शहरं
Join us  
Trending Stories
1
विधान परिषदेची लाॅटरी काेणाकाेणास लागणार? महायुतीने एक जादाचा उमेदवार दिल्यास अटीतटीची लढत, मविआतील तीन पक्षांना मिळून एकच जागा
2
गुप्तधनाचे आमिष दाखवून ११ लाखांची 'अघोरी' लूट! चार वर्षांनंतरही भोंदू बाबा अन् पोलिस पत्नी फरार
3
रिक्षा-टॅक्सीचालकांना मराठी किती येते? भाषा चाचणी सक्तीची
4
ऐतिहासिक क्षण! ३४ वर्षांनी भेटलेल्या इजरायल-लेबनॉनमध्ये १० दिवसांसाठी युद्धबंदी; राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांची यशस्वी मध्यस्थी
5
MI vs PBKS : वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन सूर्याला बाकावर बसवणार? सलग चौथ्या पराभवानंतर काय म्हणाला पांड्या?
6
नाशिक TCS प्रकरण: आरोपीचा काका म्हणतोय, 'पीडित तरुणी आणि आरोपीत प्रेमप्रकरण...'; न्यायालय आवारात गोंधळ
7
MI vs PBKS : विकेट मिळेना; त्यात सोपा झेल सोडला! जिथं प्रभसिमरन चमकला, तिथं बुमराह ‘खलनायक' ठरला
8
रात्रभर तडफडत राहिले; राष्ट्रीय विधि विद्यापीठाच्या दोन विद्यार्थ्यांचा दुर्दैवी अंत
9
"उडता पंजाब..." सरपंच साब श्रेयससह प्रभसिमरनचा जलवा; मुंबई इंडियन्सला पराभूत करत पंजाब किंग्स अव्वल
10
"आमचे सैन्य पुन्हा युद्धासाठी सज्ज, डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशाची वाट बघतोय", अमेरिकेच्या संरक्षण मंत्र्यांचे विधान
11
MI vs PBKS : श्रेयस अय्यर झाला सुपरमॅन! Unbelievable Relay Catch सह पांड्याचा खेळ खल्लास (VIDEO)
12
"आज चाणक्य असते तर तेही थक्क झाले असते..."; महिला आरक्षण विधेयकावरून प्रियंका गांधी यांचा थेट निशाणा
13
Quinton de Kock चा मोठा धमाका! चार सामन्यांत बाकावर बसवलं; संधी मिळताच ठोकली कडक सेंच्युरी
14
"संसदेत अनेकदा राहुल गांधींची खिल्ली उडवली जाते, पण...!"; प्रियंका गांधींचा भाजपवर घणाघात
15
MI vs PBKS : पॉवर प्लेमध्ये 'सिंग इज किंग' शो! सूर्यावर ओढावली 'गोल्डन डक'ची नामुष्की
16
खळबळजनक खुलासा! पाकिस्तानने भडकवली नोएडामधील हिंसा; तंत्र बघून सुरक्षा यंत्रणा हादरल्या
17
कोणी विचारेना...! किंमत होती ५.५० लाख, मारुतीवर आठ वर्षांतच कार बंद करण्याची वेळ आली...
18
नेपाळने लादला भारतावर कर! १०० रुपयांहून अधिकच्या खरेदीवर आता द्यावा लागणार 'भंसार' कर; बालेन सरकारचा मोठा निर्णय
19
BJP मंत्र्यांच्या मुलाने पाच जणांना उडवले, उलट त्यांच्यावरच ओरडला- मी सायरन वाजवले, बाजूला का सरकला नाहीत?
20
युट्यूबवर ५ लाख व्ह्यूज आले तर बँक खात्यात किती पैसे जमा होणार? जाणून घ्या कमाईचं नेमकं गणित
Daily Top 2Weekly Top 5

सुचित्रा घोरपडे यांच्यावर कायदेशीर कारवाई

By admin | Updated: November 14, 2014 23:57 IST

सुरेश शिपूरकर : ‘बालकल्याण’च्या बदनामीचे प्रकरण

कोल्हापूर : बहिणींची ताटातूट होऊ नये, या शुद्ध हेतूने संस्थेने सहा वर्षांवरील मुलीला दत्तक देण्यासाठी कायदेशीर परवानगी घेतलेली आहे. मात्र, अ‍ॅड. सुचित्रा घोरपडे यांनी या प्रकरणातून संस्थेला नाहक बदनाम केले आहे; तसेच गोपनीयतेचा भंग करीत संस्थेत संशयास्पद वातावरण असल्याचे दाखविले आहे. हे दत्तक प्रकरण न्यायालयात असल्याने कोर्टावरही दबाव आणण्याचा प्रयत्न केल्याने त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करणार असल्याची माहिती बालकल्याण संकुलाचे उपाध्यक्ष सुरेश शिपूरकर, मानद कार्यवाह भिकशेठ पाटील व पद्मा तिवले यांनी पत्रकार परिषदेत दिली. त्यांनी सांगितले, शासन, बालन्यायालय, चाईल्ड वेल्फेअर कमिटी, चॅरिटी कमिशनर, बालकल्याण समिती यांच्या अधिपत्याखाली असलेल्या या संस्थेत आजवर कोणतेही काम बेकायदेशीरपणे झालेले नाही. आधीच पालकांचे छत्र हरपलेल्या बहिणींची ताटातूट होऊ नये, हा शुद्ध हेतू ठेवून कारा गाईडलाईन्सनुसार मोठी मुलगी सहा वर्षांच्या वरील वयोगटातील असली तरी तिला दत्तक देण्यासाठी आयुक्तालयाचीही परवानगी घेतली आहे. मुलीला दत्तक देण्यासाठीच्या सर्व कायदेशीर बाबी, परवानगीची कागदपत्रे न्यायालयात सादर केली आहेत. तरीही संस्थेवर विनाकारण आरोप केले जात आहेत. यापूर्वी दोन खटल्यांमध्ये घोरपडे यांनी सात ते आठ वर्षे दिरंगाई केली होती. या प्रकरणातही घोरपडे यांनी संस्थेला चुकीचा सल्ला दिला. गेल्या दीड वर्षापासून त्यांच्याकडे १७ खटले प्रलंबित आहेत. इतर दत्तक कामांत दिरंगाई करणे, पालकांना त्रास देणे, पालकांना फोनवरून धमकावणे, वारंवार सांगूनही कामात बदल न केल्याने त्यांनी या केसचे कामकाज पाहू नये, असे त्यांना लेखी कळविण्यात आले. शिवाय, १७ प्रकरणांची फी त्यांना आधीच अदा करण्यात आली होती. मात्र, त्यांनी सूडबुद्धीने कोर्टात रखडलेली इतर दत्तक प्रकरणे चालवली जाऊ नयेत, यासाठी प्रयत्न केला. अखेर त्यांना काढून दुसऱ्या वकिलांमार्फत ही प्रकरणे मार्गी लावली गेली.बहिणी आनंदात...भिकशेठ पाटील म्हणाले, या प्रकरणातील मोठी मुलगी अकरा व लहान मुलगी साडेपाच वर्षांची आहे. या दोघींची ताटातूट होऊ नये, यासाठी गेली बरेच वर्षे आम्ही प्रयत्न करीत होतो. आमच्या अपेक्षेप्रमाणे कुटुंब मिळाले. वर्षभरापूर्वी या दोघींना संबंधित पालकांकडे सांभाळण्यास दिले आहे. कायदेशीररीत्या दत्तक प्रक्रिया पूर्ण व्हायची असली तरी या दोघी या कुटुंबात आनंदाने राहत आहेत.