शहरं
Join us  
Trending Stories
1
चेहऱ्यावर मास्क, खांद्यावर बंदूक...; भारतात येणाऱ्या जहाजावर इराणी कमांडोंनी कसा केला कब्जा? बघा भरसमुद्रातला थरारक VIDEO
2
हर्षवर्धन सपकाळ मातोश्रीवर गेले, उद्धव ठाकरे यांची भेट घेतली; कोणत्या विषयावर काय चर्चा झाली?
3
कर्नाटक सरकारचे मराठी संपवण्याचे षडयंत्र! १० वीच्या निकालातून 'मराठी' शब्द गायब; सीमाभागात संताप
4
जगाचा इंटरनेट संपर्क तुटणार? इराणने होर्मुझ सामुद्रधुनीतील 'अंडर सी केबल्स'बाबतीत दिला थेट इशारा!
5
नागपूर हादरले! बेपत्ता हॉटेल मालकाचा नाल्यात पडलेल्या पोत्यात सापडला मृतदेह, 'हरी ओम' टॅटूमुळे पटली ओळख
6
"उद्धव ठाकरे लढणार असतील तर स्वागत; पण आताच..."; सावध झालेल्या काँग्रेसची मोठी मागणी, वडेट्टीवार काय म्हणाले?
7
Donald Trump : “तू जे केलंस ते खरोखरच अविश्वसनीय”; डोनाल्ड ट्रम्प यांनी केलं भारतीय टेनिसपटूचं भरभरून कौतुक
8
इस्लामाबादला धक्का! अमेरिका-ईरान डीलसाठी इराणला पाकिस्तानवर विश्वासच वाटेना; आता... 
9
Top Marathi News LIVE Updates: शरद पवारांच्या प्रकृतीत सुधारणा, रुग्णालयातून सुट्टी मिळाली
10
फास्टॅग फसवणुकीचा नवा प्रकार! NHAI कडून महत्त्वाची सूचना जारी; एक चूक आणि होईल मोठं नुकसान
11
भयंकर...! आदल्या रात्री मित्राच्या बायकोवरही बलात्कार करून आलेला; IRS अधिकाऱ्याच्या मुलीच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा
12
“२०२७ यूपी विधानसभा निवडणुकीसाठी योगी आदित्यनाथच भाजपाचा चेहरा”; नितीन नवीन यांचे मोठे विधान
13
“उद्धव ठाकरे यांनीच विधान परिषदेची निवडणूक लढावी”; सुप्रिया सुळे यांनी केली आग्रहाची विनंती
14
पाकिस्तानची झोप उडाली! भारत-रशियामध्ये ३,००० सैनिकांचा मोठा करार, शेजारी देश तणावात
15
CSK ची नवी चाल! मुंबईकर आयुष म्हात्रेच्या जागी MI च्या माजी खेळाडूला मिळाली वाइल्ड कार्ड एन्ट्री
16
उल्हासनगरात महापौरांचा पती भाजपच्या टार्गेटवर? आयुक्तांकडे महापौर पतीला एन्ट्री दिल्यावरून भाजपा नगरसेवकांचा धिंगाणा 
17
उन्हाळ्यात आवडीने कलिंगड खाताय... जाणून घ्या, किडनीवर ‘कसा’ होतो परिणाम?
18
"झालमुडी मी खाल्ली अन् मिरची... ४ मे रोजी मिठाई वाटणार!"; पश्चिम बंगालमध्ये मोदींचा मोठा दावा, ममतांवर निशाणा
19
नवरीचा अजब निर्णय! लग्नाला नकार, सासरी जाण्याऐवजी मैत्रिणीसोबत जाण्यावर ठाम; पोलीसही चक्रावले
20
स्कोडाची ८-स्पीड गिअर बॉक्सवाली कुशाक...! तोच घाट, मायलेजवर काय फरक पडला? धक्का दिला की...
Daily Top 2Weekly Top 5

हुपरीत जलवाहिनीला गळती

By admin | Updated: August 26, 2014 21:51 IST

पाणीपुरवठा योजनेचा बोजवारा : आठ दिवस पाण्यासाठी होणार पायपीट

हुपरी : हुपरी (ता. हातकणंगले) च्या नळपाणी पुरवठा योजनेला जगनाथ मळा-यळगूड नजीक लागलेल्या गळतीमुळे गेल्या दोन दिवसांपासून शहराचा पाणीपुरवठा पूर्णपणे बंद पडला आहे. या कामाच्या दुरुस्तीसाठी आणखी आठ दिवस पाणीपुरवठा योजना बंद राहणार आहे. अशी माहिती पाणीपुरवठा समिती सभापती गणेश वार्इंगडे यांनी दिली.योजनेचे काम निकृष्टपद्धतीने झाल्याने मुख्य जलवाहिनी व एअर व्हॉल्वना वारंवार मोठ्या प्रमाणात गळती लागण्याच्या प्रमाणात वाढ झाल्याने नागरिकांची पिण्याच्या पाण्यासाठी नेहमी फरफट होत आहे. हुपरी शहराला पिण्याचे पाणी पुरवठा करण्याची योजना भारत निर्माण योजनेतुन राबविण्यात आली आहे. सुमारे ११ कोटी ४० लाख रुपये खर्चाच्या योजनेच्या पहिल्या टप्प्याचे काम पूर्ण होताच गतवर्षापासून शहराला पाणीपुरवठा केला जात आहे. योजनेच्या पहिल्या टप्प्याचे काम अत्यंत घाईगडबडीने व निकृष्ट पद्धतीने करण्यात आल्याने या योजनेच्या मुख्य जलवाहिनीला व एअर व्हॉल्वला वारंवार गळती लागत आहे. त्यामुळे गळती दुरुस्तीच्या कामासाठी आठ ते पंधरा दिवस योजना बंद ठेवावी लागते. परिणामी पाणी मिळविण्यासाठी नागरिकांना सातत्याने पायपीट करावी लागत आहे. काम निकृष्ट झाले असतानाही त्याचा जाब ठेकेदाराला विचारण्याचे धाडस लोकप्रतिनिधी दाखवत नाहीत. दरम्यान योजनेच्या दुसऱ्या टप्प्याच्या कामासाठी सुमारे आठ कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. लोकप्रतिनिधींच्या हेवेदाव्यामुळे योजनेच्या कामास अद्यापपर्यंत मुहूर्तच मिळालेला नाही. सध्या लागलेल्या गळतीमुळे आताही आठ दिवस शहराला पाणी पुरवठा होणार नाही.