Kolhapur: प्रशांत कोरटकरवर वकिलाकडून हल्ल्याचा प्रयत्न, सुनावणीनंतर कोर्ट परिसरातच गोंधळ

By सचिन यादव | Updated: March 28, 2025 15:34 IST2025-03-28T15:32:46+5:302025-03-28T15:34:51+5:30

कोल्हापूर : कोल्हापूर सत्र न्यायालयात सुनावणीसाठी आणण्यात आलेल्या प्रशांत कोरटकरवर वकिलाने हल्ला करण्याचा प्रयत्न केला. मोठा पोलिस बंदोबस्त असताना ...

Lawyer attempts to attack Prashant Koratkar despite police presence in Kolhapur District Court | Kolhapur: प्रशांत कोरटकरवर वकिलाकडून हल्ल्याचा प्रयत्न, सुनावणीनंतर कोर्ट परिसरातच गोंधळ

Kolhapur: प्रशांत कोरटकरवर वकिलाकडून हल्ल्याचा प्रयत्न, सुनावणीनंतर कोर्ट परिसरातच गोंधळ

कोल्हापूर: कोल्हापूर सत्र न्यायालयात सुनावणीसाठी आणण्यात आलेल्या प्रशांत कोरटकरवर वकिलाने हल्ला करण्याचा प्रयत्न केला. मोठा पोलिस बंदोबस्त असताना देखील कोरटकरवर हल्ल्याचा प्रयत्न झाल्याने न्यायालय परिसरात खळबळ उडाली. पोलिसांनी वेळीच हल्ला करणाऱ्या वकिलाला आवरल्याने मोठा अनर्थ टळला. ये पश्या.. म्हणत ते कोरटकरच्या दिशेने धावले असता पोलिसांनी तात्काळ त्यांना धरुन बाजुला केले.  

दरम्यान, आज झालेल्या सुनावणीत न्यायालयाने कोरटकरच्या पोलिस कोठडीत दोन दिवसाची वाढ केली. त्यामुळे ३० मार्चपर्यंत कोरटकरचा मुक्काम पोलिसांच्या कोठडीतच राहणार आहे. आज, शुक्रवारी चौथे सह दिवाणी न्यायाधीश कनिष्ठ सत्र एस. एस. तट यांच्यासमोर ही सुनावणी झाली. 

कोरटकर याचे बुकीमालकाचे संबध आहेत. त्याचा तीन राज्यात वावर होता, त्याला अजून कोणत्या संघटना, व्यक्ती मदत करत आहेत का, फरार काळात त्याने पाच ते सहा हॉटेलमध्ये मुक्काम, फिरण्यासाठी चारचाकी गाडीचा वापर केला आहे, त्याचे आणखी कोणाशी हितसंबध आहेत का, याचा तपास होण्यासाठी पोलीस कोठडीत वाढ मिळावी, अशी मागणी ॲड. असीम सरोदे आणि सरकारी वकील सूर्यकांत पोवार यांनी केली.

वाचा - प्रशांत कोरटकर याने पसार काळात दोन वाहनांचा केला वापर, पोलिस चौकशीत समोर आली माहिती

दरम्यान सुरक्षेच्या कारणासाठी कोरटकरला सकाळी आठ वाजता राजारामपुरी पोलिस कोठडीतून बाहेर काढले. त्या वेळी आंदोलनाचा प्रयत्न करणाऱ्या जयदीप शेळके याला पोलिसांनी ताब्यात घेतले. झटापटीत त्याचा शर्टही फाटला. दुपारी बारा नंतर न्यायालयात सुनावणी झाली. त्यात सरकारी वकील सूर्यकांत पोवार यांनी केलेल्या युक्तिवादानुसार त्याच्या पोलिस कोठडीत दोन दिवसांची वाढ केली. आरोपीचे वकील सौरभ घाग यांनी कोरटकर यांची बाजू मांडली. 

सुनावणीनंतर त्याला कोठडीकडे नेताना पोलिसांच्या गराड्यातच वकील अमितकुमार भोसले (रा. रुकडी, ता. हातकणंगले ) याने ए हरामखोर परशा, छत्रपती शिवाजी महाराजांच्या विषयी तू आक्षेपार्ह बोलतोस, असे बोलत त्यांच्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला. सुमारे पन्नासहून अधिक पोलिसांच्या उपस्थितीत त्याने हा प्रयत्न केल्याने पोलिस यंत्रणा पूर्णपणे हडबडून गेली. त्याला तात्काळ ताब्यात घेऊन त्याचे तोंड दाबले. त्याला न्यायालयाच्या बेसमेंटमध्ये असलेल्या कँन्टीनमध्ये थोडा वेळ थांबवून ताब्यात घेतले. या घटनेने वातावरण तणावपूर्ण बनले.

Web Title: Lawyer attempts to attack Prashant Koratkar despite police presence in Kolhapur District Court

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.