शहरं
Join us  
Trending Stories
1
"रस्ते आणि उड्डाणपूल म्हणजे विकास नाही"; राज ठाकरेंनी करुन दिली बाबासाहेबांच्या समग्र दृष्टीची आठवण
2
"आमच्या कामात ढवळाढवळ नको"; इराणच्या नाकेबंदीवरून चीनचा अमेरिकेला थेट इशारा, महायुद्ध पेटण्याची भीती
3
मुंबई हादरली..! लाइव्ह म्युझिक कॉन्सर्टमध्ये ड्रग्जच्या ओव्हरडोजने २ विद्यार्थ्यांचा मृत्यू, नेस्कोच्या अधिकाऱ्यांसह ५ अटकेत, १ तरुणी गंभीर
4
अधिवेशन पास घोटाळा; विधानभवनातील तिघे कर्मचारी निलंबित, एक अद्याप पसारच
5
"सध्या माझ्या मनात.."; आजीच्या निधनाने जनाई कोलमडली, सोशल मीडियावर व्यक्त केल्या भावना
6
सूर्याचा उच्च राशीत प्रवेश २०२६: ७ राशींना मेष संक्रांतीने यश-लाभ; १ उपायाने महिनाभर भरभराट!
7
...अन् बाबासाहेब स्वत: समोर येऊन बोलू लागले; चर्चिल-ॲटलींसोबतचा संवाद झाला सजीव
8
Noida Protest: जाळपोळ, तोडफोड आणि दगडफेक; ६० जणांना अटक, नोएडा हिंसाचारात आतापर्यंत काय-काय घडलं?
9
रुपयाच्या नाण्यांतून उभारली श्रद्धेची गाथा; १७ हजार नाण्यांचा संग्रह
10
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेला सोने परवडत नाहीये? घरी आणा 'या' ६ स्वस्त वस्तू; मिळेल सोनेखरेदीचे अक्षय्य पुण्य!
11
आजचे राशीभविष्य, १४ एप्रिल २०२६: कामात यश मिळेल, घरात सुख-शांती नांदेल, नशिबाची साथ मिळेल.
12
उद्यापासून उष्णतेच्या लाटेचा तडाखा, अकोला @ ४३.८
13
स्मरण दिन २०२६: अवतार सांगता करताना स्वामींनी कोणते वचन दिले?; शेवटचा शब्द आजही पाळतात!
14
स्वामी समर्थ स्मरण दिन २०२६: ‘असे’ करा पूजन, आवर्जून म्हणा स्वामी मंत्र; पाहा, विधी-मान्यता
15
यंदा कसा असेल पाऊस? हवामान खात्याने मान्सूनबाबत दिली चिंता वाढवणारी माहिती
16
बिहारमध्ये नवीन सरकार स्थापनेच्या हालचालींना वेग, उद्या शपथविधी सोहळा होण्याची शक्यता
17
पूर्ववैमनस्यातून पत्नीच्या डोळ्यांसमोर दादरमध्ये तरुणाची निर्घृण हत्या
18
९ महिने तपास रखडवला, मुलीचा सांगाडाच हाती; २८ पोलीस निलंबित
19
अवैध प्रवासी वाहतूक बेतली जिवावर, ११ जणांचा मृत्यू, कल्याण-मुरबाड महामार्गावर नेमका कसा घडला अपघात?
20
मतदारसंघ पुनर्रचना अत्यंत धोकादायक अन् संविधानावर हल्ला, सोनिया गांधींची टीका
Daily Top 2Weekly Top 5

पाठलाग करून चारचाकी वाहनासह सव्वापाच लाखांची दारू जप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 16, 2021 04:33 IST

कोल्हापूर : बेकायदेशीर विदेशी दारूची वाहतूक करणारे चारचाकी वाहन जुना राजवाडा पोलिसांच्या नवीन वाशीनाका येथे मंगळवारी पाठलाग करून पकडले. ...

