबत हे साहित्य हवे...आकाशकंदील तयार करण्यासाठी सहभागी होणाऱ्यांनी मध्यम आकाराचे १०० यूज अ‍ॅँड थ्रो चहाचे कप, पिनांच्या बॉक्ससह स्टेपलर, फेव्हिबॉँड, गोल्डन तार एक, अब्लावर्क १०० टिकल्या, तर शुभेच्छापत्रासाठी कात्री, टू इन वन चिकट टेप, पट्टी, पेन्सिल, रबर, फेव्हिकॉल, हॅँडमेड पेपर, आर्टपेपर, दोन वेगवेगळ्या रंगांचे टिंटेड पेपर, ओळखपत्र आकाराचा एक फोटो, टाचण्या, जुन्या वहीचा पुठ्ठा हे साहित्य आणावयाचे आहे.