एलबीटी घालवणारच

By Admin | Updated: December 17, 2014 00:15 IST2014-12-17T00:13:53+5:302014-12-17T00:15:33+5:30

मुख्यमंत्री : ‘फाम’चे शिष्टमंडळाला आश्वासन

LBT will spend | एलबीटी घालवणारच

एलबीटी घालवणारच

कोल्हापूर : स्थानिक संस्था कर अर्थात एलबीटी हा जाचक कर घालवू, असे आश्वासन आज, मंगळवारी राज्यातील व्यापाऱ्यांची असलेली शिखरसंस्था ‘फेडरेशन आॅफ असोसिएशन आॅफ महाराष्ट्र’ (फाम) च्या शिष्टमंडळाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले.
दरम्यान, सांगली-मिरज-कुपवाड महापालिकेने सुरू केलेल्या व्यापाऱ्यांवरील कारवाई थांबवावी, असे प्रशासनाला सांगितले. त्यामुळे येथील व्यापाऱ्यांनी सुरू केलेले उपोषण आज सायंकाळी मागे घेण्यात आले.
सांगली महापालिकेने एलबीटीप्रश्नी कारवाईचे पाऊल उचलले होते. यावरून तेथील व्यापाऱ्यांनी विरोध दर्शवत उपोषण केले. याप्रश्नी सांगलीचे खासदार संजयकाका पाटील, ‘फाम’चे अध्यक्ष मोहन गुरनानी, नागपूर चेंबर्स आॅफ कॉमर्सचे सदस्य दीपेन अग्रवाल यांच्या शिष्टमंडळाने आज दुपारी भेट घेतली. त्यावेळी मुख्यमंत्री फडणवीस यांनी विधानसभा निवडणुकीत एलबीटी घालवू, असे आश्वासन दिले होते. ते पाळले जाईल. एलबीटीची तूट कशी भरून काढता येईल, यासाठी अर्थ व नगरविकास खात्याला अहवाल देण्यास सांगितले.
याचवेळी सांगली येथील आयुक्तांना एलबीटीची व्यापाऱ्यांवरील कारवाई थांबवावी, असे फोनवरून सांगितले. याबाबतची माहिती कोल्हापूर व्यापारी व उद्योजक महासंघाचे अध्यक्ष सदानंद कोरगावकर यांनी सांगितली.

Web Title: LBT will spend