सरपंचपदासाठी उद्या आरक्षण सोडत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 06:58 IST2021-02-05T06:58:42+5:302021-02-05T06:58:42+5:30

कोल्हापूर : जिल्ह्यातील १ हजार २५ ग्रामपंचायतींमधील सरपंचपदाची आरक्षण सोडत उद्या, बुधवारी होणार आहे. तालुक्याच्या ठिकाणी तहसील कार्यालये अथवा ...

Leaving reservation for Sarpanchpada tomorrow | सरपंचपदासाठी उद्या आरक्षण सोडत

सरपंचपदासाठी उद्या आरक्षण सोडत

कोल्हापूर : जिल्ह्यातील १ हजार २५ ग्रामपंचायतींमधील सरपंचपदाची आरक्षण सोडत उद्या, बुधवारी होणार आहे. तालुक्याच्या ठिकाणी तहसील कार्यालये अथवा शासकीय कार्यालयाच्या आवारात ही सोडत प्रक्रिया होईल. या सोडतीवर ग्रामपंचायतीत सत्ता कोणत्या गटाची राहील हे ठरणार असल्याने विजयी उमेदवारांमध्ये धाकधूक आहे.

जिल्ह्यातील ४३३ ग्रामपंचायतींची निवडणूक प्रक्रिया नुकतीच संपली आहे. राज्य निवडणूक आयोगाने दिलेल्या सुधारित निर्देशानुसार निवडणुकीनंतर सरपंचपदाची आरक्षण सोडत राज्यातील विविध जिल्ह्यांमध्ये होत आहे. कोल्हापुरात ही प्रक्रिया उद्या, बुधवारी सकाळी अकरा वाजता तालुक्याच्या ठिकाणी होणार आहे. नुकत्याच झालेल्या निवडणुकीत स्थानिक आघाड्यांची सरशी झाली असून, अनेक गावांमध्ये सत्तांतर झाले आहे. मात्र, सरपंचपदाच्या आरक्षणावर सत्ता कोणत्या गटाच्या हातात राहील हे ठरणार आहे. ज्या गटातील उमेदवार अधिक संख्येने विजयी झालेे आहेत त्या गटात त्या आरक्षणाचा उमेदवार नसेल तर सरपंचपद कमी सदस्य संख्या असलेल्या गटातील विजयी उमेदवाराकडे जाण्याची शक्यता असते. या आरक्षणावरूनही फोडाफोडीचे राजकारण होते. त्यामुळे बहुमत मिळविलेल्या गटांमध्येही धाकधूक आहे.

----

Web Title: Leaving reservation for Sarpanchpada tomorrow