शहरं
Join us  
Trending Stories
1
"रस्ते आणि उड्डाणपूल म्हणजे विकास नाही"; राज ठाकरेंनी करुन दिली बाबासाहेबांच्या समग्र दृष्टीची आठवण
2
एकाच झटक्यात कंपनीनं काढले ३० हजार कर्मचारी, आता त्याचं कंपनीनं नव्या CFO ना दिलं ₹२५० कोटींचं पॅकेज
3
"आमच्या कामात ढवळाढवळ नको"; इराणच्या नाकेबंदीवरून चीनचा अमेरिकेला थेट इशारा, महायुद्ध पेटण्याची भीती
4
मुंबई हादरली..! लाइव्ह म्युझिक कॉन्सर्टमध्ये ड्रग्जच्या ओव्हरडोजने २ विद्यार्थ्यांचा मृत्यू, नेस्कोच्या अधिकाऱ्यांसह ५ अटकेत, १ तरुणी गंभीर
5
पाठीमागून आला अन्...; दिवसाढवळ्या गर्भवती महिलेसोबत घाणेरडं कृत्य, संतापजनक व्हिडीओ समोर!
6
बॉलिंग ॲक्शनवरुन वाद; वडिल अन् बहिणीची साथ! जाणून घ्या 'विदर्भ एक्स्प्रेस' Praful Hinge चा प्रवास
7
अधिवेशन पास घोटाळा; विधानभवनातील तिघे कर्मचारी निलंबित, एक अद्याप पसारच
8
"सध्या माझ्या मनात.."; आजीच्या निधनाने जनाई कोलमडली, सोशल मीडियावर व्यक्त केल्या भावना
9
सूर्याचा उच्च राशीत प्रवेश २०२६: ७ राशींना मेष संक्रांतीने यश-लाभ; १ उपायाने महिनाभर भरभराट!
10
...अन् बाबासाहेब स्वत: समोर येऊन बोलू लागले; चर्चिल-ॲटलींसोबतचा संवाद झाला सजीव
11
Noida Protest: जाळपोळ, तोडफोड आणि दगडफेक; ६० जणांना अटक, नोएडा हिंसाचारात आतापर्यंत काय-काय घडलं?
12
रुपयाच्या नाण्यांतून उभारली श्रद्धेची गाथा; १७ हजार नाण्यांचा संग्रह
13
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेला सोने परवडत नाहीये? घरी आणा 'या' ६ स्वस्त वस्तू; मिळेल सोनेखरेदीचे अक्षय्य पुण्य!
14
आजचे राशीभविष्य, १४ एप्रिल २०२६: कामात यश मिळेल, घरात सुख-शांती नांदेल, नशिबाची साथ मिळेल.
15
उद्यापासून उष्णतेच्या लाटेचा तडाखा, अकोला @ ४३.८
16
स्मरण दिन २०२६: अवतार सांगता करताना स्वामींनी कोणते वचन दिले?; शेवटचा शब्द आजही पाळतात!
17
स्वामी समर्थ स्मरण दिन २०२६: ‘असे’ करा पूजन, आवर्जून म्हणा स्वामी मंत्र; पाहा, विधी-मान्यता
18
यंदा कसा असेल पाऊस? हवामान खात्याने मान्सूनबाबत दिली चिंता वाढवणारी माहिती
19
बिहारमध्ये नवीन सरकार स्थापनेच्या हालचालींना वेग, उद्या शपथविधी सोहळा होण्याची शक्यता
20
पूर्ववैमनस्यातून पत्नीच्या डोळ्यांसमोर दादरमध्ये तरुणाची निर्घृण हत्या
Daily Top 2Weekly Top 5

सर्फनाला प्रकल्पासाठी दोन गावांचे भूसंपादन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 1, 2021 04:17 IST

कोल्हापूर : आजरा तालुक्यातील सर्फनाला प्रकल्पासाठी पारपोली व गावठाण या दोन गावांची संयुक्त मोजणी करून नवीन भूसंपादन कायद्यानुसार जमिनीचे ...

