शहरं
Join us  
Trending Stories
1
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
2
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
3
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
4
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
5
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
6
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
7
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
8
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
9
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
10
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
11
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
12
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
13
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
14
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
15
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
16
जीवाशी खेळ! एक्स्पायरी डेट बदलून विकत होते कोल्ड ड्रिंक्स, बिस्किट; मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश
17
Bhagwant Mann : "समोसा-पिझ्झाचा मुद्दा..."; राघव चड्ढांवर पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान कडाडले, आतिशींचा गंभीर आरोप
18
'सिंधू' करार स्थगितीनंतर पाकिस्तानला आणखी एक धक्का! पुन्हा सुरू होतोय 'मोहरा प्रकल्प', जाणून घ्या
19
IPL 2026: चेन्नईला होतोय पश्चाताप! ज्याला संघातून काढलं, तोच खेळाडू दिल्लीसाठी ठरतोय मोठा जॅकपॉट
20
पाकव्याप्त काश्मीर लवकरच भारतात समाविष्ट होणार; AIIO चे मुख्य इमाम उमर इलियासी यांची भविष्यवाणी
Daily Top 2Weekly Top 5

कोल्हापूर जिल्हा परिषद अध्यक्ष, उपाध्यक्षपदाच्या निवडी उद्या होणार; सत्तेचा फार्म्युला कसा...जाणून घ्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 16, 2026 12:24 IST

पाच वर्षांत २८ सदस्यांना संधी

कोल्हापूर : जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष, उपाध्यक्ष पदावरून गेले पंधरा-वीस दिवस निर्माण झालेला पेच अखेर संपला आहे. रविवारी विमानतळावर महायुतीच्या प्रमुख नेत्यांच्या झालेल्या बैठकीत अध्यक्षपद राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाकडे, तर उपाध्यक्षपद भाजपकडे देण्याचा निर्णय झाला. दोन्ही पदे सव्वा वर्षाला तर सभापतीपद मात्र वर्षाला बदलले जाणार आहे. अध्यक्षपदासाठी राष्ट्रवादीकडून शैलजा पाटील, शोभा फराकटे, तर उपाध्यक्षपदासाठी भाजपकडून तानाजी पाटील यांची नावे चर्चेत आहेत.जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत जिल्ह्यात ६८ पैकी तब्बल ५१ जागा महायुतीच्या निवडून आल्या आहेत. त्यात सर्वाधिक २० जागा राष्ट्रवादी अजित पवार पक्षाच्या आहेत. त्यामुळे अध्यक्ष पदावर राष्ट्रवादीने दावा केला आहे. मात्र, भाजप-जनसुराज्य पक्षानेही आपणालाच अध्यक्षपद मिळावे, यासाठी राजकीय ताकद वापरण्यास सुरुवात केल्याने, महायुतीमध्ये काहीसा तणाव निर्माण झाला होता. अध्यक्ष निवड दोन दिवसांवर आली, तरी गुंता सुटत नव्हता.अखेर, रविवारी विमानतळावर वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ, उच्च व तंत्र शिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील, पालकमंत्री प्रकाश आबीटकर, खासदार धैर्यशील माने, आमदार विनय कोरे, आमदार चंद्रदीप नरके, आमदार अमल महाडिक, आमदार राजेश क्षीरसागर, माजी आमदार डॉ.सुजीत मिणचेकर, प्रा.जयंत पाटील, जनसुराज्य पक्षाचे प्रदेशाध्यक्ष समीत कदम यांची बैठक झाली. यामध्ये अध्यक्ष व उपाध्यक्ष पदासाठी सव्वा-सव्वा वर्षाचा फार्म्युला निश्चित करण्यात आला. त्यानंतर, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना सांगण्यात आला.

महायुतीचे सदस्य आज पन्हाळ्यावरउद्या, मंगळवारी अध्यक्ष, उपाध्यक्ष पदाच्या निवडी होत आहे. त्यामुळे आज, सोमवारी महायुतीच्या ५१ सदस्यांना पन्हाळ्यावर एकत्रित केले जाणार आहे. तेथूनच अध्यक्ष, उपाध्यक्ष निवडीसाठी जाणार असल्याचे समजते.

असे आहे बलाबल...

  • राष्ट्रवादी : २०
  • भाजप : १२
  • शिंदेसेना : ०९
  • जनसुराज्य : ०५
  • शाहू आघाडी : ०४
  • अपक्ष : ०१
  • काँग्रेस : १५
  • उद्धवसेना : ०१
  • स्वाभिमानी संघटना : ०१

पाच वर्षांत २८ सदस्यांना संधीपाच वर्षांत चार अध्यक्ष व उपाध्यक्ष तर २० विषय समिती सभापती होणार आहेत. त्यामुळे महायुतीच्या ५१ पैकी २८ सदस्यांना पदाची संधी मिळणार आहे.

असा ठरला सत्तेचा फार्म्युला

  • अध्यक्ष : राष्ट्रवादी
  • उपाध्यक्ष : भाजप
  • सभापती : शिंदेसेना, जनसुराज्य, शाहू आघाडी
English
हिंदी सारांश
Web Title : Kolhapur Zilla Parishad elections: Power formula decided for president, vice-president.

Web Summary : Kolhapur Zilla Parishad's president post goes to NCP, vice-president to BJP. A power-sharing formula was decided in a meeting of Mahayuti leaders. 28 members will get a chance at positions in five years.