Kolhapur Crime: रुबाबासाठी आणले पिस्तूल; कारवाईने उतरला रुबाब, रेकॉर्डवरील गुन्हेगार राकेश कारंडे अटकेत

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 20, 2026 12:06 IST2026-02-20T12:04:42+5:302026-02-20T12:06:17+5:30

पिस्तुलासह एक जिवंत काडतूस जप्त

Kolhapur police arrest a criminal with a record of being a guest of honor with a pistol he brought to show off his skills | Kolhapur Crime: रुबाबासाठी आणले पिस्तूल; कारवाईने उतरला रुबाब, रेकॉर्डवरील गुन्हेगार राकेश कारंडे अटकेत

Kolhapur Crime: रुबाबासाठी आणले पिस्तूल; कारवाईने उतरला रुबाब, रेकॉर्डवरील गुन्हेगार राकेश कारंडे अटकेत

कोल्हापूर : पोलिसांच्या रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगाराने रुबाब दाखविण्यासाठी आणलेल्या पिस्तुलाची टीप पोलिसांना मिळाली अन् पोलिसांच्या कारवाईने त्याच्या रुबाबासोबत पिस्तूलही गेले. शाहूपुरी पोलिसांनी बुधवारी (दि. १८) रात्री मार्केट यार्ड येथील लोणार वसाहतीजवळ केलेल्या कारवाईत सराईत गुन्हेगार राकेश किरण कारंडे (वय ३५, रा. शास्त्रीनगर, कोल्हापूर) याला अटक केली. त्याच्याकडून गावठी बनावटीचे एक पिस्तूल आणि एक जिवंत काडतूस जप्त केले.

'लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इयर' कोण?... क्लिक करून आपलं मत नोंदवा!

शाहूपुरी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सराईत गुन्हेगार राकेश कारंडे याच्याकडे पिस्तूल असल्याची टीप मिळाली होती. तो बुधवारी रात्री राजर्षी शाहू मार्केट यार्ड येथील लोणार वसाहतीजवळ येणार असल्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार गुन्हे शोध पथकाने सापळा रचून त्याला अटक केली. अंगझडतीत त्याच्याकडे गावठी बनावटीचे पिस्तूल आणि जिवंत काडतूस मिळाले. ५० हजारांचे पिस्तूल आणि दोन हजारांचे काडतूस असा ५२ हजारांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला. 

गुन्हा दाखल करून न्यायालयात हजर केले असता त्याला शनिवारपर्यंत (दि. २१) पोलिस कोठडी मिळाली. पोलिस निरीक्षक संतोष डोके यांच्यासह उपनिरीक्षक आकाश जाधव, अंमलदार मिलिंद बांगर, बाबासाहेब ढाकणे, सुशीलकुमार गायकवाड, राहुल पाटील, आदीच्या पथकाने कारवाई केली.

मित्राकडून पिस्तूल आणल्याची कबुली

वर्षभरापूर्वी एका मित्राकडून पिस्तूल घेतल्याची माहिती त्याने पोलिसांना दिली. हे पिस्तूल तो विकणार होता. त्यामुळे कारंडे याचा शस्त्र तस्करीशी संबंध आहे काय, याचाही तपास पोलिसांकडून सुरू आहे. त्याच्यावर यापूर्वी राजारामपुरी आणि गांधीनगर पोलिस ठाण्यात गंभीर स्वरूपाचे चार गुन्हे दाखल आहेत.

Web Title : कोल्हापुर: पिस्तौल के साथ अपराधी गिरफ्तार; दिखावा उल्टा पड़ा, रैकेट उजागर।

Web Summary : कोल्हापुर पुलिस ने राकेश कारंडे नामक एक कुख्यात अपराधी को गिरफ्तार किया और उसके पास से एक अवैध पिस्तौल और जिंदा कारतूस जब्त किए। उसने एक साल पहले एक दोस्त से हथियार खरीदने और इसे बेचने का इरादा कबूल किया। पुलिस हथियारों की तस्करी में उसकी संभावित संलिप्तता की जांच कर रही है। उसके खिलाफ पहले से चार अपराध दर्ज हैं।

Web Title : Kolhapur: Criminal arrested with pistol; Show-off backfires, Racket exposed.

Web Summary : Kolhapur police arrested Rakesh Karande, a notorious criminal, seizing an illegal pistol and live cartridge. He confessed to acquiring the weapon from a friend a year ago, intending to sell it. Police are investigating his potential involvement in arms trafficking. He has four prior offenses.