शाश्वत विकासासाठी समर्पित, कल्पक उत्तरे शोधूया : ई. रवींद्रन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 10, 2020 21:07 IST2020-01-10T21:04:25+5:302020-01-10T21:07:27+5:30
शाश्वत विकास हा आता फक्त मानवी गरजांपुरता नाही. त्यासाठी सर्व विद्यमान पर्यावरण घटकांचा एकत्र विचार करून सर्वांनी सहभागी होणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण महामंडळाचे सदस्य सचिव ई. रवींद्रन यांनी शुक्रवारी येथे केले.

कोल्हापुरात शुक्रवारी सायबर इन्स्टिट्यूटमधील पर्यावरणविषयक आंतरराष्ट्रीय परिषदेच्या उद्घाटनप्रसंगी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे सचिव ई. रवींद्रन यांनी मार्गदर्शन केले. यावेळी डावीकडून एस. डी. कदम, प्रशांत गायकवाड, रवींद्र आंधळे, एन. एम. गुरव, मल्लिनाथ कलशेट्टी, प्रदीप वायचळ, वाय. बी. सोनटक्के, पी. एम. रोहाना, उल्हास परळीकर, राजेंद्र पोंडे, हेमंत शहा उपस्थित होते.
कोल्हापूर : शाश्वत विकास हा आता फक्त मानवी गरजांपुरता नाही. त्यासाठी सर्व विद्यमान पर्यावरण घटकांचा एकत्र विचार करून सर्वांनी सहभागी होणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण महामंडळाचे सदस्य सचिव ई. रवींद्रन यांनी शुक्रवारी येथे केले.
येथील छत्रपती शाहू इन्स्टिट्यूट आॅफ बिझनेस एज्युकेशन अॅँड रिसर्च सेंटर (सायबर) मध्ये पर्यावरण विभाग व महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण महामंडळ यांच्यातर्फे आयोजित एकदिवसीय परिषदेच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. या परिषदेचा विषय ‘शाश्वत विकास : २१व्या शतकाची उद्दिष्टे ’ असा होता. यावेळी महानगरपालिकेचे आयुक्त डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी, प्रदूषण नियंत्रण महामंडळाचे विभागीय अधिकारी प्रशांत गायकवाड प्रमुख उपस्थित होते.
या कार्यक्रमास सायबरचे माजी संचालक डॉ. व्ही. एम. हिलगे, संचालक डॉ. प्रदीप वायचळ, शिवाजी विद्यापीठातील अर्थशास्त्र विभागातील प्रा. डॉ. व्ही. बी. ककडे, रवींद्र आंधळे, एन. एम. गुरव, वाय. बी. सोनटक्के, पी. एम. रोहाना, उल्हास परळीकर, राजेंद्र पोंडे, हेमंत शहा उपस्थित होते. डॉ. एस. डी. कदम यांनी प्रास्ताविक केले. प्रा. रसिया पडळकर यांनी सूत्रसंचालन केले. प्रा. डी. एस. माळी यांनी आभार मानले.