कोल्हापूर : दुसऱ्या फेरीत मतांची बेरीज करण्याआधीच मते कमी मिळाली म्हणून पाणावलेल्या डोळ्यांनी मतदान केंद्र सोडले खरे, मात्र, पुढच्या पंधराच मिनिटांत १६ मतांनी विजयी झाल्याचा फोन खणाणला अन् त्याच पाणावलेल्या डोळ्यांचे आनंदाश्रूत रूपांतर झाल्याचा क्षण रमणमळ्यातील मतमोजणी केंद्रावर शुक्रवारी पाहायला मिळाला. भाजपच्या उमेदवार पल्लवी निलेश देसाई या प्रभाग क्रमांक ५ मधून सर्वसाधारण महिला गटातून विजयी झाल्या. येथे देसाई यांच्याविरोधात काँग्रेसच्या सरोज सरनाईक रिंगणात होत्या. या प्रभागाची मतमोजणी सुरू झाल्यानंतर पहिल्या फेरीत काँग्रेसच्या सरनाईक यांनी आघाडी घेतली. दुसऱ्या फेरीत काही टेबलवर देसाई तर काही टेबलवर सरनाईक यांना जादा मते होती. या फेरीची मतमोजणी सुरू असतानाच आपणाला मते कमी मिळाल्याचा गैरसमज करुन देसाई यांनी मतदान केंद्र सोडले. इकडे सरनाईक यांनी मतांची बेरीज केल्यानंतर १६ मतांनी पराभूत झाल्याचे लक्षात येताच त्यांनी फेरमतमोजणीची मागणी केली. ही मागणी मान्य झाल्यानंतर निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी क गटातील फेरमोजणी केली; मात्र यातही मतांमध्ये कोणताच बदल झाला नसल्याने निवडणूक निर्णय अधिकारी संदीप भंडारे यांनी १६ मतांनी देसाई यांना विजयी घोषित केले. येथे पल्लवी देसाई यांना ७१६४ तर सरनाईक यांना ७१४८ मते मिळाली.देसाई यांचा दिलदारपणापराभूत झाल्याचा गैरसमज करून निघून गेलेल्या देसाई यांनी विजयी झाल्याचे कळताच तत्काळ मतमोजणी केंद्रावर धाव घेतली. अंतिम निकाल घोषित झाल्यानंतर त्यांनी निसटत्या मतांनी पराभव स्वीकारावा लागलेल्या सरनाईक यांच्या हातात हात देऊन त्यांची गळाभेट घेतली.
Web Summary : Pallavi Desai, initially disheartened, left the counting center, only to win Kolhapur's election by a narrow 16-vote margin after a recount request. She graciously greeted her opponent after the result.
Web Summary : पल्लवी देसाई, शुरू में निराश, मतगणना केंद्र से निकलीं, लेकिन पुनर्गणना के बाद कोल्हापुर चुनाव 16 वोटों से जीत गईं। परिणाम के बाद उन्होंने अपनी प्रतिद्वंद्वी को बधाई दी।