कोल्हापूर : सरावातील सातत्यामुळे आॅलंपिकचे यशही आवाक्यात : आॅलंपिकवीर योगेश दत्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 4, 2018 03:10 PM2018-08-04T15:10:40+5:302018-08-04T15:23:36+5:30

आॅलंपिकवीर अर्जुनवीर पुरस्कार विजेता कुस्तीपटू योगेश्वर दत्त यांनी शुक्रवारी (दि. ३) रात्री उशिरा कोल्हापूरातील राम सारंग यांच्या राष्ट्रकुल कुस्ती संकुलास सदीच्छा भेट दिली.

Kolhapur: Olympic success due to continuous success: Olympian Yogesh Dutt | कोल्हापूर : सरावातील सातत्यामुळे आॅलंपिकचे यशही आवाक्यात : आॅलंपिकवीर योगेश दत्त

कोल्हापूरातील कळंबा येथील राष्ट्रकुल कुस्ती संकुलास शुक्रवारी(दि. ३) रात्री आॅलंपिकवीर योगेश्वर दत्त याने सदिच्छा भेट दिली. यावेळी संकुलातर्फे ज्येष्ठ कुस्ती प्रशिक्षक राम सारंग यांनी त्याचा श्रीकृष्णाची मूर्ती व कोल्हापूरी फेटा बांधून सत्कार केला. यावेळी मान्यवर कुस्तीगीर उपस्थित होते.

Next
ठळक मुद्देसरावातील सातत्यामुळे आॅलंपिकचे यशही आवाक्यात : आॅलंपिकवीर योगेश दत्त रामसारंग यांच्या राष्ट्रकुल कुस्ती संकुलास भेट

कोल्हापूर : कुस्तीत सरावातील सातत्य महत्वाचे आहे. त्याकरीता दिवसातील जास्त वेळ कुस्तीला द्यावा. तरच यश आपल्या आवाक्यात येईल. प्रशिक्षकांच्या सुचना लढतीमध्ये बहुउपयोगी ठरतात. त्यामुळे सरावावर लक्ष केंद्रीत करा. त्यातूनच आॅलंपिकचे पदक जिंकता येईल. असा सल्ला आॅलंपिकवीर अर्जुनवीर पुरस्कार विजेता कुस्तीपटू योगेश्वर दत्त याने दिला.

तो शुक्रवारी (दि. ३) रात्री उशिरा कोल्हापूरातील राम सारंग यांच्या राष्ट्रकुल कुस्ती संकुलास सदीच्छा भेट दिली. त्याप्रसंगी प्रशिक्षणार्थी मल्लांशी संवाद साधताना बोलत होता.


यावेळी राष्ट्रकुल सुवर्ण पदक विजेते प्रशिक्षक राम सारंग यांनी योगेश्वर दत्तचे श्रीकृष्णाची मूर्ती व कोल्हापूरी फेटा , हार शाल व श्रीफळ देवून सत्कार केला. यावेळी द्रोणार्चा पुरस्कार विजेते प्रशिक्षक रामफळ, प्रशिक्षक हरियाणा केसरी नरेंद्रर , कुकड पैलवान, आदी उपस्थित होते.

यावेळी राम सारंग म्हणाले, योगेश्वर दत्त हा ४२ किलो वजनी गटातक पुणे येथे कॅडेट शिबीरात होता. त्यावेळी त्याची गुणवत्ता पाहीली होती. पुढे हाच योगेश्वरने देशासाठी आॅलंम्पिक मध्ये पदक मिळवून दिले. हा आदर्श आजच्या मल्लांनीही घ्यावा. असे आवाहन केले. यावेळी योगेश्वरने सरावातील काही उणीवा दाखवत मार्गदर्शन केले.
यावेळी आंध्रकेसरी जाफर, आंतरराष्ट्रीय मल्ल शिवाजी पाटील (आमशीकर) गुलाब आगरकर यांच्यासह संकुलातील सर्व कुस्तीगीर उपस्थित होते.

 

 

Web Title: Kolhapur: Olympic success due to continuous success: Olympian Yogesh Dutt

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.