शहरं
Join us  
Trending Stories
1
ऐतिहासिक क्षण! ३४ वर्षांनी भेटलेल्या इजरायल-लेबनॉनमध्ये १० दिवसांसाठी युद्धबंदी; राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांची यशस्वी मध्यस्थी
2
MI vs PBKS : वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन सूर्याला बाकावर बसवणार? सलग चौथ्या पराभवानंतर काय म्हणाला पांड्या?
3
नाशिक TCS प्रकरण: आरोपीचा काका म्हणतोय, 'पीडित तरुणी आणि आरोपीत प्रेमप्रकरण...'; न्यायालय आवारात गोंधळ
4
MI vs PBKS : विकेट मिळेना; त्यात सोपा झेल सोडला! जिथं प्रभसिमरन चमकला, तिथं बुमराह ‘खलनायक' ठरला
5
रात्रभर तडफडत राहिले; राष्ट्रीय विधि विद्यापीठाच्या दोन विद्यार्थ्यांचा दुर्दैवी अंत
6
"उडता पंजाब..." सरपंच साब श्रेयससह प्रभसिमरनचा जलवा; मुंबई इंडियन्सला पराभूत करत पंजाब किंग्स अव्वल
7
"आमचे सैन्य पुन्हा युद्धासाठी सज्ज, डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशाची वाट बघतोय", अमेरिकेच्या संरक्षण मंत्र्यांचे विधान
8
MI vs PBKS : श्रेयस अय्यर झाला सुपरमॅन! Unbelievable Relay Catch सह पांड्याचा खेळ खल्लास (VIDEO)
9
"आज चाणक्य असते तर तेही थक्क झाले असते..."; महिला आरक्षण विधेयकावरून प्रियंका गांधी यांचा थेट निशाणा
10
Quinton de Kock चा मोठा धमाका! चार सामन्यांत बाकावर बसवलं; संधी मिळताच ठोकली कडक सेंच्युरी
11
"संसदेत अनेकदा राहुल गांधींची खिल्ली उडवली जाते, पण...!"; प्रियंका गांधींचा भाजपवर घणाघात
12
MI vs PBKS : पॉवर प्लेमध्ये 'सिंग इज किंग' शो! सूर्यावर ओढावली 'गोल्डन डक'ची नामुष्की
13
खळबळजनक खुलासा! पाकिस्तानने भडकवली नोएडामधील हिंसा; तंत्र बघून सुरक्षा यंत्रणा हादरल्या
14
कोणी विचारेना...! किंमत होती ५.५० लाख, मारुतीवर आठ वर्षांतच कार बंद करण्याची वेळ आली...
15
नेपाळने लादला भारतावर कर! १०० रुपयांहून अधिकच्या खरेदीवर आता द्यावा लागणार 'भंसार' कर; बालेन सरकारचा मोठा निर्णय
16
BJP मंत्र्यांच्या मुलाने पाच जणांना उडवले, उलट त्यांच्यावरच ओरडला- मी सायरन वाजवले, बाजूला का सरकला नाहीत?
17
युट्यूबवर ५ लाख व्ह्यूज आले तर बँक खात्यात किती पैसे जमा होणार? जाणून घ्या कमाईचं नेमकं गणित
18
ममता बॅनर्जींचा मोठा विजय! 'ट्रिब्यूनल'कडून क्लीन चिट मिळालेल्यांना बंगालमध्ये मतदानाचा अधिकार; सुप्रीम कोर्टाचा कलम १४२ अंतर्गत विशेष आदेश
19
कोण आहे Mayank Rawat? मुंबई इडियन्सनं एका षटकात ५ षटकार मारणाऱ्या भिडूला दिली पदार्पणाची संधी
20
भयंकरच घडलं! वाद सोडवायला गेला आणि जीव गेला; मध्यस्थी करणाऱ्याची चाकूने वार करत हत्या
Daily Top 2Weekly Top 5

विधानसभा शेवटचीच!..पतंगराव कदम

By admin | Updated: September 7, 2014 23:55 IST

लोकसभा लढविण्याचे संकेत

सांगली : यंदा मी विधानसभेची शेवटचीच निवडणूक लढविणार आहे. पुढील कालावधीत कुठून कोणती निवडणूक लढवायची, याचा निर्णय लवकरच घेऊ, अशी माहिती वनमंत्री डॉ. पतंगराव कदम यांनी आज, रविवारी येथे पत्रकार परिषदेत दिली. या घोषणेतून त्यांनी लोकसभा निवडणुकीचे स्पष्ट संकेत दिले असले, तरी त्यावर अधिक भाष्य करणे टाळले. ते म्हणाले की, विधानसभेची शेवटची निवडणूक मी यंदा लढवीत आहे. यापुढे विधानसभेच्या रिंगणात उतरणार नाही. पुढील गोष्टी नंतर स्पष्ट करण्यात येतील. ही निवडणूक मला फार अवघड नाही. तरीही आता यापुढे विधानसभा न लढविण्याचा निर्णय घेतला आहे. राज्यात आघाडीलाही कोणती अडचण नाही; मात्र परस्परांच्या खोड्या काढणे आता दोन्ही पक्षांतील नेत्यांनी बंद करावे. एकदा अशा गोष्टीमुळे नुकसान झाले आहे. पुन्हा त्याच गोष्टी करू नयेत. सत्ता गेल्यावर काय स्थिती होईल, याचे भान आघाडीच्या सर्वच नेत्यांनी ठेवावे. खोड्या काढणे बंद झाले नाही, तर सर्वांनाच घरी बसावे लागेल, असा इशाराही त्यांनी दिला. राष्ट्रवादीचे काही नेते महायुतीत चालले असले, तरी काळजी करण्याचे कारण नाही. कॉँग्रेसकडून राष्ट्रवादीला पाठबळ मिळेल. ज्यांनी राष्ट्रवादीचा आजवर फायदा घेतला, ते स्वार्थासाठी अन्य पक्षांत जात आहेत. प्रवेशाच्या उंबरठ्यावर असलेल्या काही लोकांना राष्ट्रवादीच्या नेत्यांनीच खतपाणी घालून मोठे केले. त्यामुळे आता ते डोईजड होत आहेत, अशी टीका कदम यांनी त्यांचे प्रतिस्पर्धी उमेदवार पृथ्वीराज देशमुख यांच्यावर अप्रत्यक्षरीत्या केली. अशा गोष्टींमुळे राष्ट्रवादी अडचणीत असली, तरी या काळात आम्ही त्यांना वाऱ्यावर सोडणार नाही. गेल्या १५ वर्षांपासून आम्ही एकत्रित काम करीत आहोत. त्यामुळे या दोन्ही मित्रपक्षांनी एकमेकांना प्रामाणिकपणे साथ दिली, तरच भविष्यकाळ चांगला आहे, अन्यथा दोघेही अडचणीत येतील. जागा बदलाबाबत ते म्हणाले की, सांगली जिल्ह्यातील जत विधानसभा मतदारसंघ पूर्वी आमचाच होता. आमच्याच दुर्लक्षामुळे ती जागा राष्ट्रवादीकडे गेली. आता जागा बदलाबाबत वरिष्ठ नेतेच निर्णय घेतील, असे त्यांनी स्पष्ट केले. (प्रतिनिधी)