शिवाजी रोड परिसरातील पतसंस्थेतून रोकडसह कर्जरोखे लंपास
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 6, 2021 15:51 IST2021-07-06T15:49:46+5:302021-07-06T15:51:25+5:30
Crimenews Police Kolhapur : शिवाजी रोड परिसरातील एका अवसायनात निघालेले पतसंस्थेतून चोरट्याने बंद स्थितीतील संगणक व एक हजार रुपयांची रोकडसह कर्जरोखे लंपास केले. याबाबतची फिर्याद अवसायक अतुल विश्वनाथ पवार (वय ७३, रा. न्यू शाहुपुरी) यांनी शाहुपुरी पोलीस ठाण्यात दिली.

शिवाजी रोड परिसरातील पतसंस्थेतून रोकडसह कर्जरोखे लंपास
कोल्हापूर : शिवाजी रोड परिसरातील एका अवसायनात निघालेले पतसंस्थेतून चोरट्याने बंद स्थितीतील संगणक व एक हजार रुपयांची रोकडसह कर्जरोखे लंपास केले. याबाबतची फिर्याद अवसायक अतुल विश्वनाथ पवार (वय ७३, रा. न्यू शाहुपुरी) यांनी शाहुपुरी पोलीस ठाण्यात दिली.
पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी, शिवाजी रोडवरील शिवसाई नागरी पतसंस्था आहे. ही संस्था अवसायनात निघाल्यामुळे त्यावर अवसायक म्हणून फिर्यादी पवार हे काम पाहत आहे.
या संस्थेत २० ऑक्टोबर २०१८ ते २१ फेब्रुवारी २१ या दरम्यान अज्ञात चोरट्याने संस्थेच्या दरवाजचे कुलूप तोडून प्रवेश करून एक हजार रुपये व बंद स्थितीत असलेला जुना संगणक, एक हजार रुपये व कर्जरोखे लंपास केले. ही बाब फिर्यादींच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी लक्ष्मीपुरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार अज्ञाताविरोधात गुन्हा नोंद झाला.