शहरं
Join us  
Trending Stories
1
"५१ अंशांच्या उन्हातही काही होणार नाही, माझ्या गाडीत AC चालत नाही"; ज्योतिरादित्य शिंदेंनी सांगितला उष्णतेच्या लाटेपासून बचावाचा देशी उपाय!
2
जाणून-बुजून तुमचा स्मार्टफोन स्लो केला जातोय; युरोप मोबाईल कंपन्यांवर भडकला, कंटाळून नवा घ्यावा म्हणून...
3
भारतापाठोपाठ आता 'या' देशालाही रशियन तेलासाठी सूट! ट्रम्प अचानक उदार का झाले?
4
Video - अग्नितांडव! हापूरमध्ये आग; ७० झोपड्यांसह २ कारखाने जळून खाक, कोट्यवधींचं नुकसान
5
सुपर ओव्हरमधील विकेट्स आणि धावा खेळाडूच्या खात्यात का जमा होत नाहीत? जाणून घ्या त्यामागचं कारण
6
ऑटो कंपन्यांमध्ये खळबळ! २०२८ पासून फक्त इलेक्ट्रीक दुचाकी विकता येणार, दिल्लीत पेट्रोलच्या दुचाकी बॅन होणार
7
Top Marathi News Live: काळजी घ्या, उष्णतेची लाट होरपळून काढणार! IMD चा महाराष्ट्रातील 'या' भागांना सर्तकतेचा इशारा
8
"घराणेशाही वाटेल...", अमोल मिटकरींकडून विधान परिषदेसाठी 'या' नावाची शिफारस; ट्विट करुन केली मागणी
9
"हा सल्ला उद्धव ठाकरेंसाठी आहे का?"; संजय राऊतांच्या निवडणुकीबाबतच्या विधानावर भाजपचा पलटवार
10
पाकिस्तान मध्यस्थ होण्याच्या लायक नाही! इराणने बुरखा फाडला; ट्रम्प म्हणाले, इराणच्या पाईपलाईन्स फुटणार... 
11
Mitali Bag : TMC खासदार मिताली बाग यांच्या कारवर हल्ला; भाजपावर गंभीर आरोप, रडत रडत म्हणाल्या...
12
Mind Soul: थकवा, ताण की राग? तुमच्या प्रत्येक मानसिक समस्येवर आहे आहे एक सोपा उपाय
13
IPL 2026: तर Super Over झालीच नसती..!! पंचाच्या चुकीमुळे LSGवर आली पराभवाची वेळ? काय घडलं
14
भारत-न्यूझीलंडदरम्यान ऐतिहासिक ट्रेड डीलवर शिक्कामोर्तब! ७०% भारतीय सामानांवर ड्युटी नाही, जाणून घ्या
15
टॅक्स बचतीसाठी पत्नीच्या नावे मालमत्ता खरेदी फायद्याची? 'ही' एक गोष्ट तुमच्यासाठी ठरू शकते डोकेदुखी
16
Jara Hatke: शहाळ्याची मलई की गोड पाणी? तुमची निवड कधीच चुकणार नाही; जाणून घ्या सिक्रेट!
17
पुढील ५ दिवस देशभरात पावसाचे सावट; ७२ तास तीव्र वादळी वारे वाहणार, हवामान विभागाचा अलर्ट
18
मुंबईत 'त्या' हॉटेलमध्ये भरायचा ‘व्हीआयपी’ दरबार; मनोहरमामाच्या भक्तांची यादी पोलिसांच्या रडारवर
19
'काकी आय लव्ह यू', म्हणणं टवाळखोरांना पडलं महागात, तरुणीने भररस्त्यात शिकवला धडा
20
तेहरानमध्ये भीषण संकट! इंधन टाक्यांच्या स्फोटात ८ कोटी लीटर तेल वाया; राज्यपालांचे नागरिकांना महत्त्वाचे आवाहन
Daily Top 2Weekly Top 5

बचत गटांना मोठ्या प्रमाणात कर्ज उपलब्ध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 9, 2020 04:20 IST

लोकमत न्यूज नेटवर्क कोल्हापूर : बचत गटाच्या महिलांनी कोरोनाच्या काळात प्रत्येक जिल्ह्यातून निधी एकत्रित करून शासनाला दिला आहे. महिलांनी ...

लोकमत न्यूज नेटवर्क

कोल्हापूर : बचत गटाच्या महिलांनी कोरोनाच्या काळात प्रत्येक जिल्ह्यातून निधी एकत्रित करून शासनाला दिला आहे. महिलांनी कर्ज घेऊन उद्योग-व्यवसाय उभारावेत यासाठी आयसीआयसीआय व सारस्वत बँक यांच्यामार्फत बचत गटांना मोठ्या प्रमाणात कर्ज उपलब्ध करू दिले आहे, असे महिला आर्थिक विकास महामंडळाच्या अध्यक्षा ज्योती ठाकरे यांनी मंगळवारी सांगितले.

महिला आर्थिक विकास महामंडळाच्या ऑनलाईन पोर्टलच्या उद‌्घाटनप्रसंगी त्या बोलत होत्या. यावेळी जिल्हा बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी ए. बी. माने, रिजनल रिसोर्स पर्सन विलास बच्चे, जिल्हा समन्वय अधिकारी बाळासाहेब झिंजाडे, संचालक अनिल तराळ, ऑनलाईन पोर्टलचे योगेश भट, अमित पाटील, सारस्वत बँकेचे व्यवस्थापक विक्रम परीट उपस्थित होते. यावेळी संयुक्त देयता समूह यांना मंजुरीपत्र व ज्या बचत गटांना जास्त लिंकेज केले आहे, त्यांना धनादेश वाटप करण्यात आले .

ठाकरे यांनी कोडोलीमधील रामकृष्ण ॲग्रो व्हेजिटेबल आणि फूड प्रॉडक्टस यांना भेट दिली. महिला कुटुंब व ग्रामविकास लोकसंचलित साधन केंद्रातील आळते गावातील श्रीगणेश स्वयंसाहाय्यता महिला बचत गटांनी सुरू केलेल्या बेकारी व्यवसायास भेट दिली. यावेळी जिल्हा समन्वय अधिकारी झिंजाडे म्हणाले, कोल्हापूरमध्ये सद्य:स्थितीत माविमअंतर्गत १०८ गावांत, एक महानगरपालिका व नऊ नगरपरिषदांमध्ये तीन हजार ८८६ बचत गटाच्या माध्यमातून ५६ हजार ६३० महिलांचे संघटन करण्यात आले आहे. तीन हजार ५४० बचत गटांना आजअखेर ३१५ कोटी कर्ज उपलब्ध करून देण्यात आले आहे. या आर्थिक वर्षात ९२५ बचत गटांना २३.८० कोटी बँक कर्ज उपलब्ध करून देण्यात आले आहे. महिला कुटुंब व ग्रामविकास लोकसंचलित साधन केंद्राच्या अध्यक्ष रेखा दावणे यांनी आभार मानले.

---

इंदुमती गणेश