शहरं
Join us  
Trending Stories
1
चर्चा की ढोंग? इराणच्या कार्गो शिपवर अमेरिकेचा ताबा; डोनाल्ड ट्रम्प यांची थेट युद्धभूमीवर नजर!
2
Video: "गेट आउट"! भाजपाच्या मोर्च्यासाठी वाहतूक रोखली; महिला भडकली, थेट गिरीश महाजनांवर ओरडली...
3
दिंडोरीत काळाचा क्रूर घाला! बिबट्याने उचलून नेलेल्या ३ वर्षीय चिमुरडीचा दुर्दैवी अंत; परिसरात शोककळा
4
SRH vs DC : आधी अभिषेक शर्मानं धुतलं; मग मलिंगा-हर्षचा जलवा! 'ऑरेंज आर्मी'समोर दिल्लीकर ठरले हतबल
5
पेट्रोलची कटकट मिटणार? आता गाड्या अल्कोहोलवर धावणार! इंधन टंचाईवर असा आहे सरकारचा 'E85' मास्टर प्लॅन
6
२०० पारच्या लढाईत KL Rahul पुन्हा अपयशी! अभिषेक शर्मानं फिल्डिंगमध्येही दाखवला क्लास
7
इस्लामाबाद चर्चा २.० पूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून इराणच्या जनतेचं कौतुक, पण...! युएस-इराण युद्ध पुन्हा भडकणार?
8
अभिषेक शर्मा ठरला जगात भारी! टी-२० क्रिकेटमध्ये अशी कामगिरी करणारा तो पहिलाच
9
केरळमध्ये फटाका कारखान्यात मोठा स्फोट; १३ जणांचा मृत्यू, अनेक गंभीर जखमी
10
Abhishek Sharma Century : अभिषेक शर्माचा शतकी धमाका! किंग कोहलीसह 'या' दिग्गजांच्या विक्रमाची बरोबरी
11
वसई तहसीलला पुन्हा लाचेचे 'ग्रहण'; ७ लाखांची लाच स्वीकारताना खासगी इसम ताब्यात
12
‘अजितदादांच्या अपघाताबाबत इतरांप्रमाणे माझ्याही मनात शंका’, प्रचाराच्या सांगतेवेळी सुनेत्रा पवार यांचं मोठं विधान
13
कौटुंबिक वादातून दुहेरी हत्याकांड : कर्जाचे २० हजार आणि अपत्य नसण्याचा टोमणा; सख्ख्या भावाने संपवले आयुष्य
14
उपजिल्हाधिकारी पदाच्या नाेकरीचे आमिष दाखवून दोन कोटींचा गंडा; पोलिसांनी केली अटक
15
'लादेनला जी म्हणतात आणि मोदींना दहशतवादी संबोधतात', खर्गेंच्या वक्तव्याविरोत भाजपा आक्रमक
16
SRH vs DC : नागपूरकरामुळे ईशान किशन गोंधळला! अक्षर पटेलनंही व्यक्त केली मनातील खंत; नेमकं काय घडलं?
17
केडीएमसीच्या महासभेकडे शिंदे सेनेच्या बहुतांश नगरेसवकांची पाठ; महत्वाच्या विषयावरील चर्चे दरम्यान अनुपस्थिती
18
LIC मध्ये नोकरीची सुवर्णसंधी! ज्युनिअर असिस्टंट पदांसाठी भरती जाहीर; पदवीधरांना मिळणार वार्षिक ५ लाखांपर्यंत पॅकेज
19
मोठा घोटाळा! वैष्णो देवीच्या कोट्यवधी भक्तांची घोर फसवणूक, ₹५५० कोटींच्या चांदीची किंमत केवळ ३० कोटी; समोर आला विचित्र प्रकार
20
शरद पवार पुन्हा रुग्णालयात दाखल; बारामती पोटनिवडणूक दरम्यान पोस्ट लिहून केलं आवाहन
Daily Top 2Weekly Top 5

कोल्हापूर ते पुणे एसटीने वेग पकडला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 3, 2021 04:17 IST

कोल्हापूर : लॉकडाऊनचे निर्बंध शिथिल होत असताना एसटीनेही सेवा विस्तार वाढवण्यास सुरुवात केली आहे. कोल्हापूर-पुणे मार्गावर सुरू झालेल्या एसटीने ...

कोल्हापूर : लॉकडाऊनचे निर्बंध शिथिल होत असताना एसटीनेही सेवा विस्तार वाढवण्यास सुरुवात केली आहे. कोल्हापूर-पुणे मार्गावर सुरू झालेल्या एसटीने आता वेग पकडला आहे. बुधवारी कोल्हापूर डेपोच्या चार, शिवाजीनगर व स्वारगेटच्या प्रत्येकी दोन अशा आठ गाड्यांमधून कोल्हापूर मध्यवर्ती बसस्थानकातून साधारणपणे दोनशेंच्यावर प्रवाशांनी प्रवास केला. दरम्यान, प्रवासी संख्या वाढेल तशा प्रमुख मार्गांवरील फेऱ्या वाढवण्यात येणार असल्याचे एसटीच्या वाहतूक शाखेने सांगितले.

कोरोनाचा संसर्ग वाढल्याच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊन कडक केल्यापासून एसटीच्या फेऱ्या अत्यावश्यक सेवा वगळता बंदच होत्या. आता लॉकडाऊनमध्ये शिथिलता आल्याने एसटी सेवा हळूहळू पूर्वपदावर आणण्याचे प्रयत्न सुरू आहेत. मंगळवारी चांगला प्रतिसाद मिळाल्याने बुधवारीदेखील एसटी पुणे मार्गावर सोडण्यात आल्या. ५० टक्के भारमानाच्या नियमाचे पालन करत एकेका एसटीमध्ये २० प्रवासी घेऊनच एसटी धावत आहे. सॅनिटायझर सुविधेसह मास्क बंधनकारक आहे. एक सीट आड अशी बैठक व्यवस्था ठेवण्यात आली आहे.

अजूनही गाडी सुटण्याच्या वेळा निश्चित नाहीत, पण तास ते दीड तासाच्या अंतराने एक बस सुटेल असे नियोजन वाहतूक शाखेकडून केले जात आहे.

एसटी नियमानुसार प्रवाशांची संख्या झाल्यावर सोडली जात आहे. प्रवाशांना प्रतीक्षा करावी लागत असलीतरी काही नसण्यापेक्षा काहीतरी आहे, असे समजून प्रवासी सहकार्य करताना दिसत आहेत.

फोटो: ०२०६२०२१-कोल-एस.टी ०१

फोटो ओळ : कोल्हापुरात एसटी महामंडळाने पुणे मार्गावर फेऱ्या सुरू केल्या असल्यातरी अजूनही प्रतिसाद कमी असल्याने प्रवाशांची प्रतीक्षा करावी लागते. (छाया : नसीर अत्तार)

फोटो: ०२०६२०२१-कोल-एस.टी ०२

फोटो ओळ : कोल्हापूर मध्यवर्ती बसस्थानकातून पुण्याकडे कोरोनासंबंधीचे सर्व नियमांचे पालन करून पुणे मार्गावर एसटी महामंडळाने फेऱ्या सुरू केल्या आहेत. त्यामुळे बसस्थानकांवर थोडीफार वर्दळ दिसू लागली आहे.

(छाया: नसीर अत्तार)