डेक्कन अल्ट्रा मॅरेथाॅन स्पर्धेत कोल्हापूरचे चौघेजण चमकले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 25, 2021 04:31 IST2021-02-25T04:31:23+5:302021-02-25T04:31:23+5:30

कोल्हापूर : ट्रेन रेल अंतर्गत ऑफ रोड रेसमधील सह्याद्री डेक्कन अल्ट्रा मॅरेथाॅन स्पर्धेत कोल्हापूरच्या सुरेश चेचर याने द्वितीय, तर ...

Kolhapur's four shine in the Deccan Ultra Marathon | डेक्कन अल्ट्रा मॅरेथाॅन स्पर्धेत कोल्हापूरचे चौघेजण चमकले

डेक्कन अल्ट्रा मॅरेथाॅन स्पर्धेत कोल्हापूरचे चौघेजण चमकले

कोल्हापूर : ट्रेन रेल अंतर्गत ऑफ रोड रेसमधील सह्याद्री डेक्कन अल्ट्रा मॅरेथाॅन स्पर्धेत कोल्हापूरच्या सुरेश चेचर याने द्वितीय, तर डाॅ. संदेश बागडी, जयेश पटेल, राज पटेल यांनी चमकदार कामगिरी केली.

अत्यंत खडतर समजल्या जाणाऱ्या या स्पर्धेची सुरुवात महाराष्ट्रातील सर्वांत उंच असलेल्या कळसूबाई या ठिकाणी झाली. ८० कि.मी ऑफ रोड रेस १८ तासात पुर्ण करणे अपेक्षित असते. मात्र, या चौघांनी ही १५ तासांत पूर्ण केली. यात त्यांनी अलंगगड, मदनगड, कुलंगगड, रतनगड, अशा अतिशय अवघड कड्याकपारीतून तीव्र उतार, खडकाळ वाट, निसरडा रस्ता आणि घनदाट जंगलातून आगेकूच करत ३५६० मीटर उंचीवरून स्पर्धा झाली. या चौघांना अश्विन भोसले यांचे प्रशिक्षण व मार्गदर्शन लाभले.

Web Title: Kolhapur's four shine in the Deccan Ultra Marathon