शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकसभा निवडणुकीनंतर राज्यातील २ पक्षाचं अस्तित्व संपेल; पृथ्वीराज चव्हाणांचा दावा
2
उद्धव ठाकरेंना मोठा धक्का, नाशिकमध्ये खिंडार; एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेची ताकद वाढली
3
अमेठीत गोंधळ, काँग्रेस कार्यालयाबाहेर अनेक वाहनांची तोडफोड, भाजपावर आरोप
4
जी भाषा पाकिस्तान करतेय तीच भाषा काँग्रेस का करतेय?; BJP नेते आशिष शेलारांचा सवाल
5
राहुल गांधी रायबरेलीत का पोहोचले? अमेठी का सोडली...
6
'जेव्हा इंडस्ट्रीमधले लोकच...'; मॅडनेस मचाएंगे'मध्ये करण जोहरची उडवली खिल्ली, पोस्ट शेअर करत दिली प्रतिक्रिया
7
आजचे राशीभविष्य, ६ मे २०२४ : मेषसाठी काळजीचा अन् वृषभसाठी आनंदाचा दिवस
8
संपादकीय: झपाटलेल्या झुंडीचे बळी
9
धुरळा शांत; तिसऱ्या टप्प्याचे उद्या मतदान; आरोप-प्रत्यारोपांनी गाजला रणसंग्राम
10
तापमानाने जिवाची काहिली; सोलापूर, अकोला सर्वाधिक उष्ण; मुंबईत उकाडा कायम
11
नीट-पीजीची परीक्षा आता विभागनिहाय; ऐन वेळी रचनेत बदल करण्याच्या निर्णयामुळे विद्यार्थी नाराज
12
चला... सातारा, सांगली, कोल्हापूर, रायगड, रत्नागिरी; गाड्या फुल्ल : मतदानासाठी चाकरमानी निघाले गावाकडे 
13
ठाण्यावर मालकी हक्क सांगणाऱ्यांची मस्ती उतरवणार; सीमेवरील जवानही असुरक्षित - उद्धव ठाकरे
14
सरशी कोणाची? शिंदेगटाची की उद्धवसेनेची?
15
नसीम खान यांची नाराजी काँग्रेसने कशी दूर केली?
16
राजकीय पक्षांना देणगी देणाऱ्या मेघा इंजिनीअरिंगच्या उपकंपनीसाठी नागपूर महानगरपालिका मेहेरबान
17
नोकऱ्या देणाऱ्यांना मदत करणाऱ्यांचे हात आखडते; २०२३ मध्ये केवळ एका स्टार्टअपला युनिकॉर्नचा दर्जा
18
२ वर्षांपूर्वी मिळाला पद्मश्री, आता करावी लागतेय मजुरी
19
वाळू माफियांनी एएसआयला चिरडले; अंगावर टॅक्टर घातल्याने झाला मृत्यू 
20
सरन्यायाधीशांना झाली होती शिक्षा; स्वत: सांगितला किस्सा

कोल्हापूर :  करवीर, हातकणंगले तालुक्यातून भूसंपादनास विरोध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 10, 2018 4:22 PM

रत्नागिरी ते नागपूर क्र. १६६ च्या प्रस्तावित राष्ट्रीय महामार्गासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात बुधवारी झालेल्या बैठकीत कोल्हापूर जिल्ह्यातील हातकणंगले आणि करवीर तालुक्यातील ग्रामस्थांनी भूसंपादनास विरोध दर्शविला. या नव्या महामार्गासाठी जमीन मोजणीवेळी विरोध करण्याचा निर्णयही घेण्यात आला.

ठळक मुद्देकरवीर, हातकणंगले तालुक्यातून भूसंपादनास विरोधरत्नागिरी-नागपूर राष्ट्रीय महामार्ग : जिल्हाधिकारी कार्यालयात ग्रामस्थांची बैठक

कोल्हापूर : रत्नागिरी ते नागपूर क्र. १६६ च्या प्रस्तावित राष्ट्रीय महामार्गासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात बुधवारी झालेल्या बैठकीत कोल्हापूर जिल्ह्यातील हातकणंगले आणि करवीर तालुक्यातील ग्रामस्थांनी भूसंपादनास विरोध दर्शविला. या नव्या महामार्गासाठी जमीन मोजणीवेळी विरोध करण्याचा निर्णयही घेण्यात आला.रत्नागिरी ते नागपूर हा नवा राष्ट्रीय महामार्गचा सुमारे १५०० कोटी रुपयांचा प्रकल्प साकारत आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील शाहूवाडी, पन्हाळा, करवीर, हातकणंगले या तालुक्यातून हा मार्ग जात आहे. त्यासाठी भूसंपादनाची प्रक्रिया सुरु आहे. त्यापार्श्वभूमीवर उपजिल्हाधिकारी अविनाश हदगल यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात करवीर आणि हातकणंगले तालुक्यातून ग्रामस्थांची बैठक घेतली. हदगल यांनी, हा महामार्गाच्या भूसंपादनातील जमीनीचा मोबदलाबाबत सविस्तर चर्चा केली.ग्रामस्थांनी, रत्नागिरीहून आलेला रस्ता हा बोरपाडळे येथून वारणा, शिये, वडगाव, चोकाकमागे असा रिंगरोड असताना या नव्या राष्ट्रीय  महामार्गाची गरजच काय? असा प्रश्न केला. तालुकयातील सहा गावातील १२ पाण्याच्या विहीरी, शेती रस्त्यात बाधीत होत असल्याचेही निदर्शनास आणले. या मार्गावरील जमीनींना भविष्यात मोठा दर येऊन त्या व्यवसायिक होणार असल्याचे उपजिल्हाधिकारी हदगल यांनी पटवून दिले.बैठकीस, उपजिल्हाधिकारी अविनाश हदगल, राष्ट्रीय  महामार्ग विभागाचे प्रकल्प संचालक बी. एस. साळोखे, हातकणंगले तहसिलदार, तलाठी आदी महसूलमधील अधिकारी व ग्रामस्थ उपस्थित होते.भूसंपादनापूर्वी मोजणीसाठी येणाऱ्या अधिकाऱ्यांना विरोध करण्यावर ग्रामस्थ ठाम राहीले. त्यानंतर ग्रामस्थांनी सभागृहाबाहेर स्वतंत्र बैठक घेतली. यामध्ये हातकणंगले पंचायत समिती उपसभापती राजेश पाटील, वारणा सहकारी बँकेच संचालक सुभाष पुरंदरपाटील, अनिल पुजारी, रंगराव गायकवाड, अ‍ॅड. प्रशांत पाटील, धीरज पाटील, अ‍ॅड. सुनिल पाटील, विजय चौगुले यांनीही चर्चेत सहभाग नोंदवला.

रस्त्यासाठी किती जागा द्यायच्या?कोल्हापूर ते सांगली रस्त्यासाठी आम्ही जमीनी दिल्या आहेत, आता या नव्या रस्त्यासाठी पुन्हा आम्ही जमीनी द्यायच्या. यातून मिळणारे पैसे ठेव ठेवून त्यावरच जगायचे का? आमच्या शेती सर्व या रस्त्यात जात असल्याने आजून किती जमीनी द्यायच्या? असाही प्रश्न काही ग्रामस्थांनी उपस्थित केला.मार्गासाठी भूसंपादन होणारी गावांची संख्या१) शाहूवाडी तालुका-२५२) पन्हाळा त ालुका -१०३) करवीर तालुका- ८४) हातकणंगले तालुका - ६ 

 

टॅग्स :highwayमहामार्गkolhapurकोल्हापूर