कोतोलीच्या सरपंचांचे ग्रामपंचायतीसमोर उपोषण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 06:53 IST2021-02-05T06:53:48+5:302021-02-05T06:53:48+5:30

ग्रामपंचायतीच्या माध्यमातून कोतोली गावचा विकास करीत असताना मागील दोन वर्षांपासून ग्रामविकास अधिकारी वारंवार रजेवर जाणे, गैरहजर राहणे, कामाकडे दुर्लक्ष ...

Kotoli sarpanch fasts in front of gram panchayat | कोतोलीच्या सरपंचांचे ग्रामपंचायतीसमोर उपोषण

कोतोलीच्या सरपंचांचे ग्रामपंचायतीसमोर उपोषण

ग्रामपंचायतीच्या माध्यमातून कोतोली गावचा विकास करीत असताना मागील दोन वर्षांपासून ग्रामविकास अधिकारी वारंवार रजेवर जाणे, गैरहजर राहणे, कामाकडे दुर्लक्ष करणे, खोटी कागदपत्रे तयार करणे, तसेच १४ व्या वित्त आयोगाकडे दुर्लक्ष करणे, सन २०१९/२० सालातील ७० लाख निधीचा निविदा प्रक्रिया पूर्ण झाली असतानादेखील ठेकेदारांना काम सुरू करण्यासाठी नोटिसा देऊनही ते काम करीत नाहीत. या बाबींची तक्रार पंचायत समिती व जिल्हा परिषद कार्यालयाकडे करूनदेखील याबाबत कोणताही निर्णय अगर कारवाई होत नाही. त्यामुळे विकासकामे रेंगाळली असल्याने प्रजासत्ताक दिनी ध्वजारोहणाचा मान डावलून उपोषणास सुरुवात करण्यात आली असल्याचे त्यांनी निवेदनात म्हटले आहे. खासदार धैर्यशील माने यांनी उपोषण स्थळी भेट देऊन तक्रारी समजावून घेतल्या.

फोटो : कोतोली (ता. पन्हाळा) येथील ग्रामपंचायतीसमोर सरपंच प्रकाश पाटील यांनी उपोषण सुरू केले आहे.

Web Title: Kotoli sarpanch fasts in front of gram panchayat