Kolhapur: पन्हाळ्यात बालिकेचा विनयभंग; शाळेच्या बसचालकाला अटक

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 8, 2024 12:45 IST2024-10-08T12:45:48+5:302024-10-08T12:45:57+5:30

पन्हाळा : पन्हाळ्यातील एका शैक्षणिक संस्थेच्या प्राथमिक विभागामध्ये विद्यार्थ्यांची ने-आण करणाऱ्या गाडीचा मालक व चालक असलेल्या राहुल अशोक भोसले ...

Kolhapur: Girl molested in Panhala; School bus driver arrested | Kolhapur: पन्हाळ्यात बालिकेचा विनयभंग; शाळेच्या बसचालकाला अटक

Kolhapur: पन्हाळ्यात बालिकेचा विनयभंग; शाळेच्या बसचालकाला अटक

पन्हाळा : पन्हाळ्यातील एका शैक्षणिक संस्थेच्या प्राथमिक विभागामध्ये विद्यार्थ्यांची ने-आण करणाऱ्या गाडीचा मालक व चालक असलेल्या राहुल अशोक भोसले (वय ४२, रा. पन्हाळा) याच्यावर पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल झाला आहे. चौथीत शिकणाऱ्या साडेनऊ वर्षांच्या बालिकेचा विनयभंग केल्याची फिर्याद पीडित मुलीच्या आईने पन्हाळा पोलिसात दिली. चालक राहुल भोसले याला पोलिसांनी ताब्यात घेतले असून, त्याला दोन दिवसांची पोलिस कोठडी देण्यात आली आहे.

याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी, राहुल भोसले हा पन्हाळ्यातील एका शाळेत पहिली ते चौथीपर्यंतच्या मुलांची गाडीतून ने-आण करतो. २७ सप्टेंबरला गाडीतून येणाऱ्या चौथीत शिकणाऱ्या मुलीला लज्जा उत्पन्न होईल असे प्रश्न विचारून तिचा विनयभंग केल्याची घटना घडली होती. या घटनेबाबत पीडित मुलीने आपल्या आईला सांगितले होते. यावेळी पीडितेचे वडील कामानिमित्त बाहेरगावी होते. त्यामुळे पीडित मुलीच्या आईने याची माहिती शाळेतील शिक्षकांना दिली. दरम्यान, रविवारी पीडितेचे वडील घरी आल्यानंतर त्यांनी पोलिसात तक्रार देण्याचा निर्णय घेतला. त्याप्रमाणे पीडितेच्या आईने पन्हाळा पोलिसात फिर्याद दाखल केली.

Web Title: Kolhapur: Girl molested in Panhala; School bus driver arrested