कोल्हापूर : बेकायदेशीर विदेशी दारूची वाहतूक करणारे चारचाकी वाहन जुना राजवाडा पोलिसांच्या नवीन वाशीनाका येथे मंगळवारी पाठलाग करून पकडले. कारवाईत पोलिसांनी सुमारे २८ हजारांचा विदेशी दारू साठा व सुमारे पाच लाखांचे आलिशान चारचाकी वाहन असा सुमारे ५ लाख २८ हजार २०६ रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. या कारवाईत योगेंद्र ज्ञानदेव राणे (वय २५, रा. जीवबा नाना पार्क, महालक्ष्मी पार्क, पुईखडी, कोल्हापूर) याला अटक केली. तर त्याचा साथीदार सागर हंकारे (रा. बागवाण गल्ली, रविवार पेठ) हा पळून गेला.

पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे यांच्या आदेशानुसार अवैध दारू विक्री करणारे वाहतूक करणारे, साठा करणा-यांविरुद्ध कारवाईचे सत्र सुरू आहे. मंगळवारी दुपारी नवीन वाशीनाका येथे जुना राजवाडा पोलीस ठाण्यातील गुन्हे अन्वेषणचे पथक पेट्रोलिंग करत असताना एक संशयास्पद चार चाकी वाहन जीवबा नाना पार्कच्या दिशेने भरधाव वेगाने गेले. त्या वाहनाचा पोलीस पथकाने पाठलाग केला. त्या वाहनाला पकडले. त्या वाहनावरील चालक योगेंद्र राणे याला पोलिसांनी अटक केली. तर त्याचा साथीदार सागर हंकारे हा वाहनातून उडी मारून पळून गेला.

या वाहनामध्ये पोलिसांनी तपासणी केली असता त्यामध्ये सुमारे २८ हजार २०६ रुपये किमतीचा विदेशी दारूचा विक्रीसाठी आणलेला साठा सापडला. त्या दारूच्या साठ्यासह चारचाकी वाहन पोलिसांनी जप्त केले. ही कारवाई जुना राजवाडा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक प्रमोद जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे अन्वेषण प्रमुख सहा. पो. नि. योगेश पाटील यांच्या पथकाने कारवाई केली.

फोटो नं. १५०६२०२१-कोल-योगेंद्र राणे (आरोपी)

फोटो नं. १५०६२०२१-कोल-पोलीस०२

ओळ : जुना राजवाडा पोलीस ठाण्याच्या पथकाने नवीन वाशीनाका येथे चारचाकी व वाहनाचा पाठलाग करून बेकायदेशीर विदेशी दारूचा साठा जप्त केला.

फोटो नं. १५०६२०२१-कोल-पोलीस०३

ओळ : जप्त केलेली चारचाकी वाहन.

===Photopath===

150621\15kol_9_15062021_5.jpg~150621\15kol_10_15062021_5.jpg~150621\15kol_11_15062021_5.jpg

===Caption===

फोटो नं. १५०६२०२१-कोल-योगेद्र राणे (आरोपी)फोटो नं. १५०६२०२१-कोल-पोलीस०२ओळ : जुना राजवाडा पोलीस ठाण्याच्या पथकाने नवीन वाशीनाका येथे चारचाकीव वाहनाचा पाठलाग करुन बेकायदेशीर विदेशी दारुचा साठा जप्त केला.फोटो नं. १५०६२०२१-कोल-पोलीस०३ओळ : जप्त केलेली चारचाकी वाहन.~फोटो नं. १५०६२०२१-कोल-योगेद्र राणे (आरोपी)फोटो नं. १५०६२०२१-कोल-पोलीस०२ओळ : जुना राजवाडा पोलीस ठाण्याच्या पथकाने नवीन वाशीनाका येथे चारचाकीव वाहनाचा पाठलाग करुन बेकायदेशीर विदेशी दारुचा साठा जप्त केला.फोटो नं. १५०६२०२१-कोल-पोलीस०३ओळ : जप्त केलेली चारचाकी वाहन.~फोटो नं. १५०६२०२१-कोल-योगेद्र राणे (आरोपी)फोटो नं. १५०६२०२१-कोल-पोलीस०२ओळ : जुना राजवाडा पोलीस ठाण्याच्या पथकाने नवीन वाशीनाका येथे चारचाकीव वाहनाचा पाठलाग करुन बेकायदेशीर विदेशी दारुचा साठा जप्त केला.फोटो नं. १५०६२०२१-कोल-पोलीस०३ओळ : जप्त केलेली चारचाकी वाहन.