हातकणंगले-शिरोळमधील जमिनी प्रकल्पग्रस्तांना देणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 06:58 IST2021-02-05T06:58:31+5:302021-02-05T06:58:31+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क कोल्हापूर : चांदोली प्रकल्पग्रस्तांसाठी हातकणंगले शिरोळ येथील शासनाच्या निदर्शनास न आलेल्या जमिनी देण्यात येणार आहेत. या ...

Land in Hatkanangle-Shirol will be given to project affected people | हातकणंगले-शिरोळमधील जमिनी प्रकल्पग्रस्तांना देणार

हातकणंगले-शिरोळमधील जमिनी प्रकल्पग्रस्तांना देणार

लोकमत न्यूज नेटवर्क

कोल्हापूर : चांदोली प्रकल्पग्रस्तांसाठी हातकणंगले शिरोळ येथील शासनाच्या निदर्शनास न आलेल्या जमिनी देण्यात येणार आहेत. या जमिनींचा गटनंबर, क्षेत्र याचा सर्व्हे करून त्याची यादी प्रकल्पग्रस्तांसमोर ठेवून जमीन पसंतीचा कार्यक्रम लावावा, असे निर्देश अप्पर जिल्हाधिकारी किशोर पवार यांनी शुक्रवारी वनखात्याला दिले.

जिल्हाधिकारी कार्यालयात चांदोली प्रकल्पग्रस्तच्च्या पुनर्वसनासंबंधी आयोजित बैठकीत ते अध्यक्षस्थानावरून बोलत होते. यावेळी ज्येष्ठ नेते भारत पाटणकर, पुनर्वसन अधिकारी अश्विनी जिरंगे, तहसीलदार वैभव पिलारे यांच्यासह इचलकरंजी, शाहूवाडी येथील उपविभागीय अधिकारी व चांदोली प्रकल्पग्रस्त उपस्थित होते.

यापूर्वी झालेल्या बैठकीत प्रकल्पग्रस्तांचे संकलन रजिस्टर प्रमाणित करण्याचे निर्देश देण्यात आले होते. ही यादी तपासून १५ दिवसांत प्रमाणित करण्यात येणार आहे. यासह संपादन पात्र असलेल्या व ज्यावर ‘इतर हक्कात’ पुनर्वसनाचा शेरा आहे अशा जमिनी खासगी खरेदीने घ्यावेत व त्याचे पैसे वनविभागाने द्यावेत, असे या बैठकीत ठरले. चांदोली प्रकल्पग्रस्तांना अजूनही नागरि सुविधा मिळालेल्या नसून कार्यकारी अभियंत्यांनी याची पूर्तता करावी, अशा सूचना बैठकीत करण्यात आल्या.

--

Web Title: Land in Hatkanangle-Shirol will be given to project affected people