शहरं
Join us  
Trending Stories
1
SRH vs DC : दिल्लीच्या फलंदाजांनी नांगी टाकली; पण पावसाच्या बॅटिंगमुळे हैदराबाद फक्त बॉलिंग करून 'आउट'
2
"९० हजार सैनिकांचे पायजमे आजही तिथे टांगलेले आहेत’’, मुनीर आणि पाकिस्तानचं बलूच नेत्याकडून वस्रहरण   
3
दोन्ही दिल्लीकर एकाच क्रीजमध्ये; रन आउटसाठी स्टँडमध्ये काव्या मारनची 'दातओठ खात' तळमळ (VIDEO)
4
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं सरपंच संतोष देशमुख यांची कन्या वैभवीचं कौतुक
5
"वेगळे राजकारण करून पॅनलला गालबोट लावण्याचा प्रयत्न केल्यास माझ्या दारात येऊ नका",अजित पवार यांचा इशारा
6
SRH vs DC : पॅट कमिन्सचा विकेट्सचा खास पॅटर्न! स्पेल बघून काव्या मारनही झाली शॉक
7
निकाल ऐकण्यापूर्वीच विद्यार्थिनीने संपवलं जीवन, नापास झाल्याच्या भीतीतून उचलले पाऊल
8
Shivalik Sharma: क्रिकेटरला अटक; लग्नाचे आमिष दाखवून तरुणीवर अत्याचार केल्याचा आरोप
9
रेल्वे स्थानकाच्या पायऱ्यांवर पाकिस्तानी ध्वज चिकटवला; पाहताच महिलेने घातला गोंधळ, व्हिडीओ व्हायरल
10
SRH vs DC : "डिअर क्रिकेट प्लीज प्लीज ..." दुसऱ्यांदा पदरी भोपळा पडल्यावर करूण नायर झाला ट्रोल
11
"महायुती म्हणजे 'तीन तिघाडा, काम बिघाडा"; काँग्रेस फोडण्याच्या मुद्द्यावरून प्रणिती शिंदेंची टीका
12
ड्रग्स टेस्टमध्ये दोषी आढळलेला कगिसो रबाडा पुन्हा IPL खेळणार, 'या' संघाविरूद्ध होणार 'कमबॅक'
13
हवाई हल्ल्याची तयारी... पाकिस्तानसोबत तणावाच्या पार्श्वभूमीवर गृह मंत्रालयाचे सर्व राज्यांना निर्देश
14
भारताच्या संरक्षण वेबसाईट्सवर पाकिस्तानकडून सायबर हल्ला, महत्त्वपूर्ण गोपनीय माहिती लीक झाल्याचा संशय
15
काही लोक काँग्रेस सोडत आहेत, आमची वेळ आल्यावर आम्हीही बदला घेऊ- विजय वडेट्टीवार
16
वाहतुकीचे नियम तोडले तर मिळतील निगेटिव्ह पॉईंट्स, ड्रायव्हिंग लायसन होणार सस्पेंड, अशी आहे नवी पॉईंट सिस्टिम
17
ही आहे भारताची ताकद; जर्मनी-फ्रान्सचा पाकिस्तानबाबत मोठा निर्णय, जाणून घ्या...
18
पाकवर आर्थिक हल्ला; ADB अध्यक्षांना भेटल्या निर्मला सीतारामण, निधी रोखण्याची केली मागणी
19
२२ महीने राबला, पगार मागताच हॉटेल मालक, मॅनेजरने स्वयंपाक्याचा गुप्तांग ठेचून खून केला
20
"जातीनिहाय जनगणनेमुळे मराठा आरक्षणाचा प्रश्न सुटेल’’, हर्षवर्धन सपकाळ यांनी व्यक्त केला विश्वास

कोल्हापूरचे पालकमंत्री चंद्रकांतदादांकडे एवढे पैसे येतात कुठून : क्षीरसागर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 23, 2017 13:50 IST

कोल्हापूरचे पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी गेल्या अनेक महिन्यांत सणांबाबत जबरदस्ती करीत गप्प बसण्यासाठी अनेकांना ‘आत टाकण्या’ची भाषा वापरली .त्यानंतर त्याच तरुण मंडळांना लाखो रुपये वाटप केले आहेत. त्यांच्याकडे एवढ्या अल्पावधीत एवढे लाखो, कोटी रुपये आले कोठून, याबाबत पालकमंत्र्यांची ‘ईडी’ अर्थात सक्त अंमलबजावणी खात्यातर्फे चौकशी करावी, अशी मागणी आमदार राजेश क्षीरसागर यांनी केले.

ठळक मुद्दे‘ईडी’मार्फत चौकशी करा; राजेश क्षीरसागर यांची मागणी एक हजार महिलांना हेल्मेट वाटप डॉ. विश्वनाथ गायक वाड यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ शिवसेनेतर्फे कार्यक्रमसुनील मोदींचा शिवसेनेत जाहीर प्रवेश

 कोल्हापूर : कोल्हापूरचे पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी गेल्या अनेक महिन्यांत सणांबाबत जबरदस्ती करीत गप्प बसण्यासाठी अनेकांना ‘आत टाकण्या’ची भाषा वापरली .त्यानंतर त्याच तरुण मंडळांना लाखो रुपये वाटप केले आहेत. त्यांच्याकडे एवढ्या अल्पावधीत एवढे लाखो, कोटी रुपये आले कोठून, याबाबत चंद्रकांतदादांची ‘ईडी’ अर्थात सक्त अंमलबजावणी खात्यातर्फे चौकशी करावी, अशी मागणी आमदार राजेश क्षीरसागर यांनी केले.

