कोल्हापूर : गिरणीच्या पट्यात अडकून महिला ठार, पन्हाळा तालुक्यातील सावर्डे तर्फ असंडोली येथील घटना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 10, 2018 06:06 PM2018-11-10T18:06:19+5:302018-11-10T18:08:36+5:30

सावर्डे तर्फ असंडोली (ता. पन्हाळा) येथे दळप दळताना गिरणीच्या पट्ट्यात पदर आडकून महिला ठार झाली. मेघा मारुती पाटील (वय २९, रा. सावर्डे तर्फ आसंडोली, ता. पन्हाळा) असे त्यांचे नाव आहे. गावातील केदारलिंग विकास सोसायटीच्या गिरणीत हा प्रकार घडला. पन्हाळा पोलीस ठाण्यात घटनेची नोंद झाली आहे.

Kolhapur: Women killed in road collapses, Savarna incident in Panhanda taluka, Asandoli incident | कोल्हापूर : गिरणीच्या पट्यात अडकून महिला ठार, पन्हाळा तालुक्यातील सावर्डे तर्फ असंडोली येथील घटना

कोल्हापूर : गिरणीच्या पट्यात अडकून महिला ठार, पन्हाळा तालुक्यातील सावर्डे तर्फ असंडोली येथील घटना

Next
ठळक मुद्दे गिरणीच्या पट्यात अडकून महिला ठारपन्हाळा तालुक्यातील सावर्डे तर्फ असंडोली येथील घटना

कोल्हापूर : सावर्डे तर्फ असंडोली (ता. पन्हाळा) येथे दळप दळताना गिरणीच्या पट्ट्यात पदर आडकून महिला ठार झाली. मेघा मारुती पाटील (वय २९, रा. सावर्डे तर्फ आसंडोली, ता. पन्हाळा) असे त्यांचे नाव आहे. गावातील केदारलिंग विकास सोसायटीच्या गिरणीत हा प्रकार घडला. पन्हाळा पोलीस ठाण्यात घटनेची नोंद झाली आहे.

अधिक माहिती अशी, मेघा पाटील या शनिवारी दुपारी गावातील केदारलिंग विकास सोसायटीच्या गिरणीत धान्य दळण्यासाठी गेल्या होत्या. धान्याचा डबा ठेवून त्या गिरणीच्या पट्याजवळ थांबल्या असताना त्यांच्या साडीचा पदर पट्ट्यात अडकल्याने त्या ओढल्या गेल्या.

पट्ट्यात अडकून गिरणीवर आपटल्याने त्यांच्या डोक्याला गंभीर दूखापत होवून बेशुध्द पडल्या. हा प्रकार लक्षात येताच गिरणीतील कर्मचाऱ्याने परिसरातील नागरिकांना बोलवून घेतले.

जखमी मेघा यांना सीपीआरमध्ये दाखल असता उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. उत्तरीय तपासणीनंतर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. त्यांच्या अपघाती मृत्यूने गावात हळहळ व्यक्त केली जात आहे. याबाबत पन्हाळा पोलीस ठाण्यात नोंद झाली आहे.
 

 

Web Title: Kolhapur: Women killed in road collapses, Savarna incident in Panhanda taluka, Asandoli incident

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.