Ahmedabad Plane Crash: महाडिक, पाटीलसाठी कोल्हापूरकरांचा तुटला जीव, गुगलवर घेतला सर्वाधिक शोध

By पोपट केशव पवार | Updated: June 13, 2025 13:00 IST2025-06-13T12:54:40+5:302025-06-13T13:00:08+5:30

विशेष म्हणजे, यातील महाडिक यांचे नातेसंबंध कोल्हापूरशी जुळत असल्याने कोल्हापूरकरांनी त्या कुठल्या, कोणते गाव, त्यांचे कोल्हापूरकरांशी काय नाते, याचा शोध घेतला.

Kolhapur residents searched on Google as the names of Aparna Mahadik and Maithili Patil appeared on the Ahmedabad-London flight that crashed in the afternoon in Ahmedabad | Ahmedabad Plane Crash: महाडिक, पाटीलसाठी कोल्हापूरकरांचा तुटला जीव, गुगलवर घेतला सर्वाधिक शोध

Ahmedabad Plane Crash: महाडिक, पाटीलसाठी कोल्हापूरकरांचा तुटला जीव, गुगलवर घेतला सर्वाधिक शोध

पोपट पवार

कोल्हापूर : अहमदाबाद येथे गुरुवारी दुपारी झालेल्या अपघातग्रस्त अहमदाबाद-लंडन विमानात अपर्णा महाडिक आणि मैथिली पाटील या दोन क्रू मेंबरही प्रवास करत असल्याचे कळताच कोल्हापूरकरांची उत्सुकता कमालीची ताणली गेली.

कोल्हापूर जिल्ह्यात पाटील आणि महाडिक या आडनावांची संख्या तुलनेने जास्त आहे. त्यामुळे या पाटील, महाडिक आपल्या तर जिल्ह्यातील नाहीत ना? अशी शंकेची पाल चुकचुकल्याने कोल्हापूरकरांनी दुपारनंतर गुगलवर या दोघींना सर्वाधिक सर्च केले. विशेष म्हणजे, यातील महाडिक यांचे नातेसंबंध कोल्हापूरशी जुळत असल्याने कोल्हापूरकरांनी त्या कुठल्या, कोणते गाव, त्यांचे कोल्हापूरकरांशी काय नाते, याचा शोध घेतला.

गुरुवारी दुपारी या विमान अपघातानंतर प्रवाशांची नावे सोशल मीडियावर व्हायरल झाली. यात चार-पाच नावे मराठी होती. त्यात अपर्णा महाडिक आणि मैथिली पाटील यांची नावे असल्याने कोल्हापूरकरांनी त्यांचा गुगलवर सर्वाधिक शोध घेतला. अनेकांनी स्टेटस ठेवून या अपघातातील मृतांना श्रद्धांजली वाहिली.

महाडिक यांचे कोल्हापूरशी नातेसंबंध

या अपघातातील अपर्णा महाडिक या राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे यांच्या मोठ्या बहिणीची सून आहे. तटकरे यांची लहान बहीण कोल्हापुरातील गव्हर्मेंट सर्व्हंट्स बँकेचे नेते रवींद्र पंदारे यांची पत्नी आहे. पंदारे यांचे साडू यशवंत महाडिक यांच्या अपर्णा या सून असून, त्याअर्थाने महाडिक यांचे कोल्हापूरशी नातेसंबंध आहे. अपर्णा या कोल्हापूरला वारंवार येत असत. अपघाताची माहिती कळताच रवींद्र पंदारे, त्यांच्या पत्नी, मुलांसह मुंबईला सायंकाळी गेले. महाडिक यांचा विमान अपघात झाल्याने कोल्हापूरकरांनी हळहळ व्यक्त केली.

Web Title: Kolhapur residents searched on Google as the names of Aparna Mahadik and Maithili Patil appeared on the Ahmedabad-London flight that crashed in the afternoon in Ahmedabad

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.