शहरं
Join us  
Trending Stories
1
विधान परिषदेच्या १७ जागांची लवकरच निवडणूक होणार!, जिल्हा परिषद निवडणुकीचा येणार नाही अडसर
2
'महिला आरक्षण' तरणार, तर मतदारसंघ पुनर्रचनेला विराेध हाेणार, लोकसभेत भाजपपुढे आव्हान
3
‘टाइम’च्या यादीत सुंदर पिचाई, विकास खन्नांसह रणबीर कपूर, डोनाल्ड ट्रम्प, पोप लिओ, जिनपिंग यांचा समावेश
4
मुंबई महापालिकेची तिजोरीच असुरक्षित! स्थायी समिती सभागृहात नगरसेविकेच्या पर्समधून २० हजार लंपास
5
उद्योगांना झटका; वीज झाली महाग, १ डिसेंबरपासून प्रतियुनिट ९.९० पैशांची झाली वाढ
6
आजचे राशीभविष्य, १६ एप्रिल २०२६: लाभ होतील, सुख-समृद्धी लाभेल; पण आजचा दिवस सावध राहण्याचा!
7
अमरावतीतील परतवाडा येथील व्हिडीओ कांड: मित्राच्या रूमवर केले दाेन मुलींचे लैंगिक शोषण
8
कायदा माहीत नव्हता, या सबबीवर आयटीआर न भरण्याच्या विलंबला माफी मिळणार नाही !
9
लेबनाॅन, इस्रायलदरम्यान ४० वर्षांनंतर शांतता चर्चा, दोन्ही देशांमध्ये अद्याप करार झाला नसल्याचे अमेरिकेने केले स्पष्ट
10
‘एनसीए’मध्ये जायला खेळाडू घाबरतात, मुनाफ पटेलचे खळबळजनक विधान
11
आरोग्य, निसर्ग संवर्धनासह ९ सामूहिक प्रतिज्ञा करा, नरेंद्र माेदींचं आवाहन
12
खासदार राघव चड्ढा यांची 'झेड प्लस' सुरक्षा हटवली
13
तुर्कस्थानातील शाळेत विद्यार्थ्याचा गोळीबार; ९ जण ठार
14
अनिल अंबानी प्रकरणात मोठी घडामोड! विश्वासू सहकाऱ्याला ईडीने ठोकल्या बेड्या
15
जागतिक व्यापारावर टांगती तलवार! इराणची तिन्ही समुद्र मार्ग बंद करण्याची धमकी; अमेरिकेच्या नाकेबंदीला नाकेबंदीनेच उत्तर
16
IPL 2026: भुवीसह रसीखला 'सलाम'! विराटची 'इम्पॅक्टफुल' खेळी; LSG ला पराभूत करत RCB टॉपला
17
देशाला अंधारात बुडवून मुनीर इराणला, शाहबाज सौदीला...! पाकिस्तान सरकारने मागितली जनतेची माफी...
18
१०० टक्के फिट नसतानाही जबरदस्त इम्पॅक्ट; पण किंग कोहलीचं अर्धशतक हुकल्यावर अनुष्काचा चेहरा पडला
19
धक्कादायक! 'बॉडी मसाज'च्या नावाखाली अंगावर नाचला; लातूरमध्ये तरुणाचा मणका सरकला, एकावर गुन्हा दाखल
20
वाराणसीत स्मार्ट मीटरचा कहर! २ युनिट वापराचे आले २००० बिल; दाद मागणाऱ्याची वीजच कापली, ग्रामीण भागातील जनता संतप्त
Daily Top 2Weekly Top 5

सभापती निवडी लांबणीवर टाकण्याचा नेत्यांचा प्रयत्न

By admin | Updated: September 23, 2014 23:54 IST

कायदेशीर चाचपणी : ऐन निवडणुकीत डोकेदुखी

कोल्हापूर : जिल्हा परिषदेच्या विषय समिती सभापती निवडी लांबणीवर टाकण्याच्या हालचाली गतिमान झाल्या आहेत. कायदेशीर बाबींचा अभ्यास करून या निवडींना न्यायालयातूनच स्थगिती मिळविता येईल काय, याची चाचपणी कॉँॅग्रेसच्या पातळीवर सुरू झाली आहे. जिल्हा परिषद अध्यक्ष व उपाध्यक्ष या पदांची निवड रविवारी (दि. २१) झाली. अध्यक्ष, उपाध्यक्ष निवडीनंतर २१ दिवसांत विषय समिती सभापतींच्या निवडी घ्याव्या लागतात. अडीच वर्षांपूर्वी ‘स्वाभिमानी’बरोबर आघाडी करीत त्यांना बांधकाम व आरोग्य सभापतिपद दिले. शिक्षण सभापतिपदी महेश नरसिंगराव पाटील, समाजकल्याण सभापतिपदी शशिकला रोटे, महिला व बालकल्याण सभापतिपदी भाग्यश्री गायकवाड यांना संधी देण्यात आली. आता अध्यक्षपदी पी. एन. पाटील यांच्या गटाच्या विमल पाटील यांची, तर उपाध्यक्षपदी गृहराज्यमंत्री सतेज पाटील यांच्या गटाचे शशिकांत खोत यांची निवड झाली. या दोन निवडी करताना या दोन नेत्यांसमोर अनेक अडचणी होत्या; पण विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर थेट प्रदेश पातळीवरून तसे आदेश देण्यात आले. शुक्रवारी (दि. २६) विधानसभा निवडणुकीचे उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर प्रचार जोरात सुरू होणार आहे. मात्र, अध्यक्ष, उपाध्यक्ष निवडीनंतर २१ दिवसांच्या आत म्हणजेच ११ आॅक्टोबरच्या आत निवडी कराव्या लागणार आहेत. १५ आॅक्टोबरला विधानसभा निवडणुकीचे मतदान आहे. ऐन निवडणुकीत पुन्हा या निवडींसाठी घासाघीस करावी लागणार असल्याने रुसवा-फुगवा वाढणार आहे. यासाठी सभापती निवडीच विधानसभा निवडणुकीनंतर घेता येतात का? निवडीला स्थगिती देता येते का? या बाबींची कायदेशीर चाचपणी करण्यास नेत्यांनी सांगितले आहे.