नृसिंहवाडीत कृष्णावेणी माता उत्सव सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 20, 2021 05:10 IST2021-02-20T05:10:14+5:302021-02-20T05:10:14+5:30

नृसिंहवाडी : श्रीक्षेत्र नृसिंहवाडी येथील श्री दत्तमंदिराच्या परिसरात शुक्रवारी श्री कृष्णावेणी मातेच्या उत्सवास प्रारंभ झाला. सकाळी ११ वाजता कृष्णावेणी ...

Krishnaveni Mata Utsav begins in Nrusinhwadi | नृसिंहवाडीत कृष्णावेणी माता उत्सव सुरू

नृसिंहवाडीत कृष्णावेणी माता उत्सव सुरू

नृसिंहवाडी : श्रीक्षेत्र नृसिंहवाडी येथील श्री दत्तमंदिराच्या परिसरात शुक्रवारी श्री कृष्णावेणी मातेच्या उत्सवास प्रारंभ झाला. सकाळी ११ वाजता कृष्णावेणी मातेच्या मूर्तीची परंपरेनुसार विधिवत प्रतिष्ठापना करण्यात आली. १० दिवस हा उत्सव सुरू राहणार आहे. शुक्रवारी पहाटे पाच वाजता मानकरी जनार्दन, सचिन, संदीप कागलकर आणि परिवार या मानकऱ्यांच्या घरातून श्री कृष्णावेणीची सालंकृत मूर्ती वाद्यांच्या गजरात मिरवणुकीने उत्सव मंडपात आणण्यात आली. नृसिंहवाडीसह कुरुंदवाड, शिरोळ, इचलकरंजी, सांगली, आदी भागांतून आलेल्या महिलांनी मिरवणुकीवेळी कृष्णावेणी मातेस पंचारतीने ओवाळले व आशीर्वाद घेतले.

सकाळी कृष्णावेणी मातेची विश्वेश्वर उपाध्ये व अवधूत शास्त्री बोरगावकर यांच्या पौरोहित्याखाली गुरुप्रसाद बड्डपुजारी यांनी विधिवत प्रतिष्ठापना केली. दुपारी नैवेद्य, आरती झाल्यानंतर एकवीरा भजनी मंडळ यांचे कृष्णा लहरी पठण, चार वाजता वेदशास्त्रसंपन्न हरी नारायण चोपदार यांचे पुराण, सायंकाळी वैष्णवी जोशी (रत्नागिरी) यांचे भक्तिसंगीत व रात्री ह.भ.प. विवेक गोखले यांचे कीर्तन असे कार्यक्रम पार पडले.

फोटो - १९०२२०२१-जेएवाय-०४

फोटो ओळ - नृसिंहवाडी (ता. शिरोळ) कृष्णावेणी मातेची मूर्ती उत्सव मंडपात आणण्यात आली.

Web Title: Krishnaveni Mata Utsav begins in Nrusinhwadi