कृष्णराज महाडिक तिसरा नॅशनल चॅम्पियनशीप रेस

By Admin | Updated: December 17, 2014 00:15 IST2014-12-17T00:02:50+5:302014-12-17T00:15:44+5:30

वाऱ्याच्या वेगाशी स्पर्धा करणाऱ्या गो-कार्टिंगचा हा थरार अनुभवण्यासाठी जगभरातील हजारो शौकिनांनी या ठिकाणी गर्दी केली होती.

Krishnaraj Mahadik third national championship race | कृष्णराज महाडिक तिसरा नॅशनल चॅम्पियनशीप रेस

कृष्णराज महाडिक तिसरा नॅशनल चॅम्पियनशीप रेस

कोल्हापूर : कोल्हापूरच्या कृष्णराज महाडिक याने उत्तर प्रदेशातील ग्रेटर नोएडा येथील विश्वविख्यात बुद्ध सर्किट ट्रॅकवर नुकत्याच झालेल्या नॅशनल चॅम्पियनशीप रेसमध्ये तिसरे स्थान पटकावले.
वाऱ्याच्या वेगाशी स्पर्धा करणाऱ्या गो-कार्टिंगचा हा थरार अनुभवण्यासाठी जगभरातील हजारो शौकिनांनी या ठिकाणी गर्दी केली होती. गो-कार्टिंग रेसच्या विश्वात कोल्हापूरच्या मोहितेज रेसिंग अकॅडमीच्या खेळाडूंनी स्वतंत्र ओळख निर्माण केली आहे.
उत्तर प्रदेशातील ग्रेटर नोएडा येथील बुद्ध सर्किट ट्रॅकवर झालेल्या नॅशनल चॅम्पियनशीप रेसच्या तिसऱ्या फेरीत पहिला क्रमांक चेन्नईचा विष्णू प्रसाद याने, तर बंगलोरच्या अखिल रवींद्र याने दुसरे आणि कोल्हापूरच्या कृष्णराज महाडिक याने तिसरे स्थान पटकावले. त्याला अकबर इब्राहिम यांचे मार्गदर्शन लाभले. (प्रतिनिधी)

Web Title: Krishnaraj Mahadik third national championship race