शहरं
Join us  
Trending Stories
1
मतदान आटोपताच महागाईचा भडका, गॅस सिलेंडरच्या किमतीत थेट ९९३ रुपयांची वाढ, नवे दर आजपासून लागू
2
आजचे राशीभविष्य, ०१ मे २०२६: प्रकृतीची काळजी घ्या, आजारपणावर खर्च होण्याची शक्यता!
3
राज्यात आजपासून डिजिटल जनगणना; प्रथमच ‘स्व-गणना’चा पर्याय उपलब्ध, स्व-गणना कशी कराल?
4
नाट्यमय घडामोडींनंतर विधान परिषदेच्या १० जागा बिनविरोध; महायुतीला ९ तर मविआला १ जागा
5
रात्रही ‘ताप’दायक, महिनाभर वाढता उकाडा; चंद्रपूरात सर्वाधिक उष्ण तापमानाची नोंद
6
महापालिकेची उदासीनता, ना मदत, ना दिलासा! महापाैर, उपमहापाैर कुणीही घटनास्थळी जाऊ शकले नाहीत
7
७० टनाची क्रेन उचलण्यासाठी पालिकेची १३ टनाची क्रेन; वाहतूक कोलमडली, नेमकी चूक कुणाची?
8
मूठभरांमुळे मराठा समाजाला आरक्षण नाकारणे अयोग्य; राज्य सरकारचा हायकोर्टात युक्तिवाद
9
चिंताजनक! सरकारी तिजोरी खोला अन् रुपयाच्या घसरणीचे दुष्परिणाम रोखा, अन्यथा...
10
"महाराष्ट्राचे पाऊल निरंतर प्रगतीच्या दिशेनेच..."; मुख्यमंत्र्यांनी दाखवलं आश्वासक राज्याचं चित्र
11
अत्यंत धोकादायक! पाकमध्ये फुग्यात गॅस भरून होतोय स्वयंपाक; हा प्रकार म्हणजे चालता-फिरता बॉम्ब
12
१० पायऱ्या चढायला ४० वर्षे लागतात, तेव्हा...; विधान परिषदेसाठी भाजपानं 'यांनाच' संधी का दिली?
13
म्हाडाने लॉटरीतील १२२१ घरांच्या किंमती ७.५ टक्क्यांनी कमी केल्या
14
जर कच्चे तेल नाही मिळाले तर चीन होर्मुझ ताब्यात घेणार? अमेरिकेच्या हातातून बाजी निसटणार, इराण अन्...
15
आता आरपारची लढाई! मोज्तबा खामेनेईंचा ट्रम्प यांना सज्जड इशारा; म्हणाले "समुद्रात गाडून टाकू..."
16
GT vs RCB : किंग कोहलीनं ५ चेंडूत केली गेलच्या विक्रमाशी बरोबरी; रबाडानं असा घेतला बदला (VIDEO)
17
रील स्टार पाटलाचा कारनामा, १२ वर्षांपूर्वीच्या अपहरण-खून प्रकरणाचा गुन्हे शाखेने केला उलगडा
18
“शिंदेंकडून मलाही ऑफर, पण मी फडणवीसांचा निष्ठावान कार्यकर्ता”; रवी राणांचा मोठा खुलासा
19
बुद्ध पौर्णिमा-पुष्टिपती विनायक जयंती २०२६: ९ राशींची इच्छा पूर्ण अन् धनलाभ; काळजी दूर होईल!
20
"उद्धव ठाकरेंनी स्वतःचा राजकीय बळी न देता.."; विधानपरिषद निवडणुकीवरून भाजपची घणाघाती टीका
Daily Top 2Weekly Top 5

गणपती बाप्पांच्या सजावटीसाठी कंदील, कलश, लाईटच्या माळांचा प्रकाश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 13, 2020 16:59 IST

घरोघरी दहा दिवसांचा पाहुणा म्हणून येणाऱ्या गणपती बाप्पांच्या सजावटीसाठी बाजारपेठेत सोनेरी कंदील, मांगल्याचे प्रतीक असलेले कलश, रोटेशन बल्ब, स्टार, एलईडी अशा आकर्षक विद्युत रोषणाईच्या साहित्याने आता बाजारपेठेत झगमगाट व्हायला सुरुवात झाली आहे.

