कोल्हापूर : कोल्हापूर महापालिकेत महायुतीतील तीन पक्ष एकत्र लढले असताना देखील काँग्रेसचे नेते सतेज पाटील यांनी एकट्याने शड्डू ठोकून महायुतीला चांगलाच घाम सोडला. काँग्रेसने सर्वाधिक ३७ जागा जिंकून आपले वर्चस्व दाखवून दिले. भाजपला २४ जागा जिंकत्या आल्या. तर शिंदेसेनेने १४, राष्ट्रवादी अजित पवार गटाने ४, उद्धवसेनेने १ तर जनसुराज्य पक्षाने एका जागेवर विजय मिळवला आहे. काँग्रेसने तीन प्रभागात विरोधकांचा धुव्वा उडवत पॅनेलच्या पॅनेल निवडून आणले आहे. तर भाजप अन् शिंदेसेनेचे एका-एका प्रभागात सर्व उमेदवार निवडून आले आहेत. कोल्हापूर महानगरपालिकेच्या ८१ जागांसाठी गुरुवारी चुरशीने ६६.५४ टक्के मतदान झाले होते. ३२७ उमेदवार निवडणूक रिंगणात उतरले होते. अनेक प्रभागात अतीतटीच्या लढती झाल्या. आज, सकाळी मतमोजणीला सुरुवात झाल्यापासून उमेदवारांसह शहरवासियांमध्ये धाकधूक लागून राहिली होती. मात्र निकाल हाती यायला सुरुवात होताच भाजपने आघाडी घेतली. मात्र काही तासातच काँग्रेसने आघाडी घेत जोरदार मुसंडी मारली. प्रभाग क्रमांक १, ४ आणि १७ मध्ये विरोधकांचा सुपडासाफ करत सर्वच्या सर्व उमेदवार निवडून आले. तर भाजपचे प्रभाग क्रमांक ३ आणि शिंदेसेनेचे प्रभाग क्रमांक २ मध्ये पॅनेल टू पॅनेल सर्व उमेदवार विजयी झाले.
या प्रभागात निवडून आले पॅनेल टू पॅनेलकाँग्रेसचे विजयी उमेदवारप्रभाग क्र.१ - सुभाष राजाराम बुचडे, पुष्पा नीलेश नरुटे, रूपाली अजित पोवार, सचिन हरीष चौगुलेप्रभाग क्र.४ - स्वाती सचिन कांबळे, विशाल शिवाजी चव्हाण, दीपाली राजेश घाटगे, राजेश भरत लाटकरप्रभाग क्र.१७ - अर्चना बिरांजे, सचिन शेंडे, शुभांगी पाटील, प्रवीण केसरकरउर्वरीत प्रभागात काँग्रेसचे एक, दोन उमेदवार निवडून आले. तर प्रभाग क्रमांक २, ३, ७, ९, १० मध्ये एकूण पाच प्रभागात काँग्रेसचा सपाटून पराभव झाला.
भाजपचे विजयी उमेदवारप्रभाग क्र. ३ - प्रमोद भगवान देसाई, वंदना विश्वजित मोहिते, राजनंदा महेश महाडिक, विजेंद्र विश्वास मानेप्रभाग क्रमांक १, २, ४, ८, १२, १७ मध्ये असे एकूण ६ ठिकाणी भाजपचे कमळ फुलले नाही. बाकी उर्वरीत प्रभागात भाजपचे उमेदवार निवडून आले आहेत.
शिंदेसेनेचे विजयी उमेदवारप्रभाग क्र.२ - वैभव दिलीप माने, अर्चना उमेश पागर, प्राजक्ता अभिषेक जाधव, स्वरूप सुनील कदमशहरात शिंदेसेनेचे आमदार राजेश क्षीरसागर असताना देखील १० प्रभागात धनुष्यबाणाचा नेमच लागला नाही.
Web Summary : Congress secured a majority in Kolhapur, winning 37 seats, while BJP gained 24. Shinde Sena faced setbacks despite contesting alongside BJP. Congress swept three wards.
Web Summary : कोल्हापुर में कांग्रेस ने 37 सीटें जीतकर बहुमत हासिल किया, जबकि भाजपा को 24 सीटें मिलीं। भाजपा के साथ चुनाव लड़ने के बावजूद शिंदे सेना को झटका लगा। कांग्रेस ने तीन वार्डों में क्लीन स्वीप किया।