शहरं
Join us  
Trending Stories
1
मंत्री गिरीश महाजनांना जाब विचारणाऱ्या 'त्या' महिलेची पहिली प्रतिक्रिया, मांडली सविस्तर बाजू! म्हणाली... 
2
सुरतमध्ये पहिला बॅरिअरमुक्त टोल नाका! १२० च्या वेगातही टोल कापणार, फास्टॅग बंद असेल किंवा नसेल तर...
3
राजस्थान पोलीस दलात खळबळ; IG किशन सहाय यांच्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल
4
महागाईचा भडका उडणार! चार वर्षांत पहिल्यांदाच इंधन दर वाढणार? LPG सिलिंडर ५० रुपयांनी महागणार तर पेट्रोल-डिझेल...!
5
पश्चिम बंगाल : १५ केंद्रांवरील पुनर्मतदानावेळी मोठा राडा; टीएमसी-भाजप कार्यकर्ते भिडले! बघा व्हिडिओ
6
पाकिस्तानात पेट्रोल ४५० पार, फक्त ५ दिवसांचा साठा शिल्लक; भारताशी तुलना करत मंत्र्यांनीच फोडला टाहो
7
India Women's T20 World Cup 2026 Squad : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा; कुणाला मिळाली संधी?
8
जनगणनेसाठी तुमची माहिती नोंदविली का? स्व-गणना कशी करावी, कोणती माहिती लागते...
9
इराणचा शांती प्रस्ताव ट्रम्प यांनी फेटाळला! होर्मुझची सामुद्रधुनी उघडण्याच्या बदल्यात ठेवली मोठी अट
10
'४ मे' रोजी शेअर बाजारापासून जरा ... रहा! एक्झिट पोलनुसार पश्चिम बंगालचा निकाल लागला तर...
11
LPG Price Hike: १९ किलोच्या कमर्शिअल सिलिंडरपेक्षा ५ किलोचा गॅस सिलिंडर ठरतोय महागडा; कसे ते पहा, कोण वापरते? 
12
पंजाब पोलीस संदीप पाठक यांच्या दिल्लीतील घरी पोहोचले, खासदार मागच्या दाराने पळून गेले
13
ज्येष्ठ साहित्यिक डॉ. जयप्रकाश घुमटकर यांचे निधन; ७२ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
14
एक दिवसाची सुट्टी सांगून गेले आयजी, साडे तीन महिने झाले पोलिसांनाच माहिती नाही...; राजस्थानमध्ये खळबळ...
15
७ वर्षांच्या इशांकचा भीमपराक्रम! श्रीलंका ते भारत २९ किमी अंतर नऊ तास पोहून गाठले; विश्वविक्रमाची नोंद
16
Pune crime: CCTV मधील ‘त्या’ दृश्याने उलगडलं संपूर्ण प्रकरण; चिमुरडीच्या मृत्यूने नसरापूर पेटलं
17
सिब्बल यांचा युक्तिवाद निष्फळ, ममतांना धक्का, सुप्रीम कोर्टाने मतमोजणीबाबत दिले असे आदेश
18
उल्हासनगरातील नेताजी चौकात मुलीच्या वादातून राडा, तरुणांच्या पोटात चाकू खुपसून जीवेठार मारण्याचा प्रयत्न 
19
'मला दाखवला तो मुलगा हीरोसारखा होता, हा तो नाहीच', मांडवात वधूचा धिंगाणा, थेट पोलीसच बोलावले, मग...
20
Video व्हायरल...! पापा की परी गटारीच्या झाकणावरून उडाली...! स्कुटरवरून सुस्साट आलेली, SUV ला ओव्हरटेक मारायला गेली... 
Daily Top 2Weekly Top 5

नव्या संशोधनाकडे प्र्राध्यापक, शिक्षकांची पाठ : कोतापल्ले

By admin | Updated: December 9, 2014 23:53 IST

सांगलीत कार्यक्रम : अण्णासाहेब लठ्ठे जयंतीनिमित्त स्नेहमेळावा

सांगली : आपल्याकडे शिकविण्यात येणारा अभ्यासक्रम हा मागासलेला असून, तो बदलण्यासाठी शिक्षक, प्राध्यापकांचाच विरोध होत आहे. नवीन संशोधन, सिध्दांत, अभ्यासाकडे त्यांचे होणारे दुर्लक्ष दुर्दैवी आहे, अशी खंत डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे माजी कुलगुरू व ज्येष्ठ साहित्यिक डॉ. नागनाथ कोतापल्ले यांनी व्यक्त केली. येथील नेमिनाथनगरातील नेमिनाथ भवनमध्ये आज (मंगळवार) अण्णासाहेब लठ्ठे यांच्या जयंतीनिमित्त सेवक स्नेहमेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. स्नेहमेळाव्यात आदर्श सेवकांंना डॉ. कोतापल्ले यांच्याहस्ते विविध पुरस्कार प्रदान करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी माजी खा. कल्लाप्पाण्णा आवाडे होते. लठ्ठे शिक्षण संस्थेचे अध्यक्ष सुरेश पाटील, अ‍ॅड. विजयकुमार सकळे आदी उपस्थित होते. कोतापल्ले म्हणाले की, जगभरात ज्ञानाचा स्फोट झाला असताना, आपण मात्र त्या प्रवाहात नाही. मागास शिक्षण पध्दतीमध्येच आपण रुतलो आहोत. यामध्ये बदल करायचा म्हटले, तर शिक्षक, प्राध्यापकांकडूनच याला विरोध होत आहे. नव्या संशोधनासाठी चांगला पगार दिला जात असतानाही याकडे दुर्लक्ष करण्यात येत आहे. केवळ गलेलठ्ठ पगार इतर क्षेत्रात गुंतवणुकीसाठीच वेळ आणि विचार खर्च होत आहे. त्यामुळे चांगला पगार देण्याचे उद्दिष्टच बाजूला रहात आहे. विद्यापीठे पदवी देणारे कारखाने बनत आहेत. माणसातील माणूसपण जागे करणाऱ्या शिक्षणाची आज गरज आहे. याकडे आता गांभीर्याने पाहण्याची नितांत गरज आहे. यावेळी जी. ए. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. वसंत कोडग, प्रभारी प्राचार्य गुंडूराव वसवाडे, कळंत्रेआक्का प्राथमिक विद्यामंदिराचे मुख्याध्यापक मुसा तांबोळी, शिपाई मल्लू हणमंत कोरव आदींचा पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला. स्वागत सुरेश पाटील यांनी केले. आभार बाळासाहेब मासुले यांनी मानले. सूत्रसंचालन सोनाली पाटील, एन. डी. बिरनाळे यांनी केले. यावेळी प्राध्यापक, शिक्षक, विद्यार्थी, विद्यार्थिनी उपस्थित होते. (प्रतिनिधी)