कोल्हापूर : दोन गटात हाणामारी, दोघे जखमी, पोलीस ठाण्यात परस्पर विरोधी गुन्हे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 3, 2018 15:06 IST2018-11-03T15:04:59+5:302018-11-03T15:06:24+5:30
धनवडे गल्ली, शुक्रवार पेठ येथे दोन गटात झालेल्या हाणामारीत दोघेजण जखमी झाले. मनोज विलासराव घाडगे (वय ३९) आणि उदय राजाराम कदम (३८, रा. उत्तरेश्वर पेठ) अशी जखमींची नावे आहेत. याप्रकरणी लक्ष्मीपूरी पोलीस ठाण्यात परस्पर विरोधी गुन्हे दाखल झाले.

कोल्हापूर : दोन गटात हाणामारी, दोघे जखमी, पोलीस ठाण्यात परस्पर विरोधी गुन्हे
कोल्हापूर : धनवडे गल्ली, शुक्रवार पेठ येथे दोन गटात झालेल्या हाणामारीत दोघेजण जखमी झाले. मनोज विलासराव घाडगे (वय ३९) आणि उदय राजाराम कदम (३८, रा. उत्तरेश्वर पेठ) अशी जखमींची नावे आहेत. याप्रकरणी लक्ष्मीपूरी पोलीस ठाण्यात परस्पर विरोधी गुन्हे दाखल झाले.
अधिक माहिती अशी, गुरुवारी (दि. १) मनोज घाडगे हे घरात टिव्ही पाहत बसले होते. भांडणाचा आवाज आल्याने ते पाहणेसाठी बाहेर गेले असता त्यांचा चुलत भाऊ बबलु उर्फ स्वरुप घाडगे व उदय कदम यांची भांडणे सुरु होती. ती सोडविण्यासाठी गेले असता उदय याने त्यांना बेदम मारहाण केली. त्यांचेवर खासगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. त्यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार लक्ष्मीपूरी पोलीसांनी उदय राजाराम कदम (३८, रा. उत्तरेश्वर पेठ) याचेवर गुन्हा दाखल केला.
तर उदय याला मारहाण केलेप्रकरणी मनोज विलास घाटगे, बबलु घाटगे, सोन्या घाटगे यांचेवर गुन्हा दाखल केला. पोलीसांनी दोन्ही गटाच्या संशयितांना पोलीस ठाण्यात हजर राहण्यासाठी नोटीसा पाठविल्या आहेत.