शहरं
Join us  
Trending Stories
1
आमनेसामने Video: ठाकरे गटाकडून 50 खोकेची घोषणाबाजी; एकनाथ शिंदेंकडून धनुष्यबाणाचा इशारा
2
‘CAA ही मोदींची गॅरंटी, कुणीही हटवू शकणार नाही’, आझमगड येथून मोदींनी दिलं आव्हान
3
"लाचारीच्या सर्व मर्यादा सोडल्या"; जिरेटोप प्रकरणावरून शरद पवारांनी प्रफुल्ल पटेलांना फटकारलं!
4
‘पृथ्वीराज चव्हाण यांनी पोपट घेऊन भविष्यवाणी सांगण्यास बसावे’, अजित पवार गटाचा टोला 
5
महिन्याभरात २६७ शेतकऱ्यांच्या आत्महत्या; जयंत पाटलांनी सरकारला धारेवर धरलं
6
‘मोदींनी एकदा मला फोन केला आणि म्हणाले, माझा अमेरिकेचा व्हिसा फेटाळलाय, तेव्हा मीच…’ शरद पवार यांनी सांगितली आठवण
7
"महिलांच्या कमावण्याच्या नादात वाढतंय घटस्फोटाचं प्रमाण"; सईद अन्वरचं वादग्रस्त विधान! VIDEO व्हायरल
8
Blog: इरफान पठाणला बोलायला काय जातंय! परदेशी खेळाडू नसतील तर IPL मध्ये मजा राहील का?
9
Adani Group : अदानींच्या 'या' कंपनीला मोठा झटका, नॉर्वेच्या सर्वात मोठ्या वेल्थ फंडानं केलं ब्लॅकलिस्ट
10
मनोज जरांगे पाटील यांची ८ जून रोजी होणारी सभा रद्द, या दोन कारणांमुळे घेतला निर्णय
11
बाळासाहेबांवर टीका करणाऱ्या अंधारेंना पक्षात का घेतलं?, CM विरोधात लढणार का?; आदित्य ठाकरेंची रोखठोक उत्तरं
12
Fact Check: Video - मुंबईत भाजपाच्या किटमध्ये सोन्याची बिस्किटं सापडली?; जाणून घ्या, 'सत्य'
13
...तर ईडी आरोपीला पीएमएलए कायद्यानुसार अटक करू शकत नाही; सर्वोच्च न्यायालयाची महत्वाची टिप्पणी
14
गाडी चालविताना मोबाईल काय साधा कागद जरी हातात जरी पकडला तरी दंड; जाणून घ्या वाहतुकीचा नियम...
15
अजित पवार गेले कुणीकडे?, गैरहजेरीनं विविध चर्चा; शरद पवारांनी दिली महत्त्वाची माहिती
16
Post Officeच्या 'या' स्कीममध्ये PM Modiनी देखील केलीये ९ लाखांची गुंतवणूक, तुम्हालाही मिळेल उत्तम रिटर्न
17
'ड्रग्स पासून दूर राहा', शुभांगी गोखलेंनी लेकीला हात जोडून सांगितलं; ती लंडनला गेल्यावर...
18
कांद्यावरून पंतप्रधान मोदींना प्रश्न विचारणाऱ्या तरुणाचा मला अभिमान, शरद पवारांचं मोठं विधान
19
ना पाकिस्तान, ना ऑस्ट्रेलिया! ब्रायन लाराने जाहीर केले T20 World Cup चे ४ सेमीफायनलिस्ट
20
दोन्ही पायांनी दिव्यांग, जिद्द नाही सोडली; स्वत:चा जीव धोक्यात घालून वाचवला हजारो लोकांचा जीव

कोल्हापूर : शाळेच्या नावाखाली चोऱ्या : चार अल्पवयीन मुले ताब्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 23, 2018 7:15 PM

शाळेच्या नावाखाली घरातून बाहेर पडत राजारामपुरी परिसरात सायकली, मोबाईल आणि दुचाकीच्या डिकीतून वस्तू चोरणाऱ्या चौघा अल्पवयीन मुलांच्या टोळीला राजारामपुरी पोलिसांनी ताब्यात घेतले. त्यांच्या ताब्यातून आठ सायकली, पाच मोबाईल, मोपेडच्या डिकीतून चोरलेला कॅमेरा, असा सुमारे दीड लाख किमतीचा मुद्देमाल जप्त केला.

