शहरं
Join us  
Trending Stories
1
गुजरातमध्ये अग्नितांडव! गेमिंग झोनमध्ये लागलेल्या आगीत २० जणांचा मृत्यू; आकडा वाढण्याची शक्यता
2
"मतांच्या संख्येत बदल होऊच शकत नाही’’, शंका घेणाऱ्यांना निवडणूक आयोगाने ठणकावले
3
डोंबिवलीच्या अमूदान कंपनीत स्फोट कसा झाला? आरोपीच्या वकिलांनी दिली धक्कादायक माहिती
4
"मी उद्धव ठाकरेंना गुवाहाटीला जाताना फोन केला होता, पण...", बच्चू कडू यांचा गौप्यस्फोट
5
"१५-२० दिवसांनंतर फेरमतदानाची मागणी करणं हास्यास्पद’’, सुनील तटकरे यांचा टोला
6
KKR vs SRH Final वर पावसाचं सावट? स्टेडियमवरची ताजी दृश्ये पाहून चाहते चिंतेत
7
हनिट्रॅप लावला, कोलकात्यात येण्यास भाग पाडले आणि... बांगलादेशी खासदाराच्या हत्येमागचं कारण समोर
8
"मग गुजरातमध्ये मुस्लिमांना आरक्षण का दिलं?" तेजस्वी यादवांचा नरेंद्र मोदींवर पलटवार
9
इंडिया आघाडीकडून पंतप्रधानपदाचा चेहरा कोण असेल? अखिलेश यांच्या आमदारानं सांगितलं
10
साहेब, मला माझ्या पत्नीपासून वाचवा! पीडित पतीने पोलिसांकडे घेतली धाव, समोर आलं धक्कादायक कारण
11
धक्कादायक! सायन हॉस्पिटलच्या आवारात भरधाव कारची धडक; वृद्ध महिलेचा जागीच मृत्यू
12
सावधान! प्लास्टिकच्या बॉटलमधून पाणी पिताय?; आताच बदला सवय, 'या' आजारांचा धोका
13
Narendra Modi : "बिहारच्या गरिबांना लुटणाऱ्यांचं काउंटडाउन सुरू झालं, त्यांना लवकरच जेलमध्ये जावं लागेल"
14
गंभीर टीम इंडियाचा कोच बनण्यास इच्छुक? पण शाहरूख 'स्पीडब्रेकर', जाणून घ्या गणित
15
आधीच अल्पमतात, त्यात पाठिंबा देणाऱ्या आमदाराचं निधन, हरयाणातील भाजपा सरकारचं काय होणार?
16
झारग्राममध्ये भाजपा उमेदवाराच्या ताफ्यावर हल्ला, सुरक्षा कर्मचारी जखमी
17
"आम्ही ४०० पार करू, काँग्रेस ४० च्या खाली जाईल", अमित शाहांचा जोरदार हल्लाबोल
18
ENG vs PAK : "आज बाबरने शतक झळकावले तर मी माझ्या वडिलांना...", तरूणीचे खास आवाहन
19
पाकिस्तान क्रिकेटमध्ये चाललंय काय; अखेर वर्ल्ड कपसाठी संघ जाहीर पण नाराजी कायम?
20
Google करणार Flipkart सोबत काम, डील जाहीर; आता मंजुरीची प्रतीक्षा

कोल्हापूर 'उत्तर'चा निकाल: एक फंडा दोन पराभव, अठरा वर्षानंतर पुनरावृत्ती

By ऑनलाइन लोकमत | Published: April 19, 2022 12:50 PM

विरोधातील उमेदवाराला शेवटच्या दोन दिवसांतील जोडण्या करण्यात अडचणी निर्माण करून निवडणूक जिंकण्याचा फंडा अठरा वर्षांनंतर या निवडणुकीत पुन्हा यशस्वी झाला.