स्वर्गीय डॉ. विश्वनाथ गायक वाड यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ शिवसेनेतर्फे रविवारी सकाळी केशवराव भोसले नाट्यगृहात आयोजित केलेल्या महिलांना हेल्मेट वाटप कार्यक्रमप्रसंगी संयोजक म्हणून ते बोलत होते.

आमदार क्षीरसागर म्हणाले, मीही त्यांच्याबरोबरीने दोन टर्म आमदार आहे. मात्र, त्यांनी मंत्रिमंडळात स्थान पटकाविले. त्यानंतर लाखो, कोटींची उड्डाणे घेतली. गणेशोत्सवाच्या काळात अनेक तरुण मंडळे व तालमींच्या कार्यकर्त्यांना साउंड सिस्टीम लावू नका; नाहीतर चार-चार दिवस आत टाकीन. दिवाळीत फटाके फोडू नका; अन्यथा कारवाई करू, अशी जणू दादागिरीच सुरू केली आहे.

प्रत्येकाला पदे देण्याची भाषा आणि प्रत्येकाला पैशांमध्ये खरेदी करण्याची भाषा ते बोलत आहेत. त्यांचे असे बोलणे म्हणजे ते राज्याचे ट्रस्टी किंवा मालक असल्यासारखे वागत आहेत. मीही दोन वेळा आमदार झालो. त्यात तेही माझ्याबरोबरीने दोन्ही वेळेला आमदार म्हणून विधान परिषदेतून निवडून आले. त्यांच्याकडे त्यावेळी इतकी संपत्ती नव्हती. मात्र, गेल्या दोन वर्षांत त्यांनी मोठीच प्रगती केली आहे.

एवढे मोठे धन त्यांच्याकडे कोठून आले समजत नाही; त्यामुळे त्यांची सक्त अंमलबजावणी खाते अर्थात ‘ईडी’कडून चौकशी व्हावी. प्रथम मीही हेल्मेटला विरोध केला; कारण शाहूनगरीतील जनता कोणाचीही जोरजबरदस्ती ऐकून घेत नाही. त्यांच्यामध्ये जनजागृती करणे प्रशासनाचे काम होते; पण जबरदस्ती केल्याने मीही जनतेच्या बाजूने उभा राहिले. मात्र, मलाही कळते की, मनुष्याचे जीवन किती महत्त्वाचे आहे. त्यामुळेच मी व जितेंद्र गायकवाड यांच्या सहकार्याने शहरातील एक हजार महिलांना हेल्मेट वाटप करण्याचा कार्यक्रम आयोजित केला.

यावेळी शिवसेना खासदार गजानन कीर्तिकर, संपर्कप्रमुख अरुण दुधवडकर, शिवसेना जिल्हाप्रमुख मुरलीधर जाधव, पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीच्या कोषाध्यक्ष वैशाली क्षीरसागर, युवा सेना राज्य उपाध्यक्ष पवन जाधव, नगरसेविका प्रतिज्ञा उत्तुरे, माजी नगरसेवक रविकिरण इंगवले, परिवहन समितीचे सभापती नियाज खान, दिगंबर फराकटे, माजी महापौर मारुतीराव कातवरे, माजी उपमहापौर उदय पोवार, जितेंद्र गायकवाड, हर्षल सुर्वे, आदी उपस्थित होते.

मोदी आमच्यातहीमाजी नगरसेवक सुनील मोदी यांनी शिवसेना खासदार गजानन कीर्तिकर, नेते अरुण दुधवडकर, जिल्हाप्रमुख मुरलीधर जाधव यांच्या उपस्थितीत शिवसेनेत जाहीर प्रवेश केला. यावेळी निवेदकाने ‘जसे भाजपमध्ये पंतप्रधान मोदी आहेत, तसेच ब्रेन, बुद्धिवादी नेते म्हणून सुनील मोदी हेही आमच्यात ‘मोदी’ म्हणूनच आहेत, असे सांगताच सभागृहात टाळ्यांचा कडकडाट झाला.

एक भगवा फिका पडला म्हणून गडद भगव्याकडे निघालो!पक्षप्रवेशानंतर माजी नगरसेवक सुनील मोदी यांनी आपल्या भाषणात माजी नगरसेवक रविकिरण इंगवले यांनी सभागृहात येण्यापूर्वी ‘कुणाचा कडबा’ टाकण्यासाठी प्रवेश करणार, असा सवाल केला होता. त्यावर आपल्या भाषणात मोदी यांनी आपल्या भाषणात मी कुणाचा कडबा टाकण्यासाठी प्रवेश करीत नाही; तर मी राजकारणात येण्यापूर्वी हिंदुत्ववादी कार्यकर्ता म्हणून कार्यरत होतो. त्यात भाजप विद्यार्थी परिषद, हिंदू एकता, आदींमध्ये कार्य केले आहे.

भाजपमधील भगव्याचा रंग फिका पडला असून राज्याला दिशा देण्याचे काम ‘गडद भगवा’ अर्थात शिवसेना करणार आहे. मी कुठल्याही पदाच्या अपेक्षेने प्रवेश केलेला नाही. मी संघटना मजबूत करण्यासाठी पक्षप्रवेश केला आहे. यापुढे भाजपमधून माझ्यासह अनेक कार्यकर्ते सेनेत दाखल होतील, असे सूतोवाचही त्यांनी आपल्या भाषणात केले. 

 

टॅग्स :Shiv SenaशिवसेनाPoliticsराजकारण