शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांनी युद्धविराम वाढवला, पण इराणला नाही विश्वास, अमेरिकेसमोर ठेवली 'अशी' अट!
2
solar energy: सौरऊर्जा ग्राहकांना आणखी एक ‘झटका’, आता वीज शुल्क करही द्यावा लागणार
3
ट्रम्प यांची 'पीस-डील' धोक्यात! इराणच्या कट्टर धोरणामुळे मध्यपूर्वेत पुन्हा युद्धाचे सावट
4
ट्रम्प यांना खूश करण्यासाठी युक्रेनचा नवा डाव; डोनबासचा काही भाग आता होणार 'डोनीलँड'?
5
‘नाव मोठं लक्षण खोटं’... तरीही LSG संघ मालक संजीव गोयंका यांनी थोपटली रिषभ पंतची पाठ (VIDEO)
6
इराणनं अमेरिकेची नाकाबंदी तोडली, नाकाखालून घेऊन गेला ३४ टँकर्स; ९० कोटी डॉलर्सचं तेल 'होर्मुज'बाहेर! असा दिला चकमा
7
कॅप्टन रियान परागची चाल अन् गोलंदाजांची कमाल! RR नं पंतच्या LSG ला घरच्या मैदानात दिला पराभवाचा दणका
8
उकाड्याने हैराण पुण्यात अचानक पावसाचा वर्षाव; स्वारगेट, शास्त्री रोड परिसरात मध्यम सरी
9
LSG vs RR :अवघ्या ११ धावांत पंतसह तिघांच्या पदरी भोपळा! बडोनीनं स्वतःच्या पायावर मारून घेतली कुऱ्हाड
10
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
11
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
12
Vaibhav Suryavanshi Fastest 500 : छोट्याखानी खेळीत महारेकॉर्ड! वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास
13
मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यात मोठा निकाल; पुराव्याअभावी ४ आरोपींची निर्दोष मुक्तता!
14
LSG vs RR : शमीचा जलवा! यशस्वीपाठोपाठ ध्रुव जुरेल ठरला झिरो! लगेच संजीव गोएंकांनी काढला फोटो
15
प्रियकर मुलीच्या खोलीतून निघाला; चिडलेल्या बापाने पोटच्या १७ वर्षीय मुलीला संपवले
16
इराण-अमेरिका युद्धाचा फटका आता थेट 'फॅमिली प्लॅनिंग'ला! ३० टक्क्यांपर्यंत वाढू शकतात कंडोम्सचे भाव
17
उल्हासनगर महापालिकेत 'डम्पिंग'वरून रणकंदन; भाजप नगरसेवकांचे ठिय्या आंदोलन
18
कल्याणमध्ये ७० हजार रुपयांचा सायबर क्राईम : हेल्पलाईन तक्रार करुन दाद नाही
19
पाकिस्तानमधून इराणमध्ये दहशतवादी घुसले! रास्क सीमेवर मोठी चकमक; १२ दहशतवादी ठार
20
ममता बॅनर्जींचा हस्तक्षेप लोकशाहीसाठी धोकादायक! आयपॅक-ईडी कारवाईवरून सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे
Daily Top 2Weekly Top 5

कुरुंदवाड पालिकेत डांगेंचे ‘कमळ’ फुलणार का?

By admin | Updated: September 6, 2016 01:16 IST

भाजपची ताकद वाढली : काही प्रभागात दलित, मुस्लिम समाजाची मते निर्णायक

गणपती कोळी --कुरुंदवाडमधील डांगे गटाचे नेते रामचंद्र डांगे यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्याने सध्यातरी शहरात भाजपची ताकद वाढली आहे. आगामी पालिका निवडणुकीत राजकीय लाभ घेण्यासाठी भाजपने डांगे यांना आपल्या पक्षात घेण्यात यश मिळविले असले, तरी गत निवडणुकीतील घटक डांगे यांच्या पाठीशी राहणार का? हा मोठा प्रश्न आहे. या घटकांमध्ये परिवर्तन करण्याचे आव्हान त्यांच्यासमोर असून, डांगे यांच्यामुळे पालिकेत कमळ दिसेल, मात्र फुलेल का? या प्रश्नाचे उत्तर निवडणुकीनंतरच मिळणार आहे.शहरात रावसाहेब पाटील, जयराम पाटील व रामचंद्र डांगे असे तीन प्रमुख गट आहेत. या गटांभोवतीच पालिकेचे राजकारण फिरत असते. पालिकेच्या गत निवडणुकीत डांगे यांनी शहरातील आघाडी राजकारणाला फाटा देत प्रथमच राष्ट्रवादीच्या चिन्हावर निवडणूक लढवून पक्षीय राजकारणाला सुरुवात केली. त्यांच्या विरोधात दोन पाटील एकत्र येऊन आघाडी केली होती. या चुरशीच्या निवडणुकीत १७ पैकी राष्ट्रवादीच्या डांगे यांनी आठ जागा जिंकून आपली ताकद दाखविली होती, तर विरोधी आघाडीला नऊ जागा मिळाल्या होत्या. त्यापैकी रावसाहेब पाटील यांच्या शहर सुधारणा आघाडीला सहा व जयराम पाटील यांच्या जनविकास आघाडीला तीन जागा मिळाल्या होत्या. नगरसेवक व आघाडी नेत्यांच्या सोयीच्या राजकारणामुळे पालिकेत सत्तापालट होत राहिला. गतवर्षी झालेल्या विधानपरिषद निवडणुकीत सोयीची भूमिका घेतल्याने जिल्हा राष्ट्रवादीने डांगे यांना पक्षातून काढून टाकले होते. हीच वेळ साधत भाजपने डांगे यांच्या माध्यमातून शहरात भाजप सक्षम करण्यासाठी त्यांना आपल्या पक्षात ओढले.डांगे यांच्या व्यक्तिगत गटाची ताकद आहे, शिवाय गत निवडणुकीत दलित, मुस्लिम समाजाची ताकद मिळाल्याने डांगे यांना चांगल्या जागा मिळविता आल्या. मात्र, डांगे यांनी भाजपमध्ये जाऊन आगामी निवडणूक कमळ चिन्हावरच लढविण्याचा निर्णय घेतला आहे. शहरातील काही प्रभागात दलित, मुस्लिम समाजाची मते निर्णायक आहेत. या घटकांवर काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसचा प्रभाव अधिक आहे. त्यामुळे डांगे यांना या घटकातील मतांमध्ये परिवर्तन करण्याचे मोठे आव्हान आहे.डांगे यांना स्वत:च्या हक्काच्या प्रभागामधून पालिकेत कमळ नेण्यात यश येईल. मात्र, कमळ फुलविण्यात ते कितपत यशस्वी होतील हे निवडणुकीनंतरच कळणार आहे.