विश्वास पाटीलकोल्हापूर : विरोधातील उमेदवाराला शेवटच्या दोन दिवसांतील जोडण्या करण्यात अडचणी निर्माण करून निवडणूक जिंकण्याचा फंडा अठरा वर्षांनंतर या निवडणुकीत पुन्हा यशस्वी झाला. या फंड्याने लोकसभेला धनंजय महाडिक आणि आता सत्यजित कदम यांचा पराभव केला आहे.घटना - ०१ : ती लोकसभेची २००४ ची निवडणूक. धनंजय महाडिक शिवसेनेकडून रिंगणात होते. त्यांचे राजकारण आणि महाडिक गटही तावात होता. तरुण उमेदवार आणि शिवसेनेचा भगवा यामुळे महाडिक यांची प्रचंड हवा होती. राष्ट्रवादी काँग्रेसकडून ज्येष्ठ नेते सदाशिवराव मंडलिक रिंगणात होते. विक्रमसिंह घाटगे हे महाडिक यांच्या बाजूने मैदानात होते. कागलचा राजकीय संघर्षही या निवडणुकीत उतरला होता. शेवटच्या दोन दिवसांत सीट गेली, मुख्यतः कोल्हापूर धुऊन गेले, अशी हवा झाली. मंडलिक यांचे  विश्वासू आमदार हसन मुश्रीफ यांच्याकडे कागलची जबाबदारी होती. त्यांनी कागल सोडले आणि कोल्हापूरची सूत्रे हातात घेतली.राज्यात काँग्रेस-राष्ट्रवादीचे सरकार होते. गृहमंत्री आर.आर. पाटील होते. त्यांनी आदेश सोडले आणि महाडिक यांच्या पेट्रोल पंपावर भेसळयुक्त इंधन पुरवठा म्हणून धाडी पडल्या. पोलिसांनी तपासणीच्या नावाखाली पंपावर आणि घरावर बंदोबस्त लावला. धाडी पडल्याच्या बातम्यांनी बदनामी होऊन हवा पालटली. महाडिक यांना शेवटच्या जोडण्या लावण्यात अडचणी आल्या आणि राष्ट्रवादीने मात्र पोती सैल केली. त्याचा परिणाम निकालावर झाला. महाडिक यांचा १४ हजारांच्या निसटत्या मतांनी पराभव झाला. मुश्रीफ या विजयाचे शिल्पकार ठरले. महाडिक यांच्या पंपावरील छाप्याचे पुढे काय झाले हे आजपर्यंत कोल्हापूरला समजले नाही.घटना - ०२ : कोल्हापूर उत्तरची पोटनिवडणूक. काँगेसच्या जयश्री जाधव विरुद्ध भाजपचे सत्यजित कदम यांच्यात लढत. प्रचार अखेरच्या टप्प्यात. मतदान १२ एप्रिलला आणि आदल्या दिवशी भाजपचे पाच-सहा कार्यकर्ते पैसे वाटताना नागरिकांनी पकडून दिले. पैसे वाटताना भाजपचे कार्यकर्ते सापडल्याच्या बातम्या जोरदार व्हायरल झाल्या. पोलिसांत गुन्हे दाखल झाले. त्यातून नकारात्मक वातावरण तयार झाले. शेवटच्या दिवसांतील जोडण्या लावण्यावर मर्यादा आल्या. आता निवडणूक झाली, निकाल लागला; पण पैसे वाटप तक्रारीचे पुढे काय झाले, हे कधीच समजत नाही. सरकार ‘हातात’ असले की विरोधकांची अशी जिरवता येते त्याचा अनुभव पुन्हा या निवडणुकीत आला.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरElectionनिवडणूकSatej Gyanadeo Patilसतेज ज्ञानदेव पाटीलHasan Mushrifहसन मुश्रीफDhananjay Bhimrao Mahadikधनंजय भीमराव महाडिकkolhapur-north-acकोल्हापूर उत्तर