कोल्हापूर : आजरा तालुक्यातील सर्फनाला प्रकल्पासाठी पारपोली व गावठाण या दोन गावांची संयुक्त मोजणी करून नवीन भूसंपादन कायद्यानुसार जमिनीचे संपादन करावे, नागणवाडी प्रकल्पासाठी स्वेच्छा पुनर्वसन केलेल्या नागरिकांना अत्यंत कमी अनुदान मिळाले असून, त्यांच्यासाठी पॅकेजच्या निम्म्या रकमेसह सानुग्रह अनुदानाचा प्रस्ताव मंजूर करण्यात यावा, असा निर्णय सोमवारी झालेल्या बैठकीत घेण्यात आला. यावेळी जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी नागणवाडी, आंबेओहळ सर्फनाला आणि धामणी प्रकल्पग्रस्तांना न्याय दिला जाईल, अशी ग्वाही जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी दिली.

मंत्री जयंत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयात राधानगरी, कागल तसेच आजरा विभागातील लघू-मध्यम प्रकल्पांची आढावा बैठक घेण्यात आला. यावेळी ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ, आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर, खासदार संजय मंडलीक, आमदार राजेश पाटील, आमदार प्रकाश आबिटकर, जिल्हाधिकारी दौलत देसाई, अपर जिल्हाधिकारी किशोर पवार, जिल्हा पुर्नवसन अधिकारी अश्विनी जिरंगे, विजय देवणे उपस्थित होते.

मंत्री हसन मुश्रीफ यांनी प्रकल्पग्रस्तांच्या आर्थिक मोबदल्याचा प्रश्न प्रशासनाने लवकरात लवकर निकाली काढावा. यात जिल्हाधिकाऱ्यांनी लक्ष घालावे, अशी सूचना केली. जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी नागणवाडीतील ८० टक्के प्रकल्पग्रस्तांना जमीन देण्यात आली आहे. स्वेच्छा पुनर्वसन केलेल्या २० टक्के लोकांना नवीन पॅकेजच्या निम्मी रक्कम तरी मिळावी, त्यांना सानुग्रह अनुदान मिळावे याचा प्रस्ताव मंजुरीसाठी पाठवण्यात आल्याचे सांगितले.

मोबदला मिळाला तरच मोजणीस विरोध नाही..

प्रकल्पग्रस्तांच्या वतीने धनाजी गुरव, संपत देसाई, संजय तरडेकर, अशोक जाधव यांनी मत मांडले. या वेळी त्यांनी प्रशासनाने जमिनीसह जे-जे अस्तित्वात आहे त्या सर्वांची मोजणी नियमाप्रमाणे करावे आणि त्याचा योग्य तो मोबदला ग्रामस्थांना मिळाला तर ग्रामस्थांचा (प्रकल्पग्रस्तांचा) मोजणीला विरोध नसल्याचे स्पष्ट केले.

बुधवारपासून मोजणी..

प्रांताधिकारी संपत खिलारी यांनी प्रकल्प बाधितासंदर्भातील आवश्यक ती मोजणी पावसाळ्यापूर्वी संपविण्यात येईल. त्यासाठी प्रत्यक्ष सुरुवात येत्या बुधवारी करण्यात येईल अशी माहिती प्रांताधिकारी संपत खिलारी यांनी दिली.

-

फोटो नं ३१०५२०२१-कोल-प्रकल्पग्रस्त

ओळ : कोल्हापुरातील जिल्हाधिकारी कार्यालयात सोमवारी जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली प्रकल्पग्रस्तांच्या पुनर्वसनाची बैठक झाली. यावेळी आमदार प्रकाश आबिटकर, ग्रामविकास मत्री हसन मुश्रीफ, खासदार संजय मंडलिक, जिल्हाधिकारी दौलत देसाई, आमदार राजेश पाटील, अप्पर जिल्हाधिकारी किशोर पवार यांच्यासह अधिकारी उपस्थित होते.

--

-