शहरं
Join us  
Trending Stories
1
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
2
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
3
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
4
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
5
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
6
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
7
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
8
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
9
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
10
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
11
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
12
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
13
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
14
जीवाशी खेळ! एक्स्पायरी डेट बदलून विकत होते कोल्ड ड्रिंक्स, बिस्किट; मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश
15
Bhagwant Mann : "समोसा-पिझ्झाचा मुद्दा..."; राघव चड्ढांवर पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान कडाडले, आतिशींचा गंभीर आरोप
16
'सिंधू' करार स्थगितीनंतर पाकिस्तानला आणखी एक धक्का! पुन्हा सुरू होतोय 'मोहरा प्रकल्प', जाणून घ्या
17
IPL 2026: चेन्नईला होतोय पश्चाताप! ज्याला संघातून काढलं, तोच खेळाडू दिल्लीसाठी ठरतोय मोठा जॅकपॉट
18
पाकव्याप्त काश्मीर लवकरच भारतात समाविष्ट होणार; AIIO चे मुख्य इमाम उमर इलियासी यांची भविष्यवाणी
19
युद्धभागात १०,००० हून अधिक कर्मचारी! टाटा समूहाच्या ३० कंपन्यांच्या सीईओंना तयार राहण्याचे आदेश
20
इराणमध्ये दिसली अमेरिकेची लढाऊ विमाने आणि हेलिकॉप्टर, कमी उंचीवर घिरट्या; व्हिडीओ आले समोर
Daily Top 2Weekly Top 5

Ajit Pawar Passed Away: कोल्हापूर जिल्ह्यातील नेत्यांचा दादांना अखेरचा निरोप; शिरोळ, नृसिंहवाडी, हेरवाड येथे कडकडीत बंद

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 30, 2026 12:55 IST

अंत्यसंस्काराला उपस्थिती, अजित पवार यांना वाहिली श्रद्धांजली

कोल्हापूर : दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांना गुरुवारी शोकाकुल वातावरणात शासकीय इतमामात अखेरचा निरोप देण्यात आला. बारामती येथील विद्या प्रतिष्ठानच्या परिसरात त्यांना अंत्यसंस्कारासाठी जिल्ह्यातील अनेक नेते आणि सर्वपक्षीय कार्यकर्त्यांनी हजेरी लावली. पवार यांच्या अपघाती निधनाने बुधवारपासून समाजमन सुन्न झाले आहे. असे व्हायला नको होते अशीच भावना प्रत्येकाच्या तोंडी आहे.यावेळी खासदार शाहू छत्रपती, पालकमंत्री प्रकाश आबिटकर, उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, सहपालकमंत्री माधुरी मिसाळ, वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ, माजी खासदार निवेदिता माने, उद्योजक व्ही. बी. पाटील यांनी उपस्थित राहून अंत्यदर्शन घेऊन श्रद्धांजली वाहिली.उपमुख्यमंत्री अजित पवार हे विविध निवडणुकीत जिल्ह्यातील कानाकोपरा पिंजून काढला होता. सर्वच पक्ष, संघटनेत त्यांना मानणारा मोठा वर्ग आहे. कोल्हापूरशी त्यांचे जवळचे नाते होते. म्हणून निधी देण्यातही त्यांनी कधी हात आखडता घेतला नाही, अशा प्रतिक्रिया सामान्यातूनही व्यक्त झाल्या. समाजमन अद्याप सुन्नदरम्यान, अचानकपणे त्यांच्या अपघाती निधन झाल्याने अनेकांना जबर धक्का बसला. राजकीय जीवनात त्यांच्यामुळे उभारी मिळालेले पदाधिकारी, कार्यकर्ते अजूनही सावरलेले नाही. त्यांनी बारामती येथे जावून उपमुख्यमंत्री पवार यांचे अंत्यदर्शन घेतले. बुधवारीही निधनाचे वृत्त कळताच जिल्हयातील सर्वच पक्षातील अनेक पदाधिकाऱ्यांनी बारामती गाठले. रात्रीही तिकडे जाण्यासाठी वाहनांची रीघ लागली होती. दरम्यान, कर्नाटक विधानसभेत महिला व बाल विकास मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांनी श्रद्धांजली वाहिली. बेळगावात केएलई संस्थेचे प्रमुख प्रभाकर कोरे यांनी श्रद्धांजली वाहिली.शिरोळ, नृसिंहवाडी, हेरवाड येथे कडकडीत बंदशिरोळ : उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे बुधवारी विमान अपघातात निधन झाले. त्यामुळे संपूर्ण राज्यभर शोककळा पसरली आहे. शिरोळ पालिकेने बुधवारी मासिक सभा तहकूब करून त्यांना श्रद्धांजली वाहिली. गुरुवारी शिरोळ शहर बंद ठेवून व्यापारी व नागरिकांकडून त्यांना श्रद्धांजली वाहण्यात आली.जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणूक प्रचार दौऱ्यानिमित्ताने बारामती दौऱ्यावर विमानातून येत असताना बुधवारी सकाळी उपमुख्यमंत्री पवार यांच्या विमानाचा अपघात होऊन त्यामध्ये त्यांच्यासह विमानातील सहा लोकांचा दुर्दैवी मृत्यू झाला. या घटनेची माहिती समजताच संपूर्ण महाराष्ट्रात शोककळा पसरली. प्रत्येक गावात साश्रुपूर्ण नयनांनी त्यांच्या आठवणींना उजाळा देत श्रद्धांजली वाहण्यात आली.

बुधवारी शिरोळ नगरपालिकेच्या पदाधिकाऱ्यांनी उपमुख्यमंत्री पवार यांना श्रद्धांजली अर्पण करून मासिक सभा तहकूब केली. गुरुवारी व्यापारी असोसिएशनने शहर बंद ठेवून त्यांना श्रद्धांजली वाहिली. हेरवाड, नृसिंहवाडी येथेही बंद पाळण्यात आला.

English
हिंदी सारांश
Web Title : Mourning Ajit Pawar's Death: Kolhapur Leaders Pay Last Respects, Shutdown Observed

Web Summary : Kolhapur mourns Deputy Chief Minister Ajit Pawar's death. Leaders and citizens paid respects at his funeral. Shirol, Nृसिंहवाडी, and Herwad observed a complete shutdown. His sudden demise shocked many, with numerous individuals and political figures expressing grief and offering condolences.
टॅग्स :Ajit Pawarअजित पवारPlane Crashविमान दुर्घटनाDeathमृत्यूkolhapurकोल्हापूर