शहरं
Join us  
Trending Stories
1
"रस्ते आणि उड्डाणपूल म्हणजे विकास नाही"; राज ठाकरेंनी करुन दिली बाबासाहेबांच्या समग्र दृष्टीची आठवण
2
एकाच झटक्यात कंपनीनं काढले ३० हजार कर्मचारी, आता त्याचं कंपनीनं नव्या CFO ना दिलं ₹२५० कोटींचं पॅकेज
3
"आमच्या कामात ढवळाढवळ नको"; इराणच्या नाकेबंदीवरून चीनचा अमेरिकेला थेट इशारा, महायुद्ध पेटण्याची भीती
4
मुंबई हादरली..! लाइव्ह म्युझिक कॉन्सर्टमध्ये ड्रग्जच्या ओव्हरडोजने २ विद्यार्थ्यांचा मृत्यू, नेस्कोच्या अधिकाऱ्यांसह ५ अटकेत, १ तरुणी गंभीर
5
पाठीमागून आला अन्...; दिवसाढवळ्या गर्भवती महिलेसोबत घाणेरडं कृत्य, संतापजनक व्हिडीओ समोर!
6
बॉलिंग ॲक्शनवरुन वाद; वडिल अन् बहिणीची साथ! जाणून घ्या 'विदर्भ एक्स्प्रेस' Praful Hinge चा प्रवास
7
अधिवेशन पास घोटाळा; विधानभवनातील तिघे कर्मचारी निलंबित, एक अद्याप पसारच
8
"सध्या माझ्या मनात.."; आजीच्या निधनाने जनाई कोलमडली, सोशल मीडियावर व्यक्त केल्या भावना
9
सूर्याचा उच्च राशीत प्रवेश २०२६: ७ राशींना मेष संक्रांतीने यश-लाभ; १ उपायाने महिनाभर भरभराट!
10
...अन् बाबासाहेब स्वत: समोर येऊन बोलू लागले; चर्चिल-ॲटलींसोबतचा संवाद झाला सजीव
11
Noida Protest: जाळपोळ, तोडफोड आणि दगडफेक; ६० जणांना अटक, नोएडा हिंसाचारात आतापर्यंत काय-काय घडलं?
12
रुपयाच्या नाण्यांतून उभारली श्रद्धेची गाथा; १७ हजार नाण्यांचा संग्रह
13
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेला सोने परवडत नाहीये? घरी आणा 'या' ६ स्वस्त वस्तू; मिळेल सोनेखरेदीचे अक्षय्य पुण्य!
14
आजचे राशीभविष्य, १४ एप्रिल २०२६: कामात यश मिळेल, घरात सुख-शांती नांदेल, नशिबाची साथ मिळेल.
15
उद्यापासून उष्णतेच्या लाटेचा तडाखा, अकोला @ ४३.८
16
स्मरण दिन २०२६: अवतार सांगता करताना स्वामींनी कोणते वचन दिले?; शेवटचा शब्द आजही पाळतात!
17
स्वामी समर्थ स्मरण दिन २०२६: ‘असे’ करा पूजन, आवर्जून म्हणा स्वामी मंत्र; पाहा, विधी-मान्यता
18
यंदा कसा असेल पाऊस? हवामान खात्याने मान्सूनबाबत दिली चिंता वाढवणारी माहिती
19
बिहारमध्ये नवीन सरकार स्थापनेच्या हालचालींना वेग, उद्या शपथविधी सोहळा होण्याची शक्यता
20
पूर्ववैमनस्यातून पत्नीच्या डोळ्यांसमोर दादरमध्ये तरुणाची निर्घृण हत्या
Daily Top 2Weekly Top 5

कोल्हापूरला आता टँकरचा आधार!

By admin | Updated: May 9, 2016 00:35 IST

शहरालाही टंचाई : पाऊस लांबल्यास नियोजन

भीमगोंडा देसाई --कोल्हापूर राज्यात ‘टँकरमुक्त’ म्हणून कोल्हापूर जिल्ह्याची ख्याती होती. मात्र, यंदा नियोजनातील विस्कळीतपणामुळे इचलकरंजी, कोल्हापूर शहरात काही दिवस टँकरने पाणीपुरवठा केला जात आहे. सद्य:स्थितीमध्ये रोज जिल्ह्यात कुठेही टँकरने पाणीपुरवठा केला जात नाही; पण टंचाईग्रस्त शहरे व वाड्या-वस्त्यांत टंचाई निवारण कृती आराखड्यात पारंपरिक स्रोतांमध्ये पाणी उपलब्ध होईपर्यंत टँकरद्वारे पाणी देणे प्रस्तावित आहे. यंदा सरासरीपेक्षा कमी पाऊस पडला आहे. त्यामुळे गेल्या दोन महिन्यांपासून जिल्ह्यात अनेक ठिकाणी पाणीटंचाई जाणवत आहे. विहिरी, कुपनलिका, तलाव यातील पाण्याने तळ गाठला आहे. उपसा बंदी करून शेतीसाठीच्या पाणी वापरावर निर्बंध आणले आहेत. पिण्यासाठी पाणी राखीव ठेवले आहे. सन २०११ नंतर जिल्ह्णात कुठेही शासनातर्फे टँकरने पाणीपुरवठा केलेला नाही. त्यामुळे राज्यात कोल्हापूरची ओळख ‘टँकरमुक्त’ म्हणून निर्माण झाली. मात्र, जवळपासचे सर्व नैसर्गिक स्रोत आटल्यानंतर टँकरने पाणीपुरवठा करण्याचा उपाय प्रस्तावित केले आहेत. कोल्हापूर शहरातील अनेक भागात काही दिवसांपासून सुरू असलेली गळती काढण्याचे काम सुरू राहिले. त्यादरम्यान पाणीपुरवठा बंद असलेल्या ठिकाणी टँकरने पाणीपुरवठा महानगरपालिका प्रशासनाने केले. इचलकरंजी शहरातही काही भागांत टँकरने पाणी पुरविले. कुपनलिका खुदाई करून टँकर बंद करण्यात आला. पाऊस लांबल्यास गडहिंग्लज, मलकापूर, पन्हाळा यासह सर्वच तालुक्यांतील गावे, वाड्या, वस्त्यांतील पारंपरिक पाण्याचे स्रोत बंद पडल्यानंतर टँकरने पाणीपुरवठा करणे प्रस्तावित आहे. त्यामुळे सहा वर्षांपासून सलग राज्यात ‘टँकरमुक्त जिल्हा’ म्हणून नावलौकीक मिळविलेल्या कोल्हापूर जिल्ह्णाला यंदाच्या दुष्काळाने टँकरने तहान भागविण्याची वेळ आणली आहे.