ठळक मुद्देशाळेच्या नावाखाली चोऱ्या चार अल्पवयीन मुले ताब्यात दीड लाखाचा मुद्देमाल जप्त

कोल्हापूर : शाळेच्या नावाखाली घरातून बाहेर पडत राजारामपुरी परिसरात सायकली, मोबाईल आणि दुचाकीच्या डिकीतून वस्तू चोरणाऱ्या चौघा अल्पवयीन मुलांच्या टोळीला राजारामपुरी पोलिसांनी ताब्यात घेतले. त्यांच्या ताब्यातून आठ सायकली, पाच मोबाईल, मोपेडच्या डिकीतून चोरलेला कॅमेरा, असा सुमारे दीड लाख किमतीचा मुद्देमाल जप्त केला. चौघे दौलतनगर, राजारामपुरी, तिसरी गल्ली येथील राहणारे आहेत.याबाबतची अधिक माहिती अशी, राजारामपुरी पोलीस ठाण्याच्या हद्दीत किरकोळ चोरीच्या घटनांमध्ये वाढ झाली होती. सायकल चोरीच्या घटनांमुळे पोलीस हैराण झाले होते. नागरिकांतून याबाबत राजारामपुरी पोलिसांत तक्रारीही दाखल केल्या होत्या. गुरुवारी (दि. २२) राजारामपुरी दुसऱ्या गल्लीत चार अल्पवयीन मुले रात्रीच्या सुमारास दंगामस्ती करीत निघाली होती.

गस्त घालताना संशयावरून चौघा मुलांना पोलिसांनी ताब्यात घेतले. ते आपल्या घरचा पत्ता व नाव सांगण्यास तयार नव्हते, त्यामुळे त्यांच्यावर संशय बळावला. त्यांचेकडे कसून चौकशी केली असता त्यांनी चोरीची कबुली दिली. शाळेच्या नावाखाली घरातून बाहेर पडत हे चौघेही एकत्र येत असत.

दिवसभर सायकली, मोबाईल, मोपेडच्या डिकीतून बॅगा, वस्तू चोरत असत. सायकलीवरून फिरत रात्रीच्या वेळी त्या राजारामपुरी परिसरातील एका बोळात लावत असत. या सर्वांना सुधारगृहात पाठविले आहे. ही कारवाई सहायक पोलीस निरीक्षक गजेंद्र लोहार यांच्यासह शांतिनाथ हुंडुरके, अशोक पाटील, प्रकाश पाटील, निवास पाटील, अमोल अवघडे, गौरव चौगले यांनी केली.कुटुंबाच्या डोळ्याआड चोऱ्यादौलतनगरमध्ये राहणाऱ्या दोघा मुलांना वडील नाहीत. त्यांची आई मजुरीची काम करते. राजारामपुरी तिसऱ्या गल्लीत राहणारे दोघेजण मध्यमवर्गीय आहेत. आई घरकाम, तर वडील नोकरी करतात. त्यांना आपली मुले चोरी करतात याची कल्पनाही नव्हती. पोलीस ठाण्यातून फोन येताच काय झाले म्हणून घाईगडबडीने ते गेले असता मुले चोर असल्याचे ऐकून तयांना मानसिक धक्काच बसला. कुटुंबाच्या डोळ्याआड हे चौघेजण चोऱ्या करीत असल्याचे निष्पन्न झाले.

 

 

टॅग्स :kolhapurकोल्हापूरCrimeगुन्हा