Kolhapur: मैत्रीसाठी लेडीज टेलरचा पाठलाग, जीवे मारण्याची धमकी; तरुणाला अटक 

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 7, 2025 18:38 IST2025-06-07T18:37:27+5:302025-06-07T18:38:16+5:30

गडहिंग्लज : माझ्याशी मैत्री ठेव, नाहीतर तुला जीवे ठार मारतो, अशी धमकी दिल्याप्रकरणी येथील एकाविरुद्ध गडहिंग्लज पोलिसांत विनयभंगाचा गुन्हा ...

Lady tailor chased for friendship, threatened to kill Youth arrested in Gadhinglaj kolhapur | Kolhapur: मैत्रीसाठी लेडीज टेलरचा पाठलाग, जीवे मारण्याची धमकी; तरुणाला अटक 

Kolhapur: मैत्रीसाठी लेडीज टेलरचा पाठलाग, जीवे मारण्याची धमकी; तरुणाला अटक 

गडहिंग्लज : माझ्याशी मैत्री ठेव, नाहीतर तुला जीवे ठार मारतो, अशी धमकी दिल्याप्रकरणी येथील एकाविरुद्ध गडहिंग्लज पोलिसांत विनयभंगाचा गुन्हा दाखल झाला आहे. सचिन सुभाष हेब्बाळे (वय ३५, रा. काळभैरी रोड, गडहिंग्लज) असे त्याचे नाव असून, न्यायालयाने त्याची १५ हजारांच्या जामिनावर सुटका केली.

सचिन हेब्बाळे हा शहरातील एका लेडीज टेलरच्या दुकानासमोर वारंवार फेऱ्या मारत होता. तुझा मोबाइल नंबर दे, माझ्याशी मैत्री ठेव असे म्हणत तो वेळोवेळी तिचा पाठलाग करीत होता. दरम्यान, बुधवार (दि.४) दुपारी अयोध्यानगर ते शिवाजी चौकादरम्यान तिचा पाठलाग करून मोबाइलवर फोन करून मैत्री ठेव, नाहीतर तुला जीवे ठार मारतो, अशी धमकी त्याने महिलेला दिली. पीडित महिलेच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करून पोलिसांनी त्याला अटक केली होती.

Web Title: Lady tailor chased for friendship, threatened to kill Youth arrested in Gadhinglaj kolhapur