ठळक मुद्देगणपती बाप्पांच्या सजावटीसाठी कंदील, कलश, लाईटच्या माळांचा प्रकाशस्थानिक बाजारातूनच खरेदी, दरात १० टक्के वाढ

कोल्हापूर : घरोघरी दहा दिवसांचा पाहुणा म्हणून येणाऱ्या गणपती बाप्पांच्या सजावटीसाठी बाजारपेठेत सोनेरी कंदील, मांगल्याचे प्रतीक असलेले कलश, रोटेशन बल्ब, स्टार, एलईडी अशा आकर्षक विद्युत रोषणाईच्या साहित्याने आता बाजारपेठेत झगमगाट व्हायला सुरुवात झाली आहे.

यंदा मालाचे उत्पादन कमी झाल्याने दरात १० टक्के वाढ झाली आहे; तर मुंबईहून मालाची आवक झालेली नसल्याने यंदा स्थानिक बाजारपेठेतूनच हे साहित्य खरेदी करून त्याची विक्री केली जात आहे.यंदा गणेशोत्सव काही दिवसांवर आला असला तरी कोरोनाने सणाचा उत्साह जणू काढूनच घेतला आहे. रस्त्यांवर नागरिकांची मोठी गर्दी दिसत असली तरी प्रत्यक्ष दुकानांमध्ये खरेदीसाठी जाणारा ग्राहक कमी झाला आहे. त्याला अपवाद सजावटीच्या साहित्याची दुकानेही राहिलेली नाहीत.

गौरी गणपतीच्या सजावटीत विद्युत रोषणाईला विशेष महत्त्व असते. फार सजावटीच्या वस्तू न ठेवता केवळ विद्युत रोषणाई केली तरी आरास खुलून दिसते. त्यामुळे गणेशोत्सवात या विद्युत उपकरणांची मोठी खरेदी केली जाते.सजावटीचा सगळा माल मुंबईतून आणला जातो; पण आता कोरोनामुळे व्यावसायिक तेथे जायला तयार नाहीत; त्यामुळे सध्या गांधीनगरसारख्या स्थानिक बाजारपेठेतून त्यांची खरेदी करून कोल्हापुरात विक्री केली जात आहे. शाहूपुरीतदेखील मोठ्या प्रमाणात एलईडी माळा बनवल्या जातात.यंदा मालाचे उत्पादन कमी झाले आहेत तसेच आवक नसल्याने गतवर्षीचेच साहित्य पुन्हा मांडण्यात आले आहे. शिवाय यामुळे त्यांच्या दरात अंदाजे पाच ते १० टक्क्यांपर्यंत वाढ झाली आहे.साहित्य आणि दर असे

  • सोनेरी कंदील : एक नग : १६० रुपये
  • कलश माळ : १५० रुपये
  • रोटेशन बल्ब, स्टार, कमळ : ३०० रुपये
  • एलईडी माळा १५० रुपयांपासून पुढे

माल आणायला मुंबईला गेलो तर क्वारंटाईन व्हायला लागणार; शिवाय कोरोनाचा संसर्गाची भीती आहे. त्यामुळे यंदा स्थानिक बाजारपेठेतून विद्युत माळांची खरेदी केली आहे. भारतीय बनावटीच्या साहित्याला मागणी असली तरी ते चायनीजप्रमाणे फॅन्सीसुद्धा असावे, अशी ग्राहकांची अपेक्षा आहे.- हरीश दहेडा (व्यावसायिक)

टॅग्स :Ganpati Festivalगणेशोत्सवkolhapurकोल्हापूर